स्मारक बांधून काय होतं ?
कालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पात छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्व. श्री बाळासाहेब ठाकरे ,स्व. श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्मारक बांधण्यासाठी ४००-५०० कोटींची तरतूद करण्यात आली. गुजरात मध्ये सुद्धा स्व. श्री वल्लभभाई पटेल याचं स्मारक बांधण्यात येणार आहे. खर्च जवळपास ४००० कोटी. या स्माराकांद्वारे काय साध्य होते ? जनतेच्या पैशांनी स्मारक बांधणे या महापुरुषांना तरी आवडेल का ?
याद्वारे पर्यटनाला थोडीफार मदत होते हे मान्य ! पण पण हेच पैसे योग्य ठिकाणी वापरून पर्यटन आणी अन्य व्यवसाय जास्त वृद्धिंगत करता येणार नाही का ?
💬 प्रतिसाद
(9)
क
कहर
गुरुवार, 03/19/2015 - 07:24
नवीन
याला पुतळ्यांचे राजकारण म्हणतात … हल्ली सरळसोट (straight forward ) धार्मिक भाषणे करून दंगे भडकावता येत नाहीत ना. लोक शहाणे झाले आहेत म्हणून मतांसाठी अशा पद्धतीने याचा पुतळा बसव त्याचा पुतळा काढ, याच्यासाठी निधी उभार त्याच्या विरोधात आंदोलन कर असे राजकारण चालू आहे. मग उभारनाऱ्याला ज्याचा पुतळा त्याच्या अनुयायांचा पाठींबा मिळतो तर विरोध करणाऱ्याला विरोधकांचा. मध्ये रायगडावरील कुत्र्याच्या पुतळ्यावरून एक संघटना असेच राजकारण करत होते. अफझल खानाच्या चित्रामुळे सांगलीत आणि नंतर राज्यभर माजलेल्या वाधाच्या खुणा अजून ताज्या आहेत
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 03/19/2015 - 07:57
नवीन
धंद्याची सोय होते.
सगळ्यांच्याच!
१. पक्षाचा धंदा
२. जातवाल्यांचा धंदा
३. संघटनांचा धंदा
४. वर्षातून दोनदा (जयंती+पुण्यतीथी) हार-अगरबत्ती-डीजे इ. चा धंदा.
५. अधनंमधनं विटंबना करून दंगली घडवणार्यांचा धंदा.
- Log in or register to post comments
अ
अभिरुप
गुरुवार, 03/19/2015 - 09:16
नवीन
माझ्या मते पुतळे संग्रहालयामध्ये जास्त सुरक्षित राह्तील जेणे करुन त्यांचा अपमान होणार नाही.बाकी पर्यटन व्यवसाय हा संबंधित मंत्रालयाने लक्ष घालून वाढवावा.
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
गुरुवार, 03/19/2015 - 09:32
नवीन
हे पैसे असे वापरायच्या ऐवजी असलेली पर्यटन स्थळे नीट करणे जास्त आवश्यक आहे आणि एका ठराविक समाजाची मागणी म्हणून आपली वोट बँक सांभाळण्यासाठी जर स्मारक बांधायचेच असेल तर मग मोठ मोठे पुतळे बांधायच्या ऐवजी त्या महापुरुषांनी केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचावे ह्या साठी ग्रंथालये बांधणे जास्त चांगले होईल. त्यांच्या नावे शिक्षण संस्था उभारा. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मतीमंद मुलांच्या शाळा, इतर समाज कार्ये त्यांच्या नावाने करा ज्यामुळे जनतेचा पैसा सत्कारणी लागेल.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 03/19/2015 - 11:37
नवीन
आपली गंमत म्हणजे आपण न्यु यॉर्क आणी रियो मधल्या मोठमोठ्या पुतळ्यांपाशी जाउन फोटो काढतो, च्यायला भारतीयांना असले काही करता येत नाही म्हणुन शिव्या घालतो आणि मग भारतात येउन सरकारवर स्मारकांवर इतका खर्च करतात म्हणुन शिव्या घालतो.
- Log in or register to post comments
स
संपत
गुरुवार, 03/19/2015 - 17:56
नवीन
न्यूयॉर्क / रिओ सारखा कोणी फुकट पुतळा बांधून देत असेल तर ठीक पण सरकारचे (पर्यायाने लोकांचे) पैसे कशाला खर्च करायचे?
- Log in or register to post comments
क
कहर
Fri, 03/20/2015 - 04:16
नवीन
अहो पूर्वी राजा महाराजांनी बांधलेले आणि वर्तमान काळात प्राईवेट संस्थांनी बांधलेले अनेक पुतळे आपलया इथेही आहेत … शिवाय तो लिबर्टी चा पुतळा दुसर्या महायुद्धनंतर फ्रांसने अमेरिकेला भरपाई म्हणून बांधून दिला असे वाचले आहे आम्ही
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 03/19/2015 - 11:50
नवीन
http://misalpav.com/node/30801
हा धागा वाचा म्हणजे कळेल स्मारके कोणाला पाहीजे असतात ते. भारतात जन्माला येउन तुम्ही इतके भाबडे कसे हो
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Fri, 03/20/2015 - 21:15
नवीन
स्मारक निर्माण करणा-या लोकांकडे दूरदृष्टी असेल तर प्रेरणादायी बनू शकतं ते अनेकांसाठी.
या स्मारकाने मला (आणि ओळखीतल्या अनेकांना) खूप काही दिलं!
- Log in or register to post comments