भाव तिथे देव
काय हो वर्णावा
त्या नराचा स्वभाव
घेतला ज्याने देव
विकत बाजारी
चार मोजले रोकडे
अन म्हणे आता धाव
तुच मला वाचव
संकटा पासून
तुला मी रे दिले
माझ्याकडले हे धन
आता सोडव ह्यातुन
मजला देवा
अरे वेड्या त्याच्या लेखी
तू आहेस कंगाल
त्याला पाहिजे जो माल
तुझ्याकडे नाही
संत सांगती सज्जना
मनी असुदेत भाव
तोच करेल बचाव
स्वता: हून
💬 प्रतिसाद
(3)
व
वेल्लाभट
गुरुवार, 03/19/2015 - 11:47
नवीन
एकदम मस्त.....
काही ठिकाणी मीटर थो....डसं बसत नाही असं वाटलं. पण बाकी उत्तम काव्य !
सहीच.
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
गुरुवार, 03/19/2015 - 13:18
नवीन
धन्यवाद वेल्लाभट.....
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 03/19/2015 - 14:27
नवीन
खूप छान अर्थाची कविता आहे, आवडली.
- Log in or register to post comments