Welcome to misalpav.com
लेखक: खटपट्या | प्रसिद्ध:
एक संवाद - 1 ती - काय रे ? कुठे होतास इतका वेळ ? ऑन लाईन दिसत नव्हतास… तो - उशीरा आलो आज. ती - ओके, काय विशेष? उशीर का झाला? तो - आता तूपण बायको सारखे प्रश्न विचारायला लागलीस ती - नाही सांगायचं तर नको सांगूस. तो - अरे लाँग ड्राईव ला गेलो होतो ना. ती - ओह्ह. तो - तुला बोलावलं होतं, नाही आलीस. ती - कुठे गेला होतास तो - असं काही ठरवून नव्हतो गेलो ती - म्हणजे ? तो - नाशिकरोड ला चालवत राहिलो ती - ओके, आणि मग तो - एक रिपोर्ट बनवतो आणि देतो तुला मग वाचत बस. चालेल? ती - लगेच वैतागलास तो - मग बोलावले तर आली नाहीस आणि आता सतरा प्रश्न ती - ओके, एन्जोय केलंस ना मग झालं तो - मी एन्जोय केलं की नाही हे तुला काय माहित ती - मला माहीत आहे रे एकट्याला मजा नाही येत. तो - मी एकटा होतो असं म्हणालो मी ? ती - "……………." तो - मला मजा आली ती - कोण होतं बरोबर? तो - होतं कोण तरी ती - सांग ना आता तो - का तू नाही बोललीस तर कोणीच येणार नाही का माझ्याबरोबर ? ती - असं मी कधी बोलले ? तुझी मर्जी तू कोणालाही घेऊन जाऊ शकतोस. मला काय फरक पडतोय? तो - नाही ना फरक पडत ? मग कशाला विचारतेस ? ती - ओके राहुदे. काय काय केलंत तिकडे ? तो - थांबलो एका हॉटेल मध्ये ती - काय ? तो - हो ती - आणि मग ? तो - मग काय , दारू प्यायलो आणि आलो परत…. ती - म्हणजे ती पण दारू प्यायली???. म्हणजे जी कोण होती ती…. तो - ती म्हणजे. तुला कोण बोललं की "ती" होती ? ती - मग ? तो - माझा मित्र होता सोसायटीमधला ती - ओह्हा. हा हा हा हा तो - दात काढायला काय झालं ती - काही नाही. करा एन्जोय करा. तो - केलंच एन्जोय. ती - काय रे पण ? कोण होता बरोबर ? तो - तुझा नवरा ती - "……???????" तो - काय ग ? ती - एक मिनिट. मी तुला नंतर पिंग करते. मला एक फोन करायचाय तो - कोणाला ? क्रमश:
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

संवाद की विसंवाद असा प्रश्न हा भाग वाचून पडलाय :-) . कदाचित पुढील भागात याचे उत्तर मिळेल.

कश्यात काय आणि फाटक्यात पाय!! पण एक मात्र नक्की, दोघेही जे आहे त्यात खुष नाहीत.

+१ असेच म्हणतो. फक्त दोघेही ऐवजी चौघेही ! :(

म्हणजे हे दोघे शेजारी सुद्धा आहेत आणि सहकारी सुद्धा? ह्म्म्म.