Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंचांग कोनते घ्यावे?

अ
अव्यक्त
गुरुवार, 03/19/2015 - 21:09
🗣 64 प्रतिसाद
नववर्ष सुरू होताय. या वर्षीपासून प्रत्येकाने आवर्जून पंचांग घरात ठेवा. पंचांग हा अत्यंत उपयुक्त माहितीचा खजिना आहे. तुम्ही ज्या गावात राहता, त्याच्या किंवा त्याजवळच्या गावाच्या अक्षांश रेखांशांवर आधारित पंचांग घ्या. कुठल्या नक्षत्रांवर आपण आपली कामं करायची आणि कुठल्यावर कशापासून दूर रहायचं? ...जरा तुम्हीच सांगा ना कुठली नक्षत्रं चांगली आणि कुठली वाईट ते. हे पंचांगात कुठे सापडेल? >>>>>> कुठल्या नक्षत्रांवर आपण आपली कामं करायची आणि कुठल्यावर कशापासून दूर रहायचं, एवढं कळलं तरी जन्माचं कल्याण होईल.मी स्वतः शिवलीखित वेळेच्या कोष्टकाचा वापर करतो जेव्हा केव्हा काही महत्वपूर्ण काम असतात तेव्हा. त्या पंचांगामध्ये प्राचीन भारतीयांना अजिबात माहीत नसलेल्या युरेनस, नेपच्यून आणि प्ल्यूटो या ग्रहांची फळेफुले मांडलेली बघून फार मौज वाटते. आणि राहूकेतूंसारख्या निव्वळ छेदनबिंदूंच्या दशादिशा पाहूनही. त्यातपुन्हा यांचा वसंतसंपातबिंदू गेली हजारो वर्षे चुकतोय म्हणे. मग पुन्हा टिळक विरूद्ध दाते. बाकी ढवळे, रूईकर, निर्णयसागर, जन्मभूमी, कालनिर्णय वगैरे इतर अनेक खेळाडू आहेतच.

प्रतिक्रिया द्या
15921 वाचन

💬 प्रतिसाद (64)
ट
टवाळ कार्टा Tue, 03/24/2015 - 11:47 नवीन
माझा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Tue, 03/24/2015 - 11:55 नवीन
दुसर कोण सापडल नाय .. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Tue, 03/24/2015 - 14:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कंजूस Fri, 03/27/2015 - 01:14 नवीन
होय, पण फेटा बांधणार कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कंजूस Tue, 03/24/2015 - 16:46 नवीन
तसं नाही हो अगदी माहितीचा रतिब बदाबदा ओतायचा नाही हे मी इथेच शिकलो. वर्गात शिक्षक जीव तोडून मोरोपंतांची(/वामन पंडीत?) केकावली शिकवत असले तरी खिडकीतून बाहेर काही गम्मत दिसली की (उदाहरणर्थ धूराची रेषा काढत जाणारे जेट विमान हो )थोडं थांबावं लागतं.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/25/2015 - 10:17 नवीन
बरोबरे. केकावली मोरोपंतांचीच. वामनपंडितांची नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/26/2015 - 18:17 नवीन
मोराच्या ओरडण्याला केका म्हणतात. त्यावरून केकावली (केकाची रांग = बराच वेळ ऐकू येणारे मोराचे ओरडणे) हा शब्द बनला आहे. हा मोरोपंत (खरे नाव : मोरेश्वर रामचंद्र पराडकर) यांचे नाव आणि केकावलीचा (त्यांच्या काव्याच्या नावाचा) संबध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Fri, 03/27/2015 - 01:11 नवीन
वर्गात लक्ष नसलं की असं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मनीषा Wed, 03/25/2015 - 03:21 नवीन
न कर्त्याचा वार शनिवार ही म्हण आठवली . आणि शुभस्यं शिघ्रम्... हे सुद्धा आठवले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/25/2015 - 05:35 नवीन
शनिवारची वाट पाहू नको?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/25/2015 - 16:29 नवीन
पंचांग माहितीचा आवाका फारच व्यापक आहे. थोडेफार संक्षिप्त क्रमवार टिपण करण्याचा प्रयत्न करत आहे. वाचकांनी भर घालावी. "टिळकांचे ओरायन संशोधन, सायन आणि निरयन पंचांग. पोर्णिमान्त आणि अमान्त चांद्रमास गणना, सणवार तिथी निर्णय, मुहूर्त आणि योग विचार हे मुद्दे बाकी आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/25/2015 - 16:31 नवीन
१)पंचांगे कालगणनेसाठी आहेत. आकाशातील दोन महत्त्वाचे प्रकाशमान गोलक सूर्य आणि चंद्र आपल्या पृथ्वीवरती काही लक्षात येणारे बदल घडवून आणतात त्यांचा उपयोग करून घेतला आहे. त्यातही काही आवर्तने दिसतात उदाहरणार्थ सूर्याचे उगवणे मावळणे, चंद्राचे लहान मोठे होत जाणे.ही आवर्तने मोजून लिहून ठेवता आली आणि त्यांची गती समजून घेऊन पुढील घटना मांडता आल्या तर चांगली कालगणना निर्माण होते. कोणतेही मोजमाप करायचे तर तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे सुरुवात आणि दुसरे संदर्भ. रात्री आकाशात असंख्य छोटे प्रकाशित गोलक अथवा तारे दिसतात ते एकमेकांपासून स्थिर अंतरावर असल्याप्रमाणे एका पडद्याप्रमाणे वाटतात या संदर्भाचा उपयोग करण्यात आला. सूर्य -पृथ्वी यांच्या निरनिराळ्या गतींमुळे आणखी दृष्यमान बदल म्हणजे ठराविक कालानंतर ऋतू होतात. चंद्रामुळे समुद्राची भरती ओहोटी होते.सूर्याच्या गतीला महत्त्व देऊन केलीली कालगणना सौर पंचांग(कलिंडर) आणि चंद्राची आपली चांद्रमास पंचांग होय.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/25/2015 - 16:33 नवीन
२)कालगणना सुरुवात आणि संदर्भ- जगात दोन्ही पदध्तीच्या कालगणना विकसित झाल्या आणि ठराविक भौगोलिक भागातील समुदाय त्यांचा उपयोग करू लागले. मोठे राजे आपल्या शासनकालात एखादी कालगणना सुरू करू लागले आणि त्याकाळापासून आतापर्यँत किती आवर्तने वगैरे झाली याची नोंद त्या राजाच्या नावाने ओळखली जाऊ लागली -ज्युलिअन, विक्रम, शके वगैरे. कोणता संदर्भ आधारभूत धरला यावरही निरनिराळी पंचांगे निर्माण झाली. काही काळानंतर निव्वळ एका गोलकाधारित गणना काही घटना वर्तवण्यात अपुऱ्या पडतात असे लक्षात आले. उदाहरणार्थ चाद्रपंचांग ऋतुचक्राचे निर्णय अचूक देऊ शकत नाही. सौरपंचांग चंद्राची कला आणि भरती ओहोटी वर्तवण्यास अपुरे ठरते.सौर गतीची नोंद चांद्रमास पंचांगात आणण्याचे प्रयत्न झाले. ऋतुचक्र हळूहळू लवकर होत आहे याचाही अंतर्भाव करण्यात आला.संदर्भ आणि सुरुवात यांच्या वैविध्यतेमुळे बरीच पंचांगे अस्तित्वात आहेत.भारतीय सौर पंचांगात सौर कालगणनेतून चांद्रमासांचे मापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अव्यक्त गुरुवार, 03/26/2015 - 10:12 नवीन
.अतिशय अभ्यासपूर्वक लेख आपण आपल्या ओघवत्या शैलीत प्रसूत करत आहात… एखाद्या काळ्या - कभिन्न कातळातून एक अतिशय नयनरम्य,मुग्ध करणार शिल्प उभं रहावं तद्वत अनुभूती कंजूस महाराज आपण आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवलात… आणि हा धागा पंचांग आणि त्यासंदर्भातील शंकाविषयी एक उत्तम अभायासाण्याजोगा व्हावा तद्वत आपल्या हिंदू संस्कृतीच्या परंपरा जपण्यास आणि जतन करण्यास उपकारक ठरोत… ह्यासाठी अभूतपुर्वक शुभेच्छा…. आता हा धागा सुफळ आणि समृद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या शिरावर महोदय … आजपासून आपले शिष्यत्व पत्करत आहे… आजपासून फक्त आणि फक्त श्रवणभक्ती… अभिष्टचिंतन !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा