Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वसंत

आ — आनंदमयी, Fri, 03/20/2015 - 12:34
वार्यावर मंद निनादे ती श्रीकृष्णाची मुरली त्या अवखळ स्वरलहरींना अवखळशी कविता स्फुरली... ल्याइली आज धरणीने का गर्भरेशमी शाल किरणांनी आकाशात उधळला कशास गुलाल पसरला रोमरोमी का अवखळसा एक शहारा का कसा कुणास्तव आज हा निसर्ग नटला सारा पसरली सुखाची चर्या अन् उडून गेली खंत अवतरे आज धरणीवर तो ऋतुराज वसंत अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
1788 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
असंका Fri, 03/20/2015 - 13:49 नवीन
अगदी शब्दाशब्दातनं आनंद ओसंडून वहातोय... सुंदर कविता! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/20/2015 - 15:08 नवीन
क्या बात...! क्या बात...! क्या बात...! सलाम स्विकारा !
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Fri, 03/20/2015 - 15:24 नवीन
सुरेख. खूप आवडली कविता.
  • Log in or register to post comments
म
मोनू Sat, 03/21/2015 - 11:36 नवीन
कविता आवडली ... छान .
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 03/21/2015 - 12:11 नवीन
मस्त लयबद्ध काव्य
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/24/2015 - 16:57 नवीन
परत एकदा दर्जेदार रचना!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 08/04/2015 - 11:31 नवीन
क्लास लिहिली आहे !
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 08/04/2015 - 15:22 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा