मगरीचा वावर
हि बातमी वाचल्यावर
विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय
आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही.
दिलीप यार्दी, पक्षीमित्र
निसर्गमित्र वगैरे ठीक आहे पण एक प्रश्न असा कि जिथे अनेक लोक रोज वावरतात /पोहायला जातात अशा ठिकाणी मगरी सारखा खतरनाक प्राणी अचानक आल्यावर ...त्याने आत्तापर्यंत हल्ला केला नाही त्यामुळे धोका नाही हे मानून चालणे कितपत योग्य ?
मागे आमच्या सोसायटीत एक ५-६ फुटी साप सापडला होता ... आता तो विषारी कि बिनविषारी हे ओळखत बसायचे कि त्याला मारून टाकायचे अशी चर्चा झाली .... सर्पमित्र उपलब्ध नव्हते ...तथापि त्याला मारून टाकायचे असे ठरल्यावर अचानक कुणीतरी "नको ...पितृपक्षात सर्पदोष लावून घ्यायला नको" असा एक पवित्रा घेतल्याने अचानक खळबळ माजली व शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला"
मुद्दा असा कि अशा वेळी काय करावे ? नै शहरीकरण /कोण कुणाच्या घरात शिरलेयवगैरे ठीक आहे पण समोर एखादा साप किंवा तत्सम खतरनाक जीव अचानक प्रकट झाला (कोणतीही मदत उपलब्ध नसेल) तर त्याला ठार करून टाकावे कि (तो काही तुम्हाला इजा करायला आलेला नाही असे समजून) सोडून द्यावे ? नंतर थोड्या वेळाने तो परत आला तर ?
अचानकपणे समोर आलेल्या प्रसंगात काय करावे हा प्रश्न आहे.... त्याचे उत्तर अपेक्षित आहे ...
शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला"हे हे.. मस्तच बघा,,, :))मी काही सर्पतज्ञ नाही, पण हाच फोटो बघून मी ३-४ वेळा साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखले आहे. माझे गावाकडचे नातेवाईक शेतामध्ये दिसला साप की मार टाईपचे होते. बर्याच जणांच्या मोबाईलमध्ये मी हा फोटो टाकून दिलेला आहे. आत्तापर्यंत किमान २०-२५ सापांचे प्राण वाचले आहेत. नातेवाईकांपैकी एकाला तर सापांची आवड निर्माण झाली आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन तो आज ‘सर्पमित्र’ झालाय. सांगायचा मुद्दा असा की साप दिसल्यावर हा फोटो बघून त्याला ओळखता येईलच असे नाही, पण ओळखणे फार कठीणसुद्धा मुळीच नाही.