Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मगरीचा वावर

अ
अत्रन्गि पाउस
Mon, 03/23/2015 - 02:59
🗣 90 प्रतिसाद
हि बातमी वाचल्यावर विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही. दिलीप यार्दी, पक्षीमित्र निसर्गमित्र वगैरे ठीक आहे पण एक प्रश्न असा कि जिथे अनेक लोक रोज वावरतात /पोहायला जातात अशा ठिकाणी मगरी सारखा खतरनाक प्राणी अचानक आल्यावर ...त्याने आत्तापर्यंत हल्ला केला नाही त्यामुळे धोका नाही हे मानून चालणे कितपत योग्य ? मागे आमच्या सोसायटीत एक ५-६ फुटी साप सापडला होता ... आता तो विषारी कि बिनविषारी हे ओळखत बसायचे कि त्याला मारून टाकायचे अशी चर्चा झाली .... सर्पमित्र उपलब्ध नव्हते ...तथापि त्याला मारून टाकायचे असे ठरल्यावर अचानक कुणीतरी "नको ...पितृपक्षात सर्पदोष लावून घ्यायला नको" असा एक पवित्रा घेतल्याने अचानक खळबळ माजली व शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला" मुद्दा असा कि अशा वेळी काय करावे ? नै शहरीकरण /कोण कुणाच्या घरात शिरलेयवगैरे ठीक आहे पण समोर एखादा साप किंवा तत्सम खतरनाक जीव अचानक प्रकट झाला (कोणतीही मदत उपलब्ध नसेल) तर त्याला ठार करून टाकावे कि (तो काही तुम्हाला इजा करायला आलेला नाही असे समजून) सोडून द्यावे ? नंतर थोड्या वेळाने तो परत आला तर ?

प्रतिक्रिया द्या
20472 वाचन

💬 प्रतिसाद (90)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 03/26/2015 - 12:24 नवीन
आणि क्रॅशकोर्स मधे शिकायचे असल्यास ज्येष्ठ समाजसेविका सन्नीबाई लिओनी यांच्या मार्गदर्शनपर चलतचित्रे बघा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अजया Mon, 03/23/2015 - 11:40 नवीन
मी राहाते त्या भागात सापांचा बर्यापैकी सुळसुळाट आहे.अगदी सुरुवातीला आला साप की मार असंच वाटायचं भीतीने.नंतर लक्षात येत गेलं की आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय.ते इथे आधीपासुन होतेच.मग त्यानंतर घराभोवतालचा बराचसा भाग फरश्यांचा केला.मग फक्त बाऊंड्रीवर साप दिसतात. घराजवळ चिमणीचं घरटं होतं.तेव्हा मात्र अगदी दारात आला होता.एकदा आरामात पहुडलेलं बारकंसं फुरसं पण विझिट देऊन गेलेलं.त्यांचं प्रमाण आता कमी झालंय.मधुनच विशेषतः नोव्हेम्बर ते जानेवारीत साप दिसतात.पण ते गटारातुन फिरणारे बिनविषारी असतात हे एका सर्पमित्राकडुन समजुन घेतलंय.मी त्यांना घाबरण्यापेक्षा सापच चाहुल लागली काठी आपटली की निघुन जातो घाबरुन हे लक्षात आलंय.तेव्हापासुन मारणं बंद.कालच संध्याकाळी गवतावर पाणी मारताना दुसर्या टोकाला साप दिसला.हालचालीच्या जाणीवेने भरकन निघुन गेला.मी त्याच्यापासुन सुरक्षित अंतरावर लांब होते.त्यामुळे उगा साप साप करत गोंधळ न घालता जाऊ दिला.तो आला त्या बाजुला एक दगड लावुन टाकला मात्र नंतर.एक प्रवेश बंद त्याला त्याच्याच एरियात!!
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/23/2015 - 12:51 नवीन
साप मगरी अशा अनोळखी प्राण्यांपेक्षा ओळखीचे लोक लै जास्त डेंजरस असत्यात. ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/23/2015 - 14:09 नवीन
पॉइंट ब्लँक पॉइंट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
य
यसवायजी Mon, 03/23/2015 - 13:38 नवीन
BBC -A variety of poisonous snakes kill 50,000 Indians a year. In fact as many people die of snakebites in India as the rest of the world put together. ज्यांच्या घरात कुणी सर्पदंशाने गेलंय, त्याला कुणी सांगावं की, "अभ्यास कमी पडतो रे तुमचा! हाताळायला जमत नाही" - मावशीला विषारी साप चावला होता.राहत्या घरातच. तेंव्हा मरता मरता वाचली ती. - त्यानंतर एकदा माझ्या घरी साप आला होता. घरी नात्यातलीच एक अपंग मुलगी होती त्यावेळी. तिने भोकाड पसरले. भूतदया वगैरे नाही सुचली काही. दगड़ाने ठेचला. वाईट वाटलं. पण पर्याय नाही. - वरची आकडेवारी सांगते की,भारतात सर्पदंशावर लगेच उपचार न मिळाल्याने जास्त मृत्यु होतात. ती परिस्थीती बदलायची आपली ताकद नाही. जान सलामत तो स्नेक शोज पच्चास.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 03/23/2015 - 13:45 नवीन
तर त्यांच्या घरात घुसता कशाला,तो साप किंवा मगर तुम्हाला चावेल म्हणुन त्याला दगडाने ठेचुन मारणार मग त्यांच्या जिवाला धोका निर्माण करताय म्हणुन माणसाला कश्या कश्याने ठेचुन मारले पाहिजे,तो साप अथवा मगर निदान निर्सगाचा समतोल तरी ठेवतोय्,तुमचा खरच जगुन काही उपयोग आहे का ?(यात तुम्ही आणी मी सगळेच आलो.)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 03/23/2015 - 14:07 नवीन
@एव्हडी भिती वाटते या मुक्या प्राण्यांची>> हो. भितीचं कारण लिंकमधे दिलंय. @ तर त्यांच्या घरात घुसता कशाला,>> हम्म. पण तसं पाहायला गेलं तर मग माणसाला कुठेच राहायचा अधीकार नाही. जंगलच होतं की सगलं. मी ज्या ठिकाणी राहतोय तिथे ८० वर्षापुर्वी शेती होती. अशी जागा सांगा की जी फक्त माणसासाठी आहे. (माझ्या वरच्या केसमधे साप घरी आला होता) @ तुमचा खरच जगुन काही उपयोग आहे का ? >> माहीत नाही. याचे उत्तर भल्याभल्यांना नाही मिळालंय. तुमच्याकडे असेल तर दयाच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
प
प्रसाद१९७१ Tue, 03/24/2015 - 11:19 नवीन
सापाला कोणी आंदण दिले आहे का ती जागा. माणुस महत्वाचा, त्याची गरज भागली की मग बाकी प्राणीमात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ब
बाबा पाटील Mon, 03/23/2015 - 13:47 नवीन
मग याच भारतात विनाकारण किती लक्ष साप मारले जातात दरवर्षी याची काही आकडेवारी द्या की.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 03/23/2015 - 14:23 नवीन
@विनाकारण किती लक्ष साप मारले जातात.>>> विनाकारण नाही. कारण काय असेल? मरणाची भिती? जर मेडीकल हेल्प वेळेत मिळाली, मृतांचे आकडे कमी झाले तर साहजीकच भीती कमी होईल. आशा करतो की असे लवकर होवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
अ
अजया Mon, 03/23/2015 - 14:15 नवीन
मुळात आपण सापाच्या अधिवास असलेल्या क्षेत्रात राहात असलो की काही काळजी घेणे आवश्यक आहेच.उदा.घराला जाळीचा दरवाजा असणे.उंबर्याला फळी असणे.उंदीर घराच्या परिसरात येऊ नयेत म्हणून भंगार कचरा नियंत्रण ठेवणे,घराच्या वावरत्या अंगणात प्रखर उजेड देणारे लाईट असणे,चप्पल घातल्याशिवाय न फिरणे,काठी हाताशी असणे.मांजरांचा वावर असणे.फरसबंदी अंगण असावे.तसेच मी माझ्या घराच्या आजुबाजुला फोरेटचा फवारा करते.त्यामुळे साप सहसा घरापाशी फिरकत नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Mon, 03/23/2015 - 14:41 नवीन
बर्‍याचदा नागाबो वस्तीला असतो,काठी आपटली की बिचारा निघुन जातो,गावतल्या कौलारु घरात तर वरच्या रिफाडात कायमस्वरुपी घोरपड्,मुंगुस्,साप यांचा मुक्काम असतो,कधी कधी कोल्होबा किंवा लांडगोबा दर्शन देवुन जातो,आता चासकामानच्या पाण्यामुळे उस वाढलाय त्यामुळे बिबट्याचीही वंदना आहे,यातल्या एकानेही कधी हल्ला केल्याच ऐकु आल नाही.एकदा अकरावीत असताना कांद्यात पाणी धरत होतो तर चक्क नागराजाने दर्शन दिले,माझ्या कमरेच्यापेक्षा जास्त मोठा फणा काढुन, ख्याली खुशाली विचारुन महाराज निघुन गेले.ही मुकी जणावरे खरच काही त्रास देत नाहीत हो, जोपर्यंत माणुस त्यांच्या जिवाला धोका उत्पन्न करत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे ढुंकुन ही पहात नाहीत.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 03/24/2015 - 05:27 नवीन
मु़की जनावरे त्रास देत नाहीत हा गैरसमज आहे. माणसाच्या कुठल्या वागण्याने त्यांना आपल्या जिवाला धोका वाटेल हे सांगता येत नाही. अंधारात चुकून सापावर पाय पडला तर साप चावणारच. त्यात माणसाचा दोष नाही आणि सापाचाही नाही. पण तरी दोघे मरू शकतात. कुठल्या प्राण्याला नुकतेच पिल्लू झाले असेल तर आणि एखादा माणूस त्या आई आणि पिल्लाच्या मधे अनवधाने आला तर ती आई जीवावर उदार होऊन हल्ला करेल. मग ते अस्वल असेल वा बिबळ्यासारखा प्राणी असेल. हत्ती वा रानरेडा असला तर काय विचारायलाच नको! तेव्हा मुके प्राणी कारणाशिवाय हल्ला करत नाहीत हे खरे असले तरी आपली कुठली हालचाल त्यांच्या आक्रमणाला कारणीभूत ठरेल हे नेहमीच सांगता येत नाही. बर्‍याचदा ते कळेपर्यंत उशीर झालेला असतो. तेव्हा अशा प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे दोघांच्या हिताचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
न
नांदेडीअन Tue, 03/24/2015 - 06:43 नवीन
अंधारात चुकून सापावर पाय पडला तर साप चावणारच. त्यात माणसाचा दोष नाही आणि सापाचाही नाही.
माणसाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून कंदिल, टॉर्चसारख्या गोष्टींचा शोध लावलेला आहे. इतक्या अंधारात जर त्या गोष्टी वापरायच्या नसतील तर परत त्याच बुद्धीचा वापर करून त्याला अल्टरनेट ठरतील असे शोध लावावेत.

एखादा माणूस त्या आई आणि पिल्लाच्या मधे अनवधाने आला तर ती आई जीवावर उदार होऊन हल्ला करेल. मग ते अस्वल असेल वा बिबळ्यासारखा प्राणी असेल. हत्ती वा रानरेडा असला तर काय विचारायलाच नको!
ज्या जागी हे प्राणी आपल्या पिल्लांसोबत राहतात, तिथे माणसाने ‘अनावधानाने’ का जायचे ?

मुके प्राणी कारणाशिवाय हल्ला करत नाहीत हे खरे असले तरी आपली कुठली हालचाल त्यांच्या आक्रमणाला कारणीभूत ठरेल हे नेहमीच सांगता येत नाही.


मुक्या प्राण्यांच्याच बाबतीत कशाला, हे अगदी माणसांच्या बाबतीतसुद्धा लागू पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Tue, 03/24/2015 - 16:08 नवीन
>>माणसाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून कंदिल, टॉर्चसारख्या गोष्टींचा शोध लावलेला आहे. इतक्या अंधारात जर त्या गोष्टी वापरायच्या नसतील तर परत त्याच बुद्धीचा वापर करून त्याला अल्टरनेट ठरतील असे शोध लावावेत. >> कितीही शोध लावले तरी एका पावलापुरता जर माणूस बेसावध असेल तर काय करायचे? तेवढ्या अवधीत सापावर पाय पडू शकतो. जर साप चावण्याचे अपघात पाहिलेत तर बहुधा कुणीही आपणहून धोका पत्करत नाही. तो अपघातानेच घडतो. अशी चूक होताच कामा नये अशी अपेक्षा बाळगणे खुळचटपणाचे आहे. >> ज्या जागी हे प्राणी आपल्या पिल्लांसोबत राहतात, तिथे माणसाने ‘अनावधानाने’ का जायचे ? << ह्यातले अनेक प्राणी जसे हत्ती, रेडा, अस्वल हे कुठे "रहात"नाहीत. ते अनेक चौरस मैल परिसरात भटकत असतात. अन्नासाठी त्यांना तसे करणे भागच असते. आता एखादा पर्यटक, हायकर वगैरे जंगलात फिरत असताना, एखाद्या वळणावर, झाडाच्या आडोशामुळे, खडकामुळे अचानक प्राण्याच्या अगदी जवळ येऊ शकतो. माणसाचे नाक वा कान तितके तिखट नसतात. त्यामुळे हे होऊ शकते. अस्वलांचे, रेड्यांचे, हत्तीचे हल्ले ह्यांचे रेकॉर्ड तपासलेत तर हे स्वच्छ कळेल की हल्ला झालेली व्यक्ती जाणूनबुजून त्या स्थळी गेली नव्हती. निव्वळ अनवधानाने. हौशी भटक्यांचे जंगलात, डोंगरात भटकणे वा रानटी प्राण्यांचा मुक्त वावर ह्यापैकी कशावरही बंदी घालणे व्यवहार्य नाही. आणि तोवर असे अपघात होतच रहाणार. निदान आजवरचा इतिहास तरी हेच सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ब
बाबा पाटील Tue, 03/24/2015 - 09:13 नवीन
https://www.facebook.com/video.php?v=842399382466384&set=vb.300192306687097&type=2&theater
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Tue, 03/24/2015 - 09:49 नवीन
भयंकर क्लिप आहे ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
क
कपिलमुनी Tue, 03/24/2015 - 09:53 नवीन
दया आली त्यांची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
स
स्वप्नांची राणी Tue, 03/24/2015 - 10:50 नवीन
जिथे हे फीचर केले गेले ती सपेरा लोकांची वस्ती आहे. ही क्लीप शूट करतेवेळी, सापांचे अजून बारकाईने निरीक्षण करु द्यावे ही विनंती त्या लोकांनी धुडकावली होती. नंतर ह्या क्लीप वर एका सर्पतज्ञाचे स्पष्टीकरण आले होते. हे जे त्या मुलीच्या आजु-बाजुला फिरणारे साप-नाग आहेत त्या सगळ्यांची तोंडे शिवलेली आहेत, हे त्याने दाखवून दिले. तसेच ह्या मुलीपेक्षाही लहान, अवघा २ वर्षाचा मुलगाही साप असेच कसेही धरुन आपटत होता, खेळत होता.त्याला तर एका नागाने चक्क दंशही केला. त्याही बाबतीत त्या साप, नागांचे विषदंत काढून टाकलेले आहेत, हे सिद्ध केले होते. ईथे मला, मिपा वरच असलेली सापविषयीची एक मालिका आठवतेय. लेखक सर्पमित्र होते, भारतात असताना. त्यांनी एकेठीकाणी लिहीले होते की अचानक साप-नागाशी सामना करायची वेळ आली तर, तो विषारी आहे की नाही, याची शहानिषा करत बसण्यापेक्षा तिथून कलटी मारणे योग्य. किंवा अश्या परिस्थीतीत त्या सापाला मारणेही योग्यच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
अ
अत्रन्गि पाउस Tue, 03/24/2015 - 11:38 नवीन
http://www.misalpav.com/node/25603
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ब
बॅटमॅन Tue, 03/24/2015 - 16:12 नवीन
हे जे त्या मुलीच्या आजु-बाजुला फिरणारे साप-नाग आहेत त्या सगळ्यांची तोंडे शिवलेली आहेत, हे त्याने दाखवून दिले. तसेच ह्या मुलीपेक्षाही लहान, अवघा २ वर्षाचा मुलगाही साप असेच कसेही धरुन आपटत होता, खेळत होता.
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ज
जॅक डनियल्स Wed, 03/25/2015 - 00:25 नवीन
सगळ्या नागांची तोंडे शिवली आहेत नाही तर त्यांनी तोंड इकदा तरी उघडून जीभ काढली असती. अश्या किल्पस मुळेच खूप अंधश्रध्दा पसरतात. माझ्या एका नागपंचमी च्या लेखात मी हे गारुडी कसे तोंड शिवतात ते दिले आहे, खूप क्रूर आहे सगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
म
मार्मिक गोडसे Wed, 03/25/2015 - 07:45 नवीन
शिवलेल्या तोंडानी नाग खातात कसे? कि रोज खायला घालताना नागांचे तोंड मोकळे केले जाते. असे रोज करावे लागत असल्यास नागांना शारिरीक इजा व त्रास होत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स
ए
एस Wed, 03/25/2015 - 08:08 नवीन
शिवलेल्या तोंडांनी नाग काय, कुणीच काही खाऊ शकत नाही. असे साप भुकेने किंवा वेदनेने, सेप्टिक होऊन, न्यूमोनिया होऊन, अशा कारणांनी शेवटी मरतात. नागपंचमीला गारुड्याकडचा नाग दूध पितो हे सर्वांनी पाहिलेले असेल. वास्तविक पाहता नाग/साप हे सस्तन प्राणी नाहीत. ते दूध कधीही पीत नाहीत. मग दुधाची वाटी पुढे ठेवली असता नाग त्यात तोंड का घालतो? कारण नागपंचमीच्या आधी काही दिवस पकडलेल्या नागांना उपाशी ठेवण्यात येतं. त्यांची तोंडे अशा प्रकारे शिवली जातात. अन्नपाण्याविना व्याकूळ झालेला तो साप मग आपसूकच दूध प्यायला मजबूर होतो. दूध हे सापांचे नैसर्गिक अन्न नसल्याने त्यांना न्यूमोनिया होतो आणि काही दिवसांनी ते मरण पावतात. नाही लगेच मेले तर त्यांना त्याच तोंड शिवलेल्या अवस्थेत पुन्हा सोडून दिलं जातं. शेवट नाहीतरी हृदयद्रावक असतोच. इतका राग येतो की अशा लोकांची तोंडेही शिवली पाहिजेत असं वाटतं... :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ज
जेपी Tue, 03/24/2015 - 16:16 नवीन
हाफशेंच्युरीssss... जाऊ द्या आजचा कोटा संपलाय
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 03/24/2015 - 16:48 नवीन
एक एक क्रोकोडाईल स्किन ह्यांडब्याग देऊन सत्कार करून टाकाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ख
खटपट्या Tue, 03/24/2015 - 17:21 नवीन
आखिल भारतिय मगर बचाव संघटनेतर्फे मगरीचे अंडे देउन सत्कार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 03/24/2015 - 17:28 नवीन
मगरपट्टा सिटीतर्फे दोन मगरीच्या चामड्याचे पट्टे देऊन सत्कार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
य
यसवायजी Tue, 03/24/2015 - 17:43 नवीन
बत्तीस शिराळ्याकडून त्येस्सीस प्लेट शिरा देऊन सत्कार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/24/2015 - 19:06 नवीन
मगरपट्ट्यात एखादा ३ बी.एच.के. मिळत असता सत्कार समारंभात तर धाग्यात हिरिरिने भाग घेतला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सुबोध खरे Wed, 03/25/2015 - 07:02 नवीन
भंपक व्हिडियो काय सिद्ध करायचे आहे त्यात? सवंग लोकप्रियता सोडून? आणि हे नाग काय तिच्याशी खेळायला स्वतः आले होते? कि आपले तोंड शिवून घ्यायला? तुमचा खेळ होतो आणि आमचा जीव जातो याचे दुसरे वाईट उदाहरण सापडणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 03/26/2015 - 04:33 नवीन
मगर आणि सुसर यांत काय फरक आहे? की दोन्ही एकाच प्राण्याची दोन वेगळी नावे आहेत?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 03/26/2015 - 10:07 नवीन
सुसरीचा जबडा लांब असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 03/27/2015 - 04:12 नवीन
धन्यवाद! मला वाटलं, सुसरीची पाठ मऊ असते, असा प्रतिसाद येतोय की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Fri, 03/27/2015 - 04:30 नवीन
मगर Image removed. सुसर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
कपिलमुनी गुरुवार, 03/26/2015 - 09:24 नवीन
मगर धोकादायक असते . कृष्णा नदीमधे असलेल्या मगरींनी कित्येकवेळा हल्ले केल्याच्या घटना आहेत. नरसोबाच्या वाडीमधे कितीतरी बळी गेले आहेत. कदाचित नैसर्गिक भक्ष्यांच्या कमतरतेमुळे असेल पण मगरीने पोहणार्‍यांवर , कडेला धुणार्‍या बायकांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मगर ही धोकादायकच आहे. तिला मानवी अधिवासापासोन दूर पाण्याच्या ठिकाणी सोडला पाहिजे
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 03/26/2015 - 13:08 नवीन
म्हणजे तिथे लोक सतत ह्या शक्यतेत वावरतात ? आधी वर अमेरिकेत लोक मगरी दिसल्या कि परिस्थिती विशिष्ट प्रकारे हाताळतात ...इथे तसे नाही का ? त्यांना काही माहिती देता येईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
र
रॉजरमूर Wed, 06/10/2015 - 21:58 नवीन
हो चांगलीच दहशत बसलीय लोकांना हे वृत्त वाचा . का चवताळल्या कृष्णेतल्या मगरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
म
मदनबाण Mon, 04/06/2015 - 07:57 नवीन
नरसोबाच्या वाडीमधे कितीतरी बळी गेले आहेत. च्यामारी... या बद्धल मी कधी नाही ऐकल ते !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/06/2015 - 01:12 नवीन
माँ तुझे सलाम ! मगरीच्या जबड्यातून आईने केली मुलीची थरारक सुटका
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा