Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चिद्विलास (स्वैर भावानुवाद)

म — मूकवाचक, Wed, 03/25/2015 - 16:12
सहजसुंदर प्रेमाचे स्पंदन अनुभवत जागे व्हावे अन निसर्गाच्या नितांत सुंदर जादूगरीशी समरस होत आरामात पहुडावे ... चैतन्याच्या या अथांग सागरात मी काय तुम्ही काय आपण सारेच लाटांसारखे सतत उफाळत असतो आयुष्याच्या अनंत प्रवाहाच्या किनार्‍यालगत खेळताना हाती लागलेल्या चार थेंबांचे शिंतोडे एकमेकांवर उडवत तिथल्या सुंदर चकचकीत वाळूत ज्याने त्याने खुशाल आपापल्या स्वाक्षर्‍या कोरून काढाव्यात आणि समिंदराची हाक आली की पुढल्या भरतीच्या लाटेत त्या विरूनही जाव्यात, कारण ... रोज नव्याने त्याच किनार्‍याला अलगद बाहुपाशात घेणार्‍या दर्याची ही अनावर ओढ असते मुळातच अनादि अनंत! (मूळ काव्यः http://luthar.com/2015/03/25/rest-in-beauty-by-dr-harsh-k-luthar)

प्रतिक्रिया द्या
1428 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ब
बहुगुणी Wed, 03/25/2015 - 17:55 नवीन
मूळ रचनाही सुरेख आहे, minimalistic, कमीत कमी शब्दांत खूप आशय असलेली. तुमची निवड चांगली आहे!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/26/2015 - 03:54 नवीन
तुमची काव्यरुची अन हा भावनुवाद दोन्हीही आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 03/26/2015 - 05:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा