गोंधळ
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ.
असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली.
प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो . (सदर अवतरण आम्ही श्री रा रा बॅट्ट्मण लिखीत बोलीभाषेची सालपटे आणि अर्थाची फोलपटे एक तैलबुद्धी अभ्यास या थोर्र ग्रथांतून घेतले आहे तेव्हा त्याचे खुलाष्यासाठी लेखकमजकूरांशी संपर्क करावा ही विनंती.जाहीर अवांतर आपली जबाबदारी टळली.स्वगत अवांतर :बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे पुढचे तू बघ)
तर तूर्तास मिपा वारंवार बद पडत आहे आणि जालीय ईडापीडानिवारणार्थ* गोंधळ घालण्याचा संकल्प सोडला
(* खरडफळा उर्फ वाचकांची चावडी वरील खर्डींचा संदर्भ)
ह्या गोंधळासाठी कच्चा माल हेरण्यात श्री रा रा रा रा आत्मुदा (असेल धमक तर जोड यमक ह्या स्पर्धेत गेली चार वर्षे विजेते) आणि चौकटराजा (हिरव्या देठाचे कपूरी पान या तडाखेबंद कादंबरीचे सिद्दह्स्त लेखक) यांचे अमूल्य मार्गदशन झाले आहे
रूढ गोंधळात ग्रामीण स्थानीक देव्-देवतांना आवाहन केले जाते तसे या गोंधळात ही आहे.
!!गोंधळ !!
मिपाचा गोधळ मांडिला गोंधळाला यावे ||
उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे
तांब्यासवे जिल्बी पाडू गोंधळाला यावे ||
काडीसारू फुकटतमाश्या गोंधळाला यावे ||१||
माईंआडच्या नाना तुम्ही गोंधळाला यावे ||
बाईंआडच्या गणा गोंधळाला यावे ||२||
आपसातल्या उरबडवे गोंधळाला यावे ||
साप आतल्या शोधबडवे गोंधळाला यावे ||३||
पाकघरातल्या सुगरणींनो गोंधळाला यावे ||
माजघरातल्या गृहीणींनो गोंधळाला यावे ||४||
कुंपणावरच्या बघ्यांनो गोंधळाला यावे ||
मैदानातील पळपुट्यानों गोंधळाला यावे ||५||
पलीकडच्या धोबीघाटी गोंधळाला यावे ||
अलिकडच्या धूळ्चाटी गोंधळाला यावे ||६||
विचारजंती लेखपाडू गोंधळाला यावे ||
उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला यावे ||७||
अना फेम लाडोबा गोंधळाला यावे ||
अना फेम दोडोबा गोंधळाला यावे ||८||
विदावाले फापटपसारे गोंधळाला यावे ||
क्षुधावाले वारूणीवारे गोंधळाला यावे ||९||
लेखनमात्र विचारकारी गोंधळाला यावे ||
अचूकमात्र पिचकारी गोंधळाला यावे ||१०||
विलंबीत सन्यासग्रस्ती गोंधळाला यावे ||
अचंबित अन्यायत्रस्ती गोंधळाला यावे ||११||
अदा अदा जोजवी कविवृंदा गोंधळाला यावे ||
बदा बदा प्रसवी बोबडकांदा गोंधळाला यावे ||१२||
स्वघोषीत होऊ कैवारी गोंधळाला यावे ||
अघोषीत भेटू रैवारी गोंधळाला यावे ||१३||
नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे ||
नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४||
======================
पुढील कवने श्री रा रा जेपीम्हाराज (सन्यास फेम) आणि श्री बॅट्टमण यांनी रचावीत अशी जाहीर विनंती)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }राशींची काशी
" हे साप्ताहीक सदर चालवतोय आणि त्यातून्+सन्यासातून फुरसत नाहीय. जाता जाता जन हितार्थ. काल आकुर्डी कट्ट्याला अना फेम लाडोबा आणि अना फेम दोडोबा यांची तीव्रतेने आठवण काढली गेली याची संबधितांनी नोंद घ्यावी.