Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सये भांडतेस कशा..

क — कहर, Mon, 04/06/2015 - 14:41
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात ) सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा.. काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या । सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची । येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय । मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली । या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून मीठ उतरून टाक.. वारे पहाते वाकून । वारे पहाते वाकून, आहे गर्द तुझी खोली माळ केसात मोगरा, वाट पहा गंधाळली । वाट गंधाळली सरे, वीज कडाडे नभात दार उघडण्याआधी जरा बघ आरशात । बघ दिसे आरशात, तुझा साजन बरवा डोळ्या भिडताच डोळा, होई पदर हिरवा ।

प्रतिक्रिया द्या
3544 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
प्रचेतस Mon, 04/06/2015 - 15:11 नवीन
लई झ्याक.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/06/2015 - 15:24 नवीन
लै मस्त ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 04/06/2015 - 15:26 नवीन
;)
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/06/2015 - 15:36 नवीन
वाह!!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 04/06/2015 - 16:55 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 04/07/2015 - 00:33 नवीन
वाह!! आवडली कविता
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 04/07/2015 - 02:00 नवीन
झकास एकदम!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/07/2015 - 03:03 नवीन
सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 04/07/2015 - 05:34 नवीन
कवीता... _/\_
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 04/07/2015 - 14:07 नवीन
मस्त मस्त.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 04/07/2015 - 16:25 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
क
कहर Wed, 04/08/2015 - 05:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 04/08/2015 - 06:10 नवीन
फारच सुरेख कविता. अतिशय आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Wed, 04/08/2015 - 06:13 नवीन
///तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची । येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय ही रचना (फॉरमॅट) वेगळी म्हणूनच आवडली. मस्तच.....
  • Log in or register to post comments
च
चैत्रबन Wed, 04/08/2015 - 22:17 नवीन
आवडलीच :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा