यू. के. मधे फिरण्यासारखे ठिकाण
मंडळी, मी सध्या यू. के. मधे आहे. आणि माझी अर्धंगिनी आणी 3 वर्षाचे सुपुत्र इकडे 2 महिन्यासाठी येत आहेत. तर ह्या 2 महिन्यात आवर्जून बघावीत अशी लंडन आणि उर्वरित यू. के. मधली ठिकाणे सांगा (शक्यतो निसर्ग सुंदर ठिकाणे. म्यूज़ियम्स बघण्यात आम्हाला इंट्रेस्ट नाही).
जो लंडनला कंटाळला तो आयुष्याला कंटाळला असे कुणीसे म्हटले आहे ...हायला ! हे माझ्या अगोदर त्याला कसे बरे सुचले ?! ;) जुजुबी इंग्लिश वाचता येणार्यानेही फक्त सबवे मॅपच्या आधारे आठवडाभर तरी न चुकता आणी कंटाळा न येता मजेत हिंडत रहावे असे या अख्ख्या होल जगातले एकुलते एक शहर म्हणजे लंडन; असा आमचा साधार दावा आहे :) बर्याच पहाणेबल जागांच्या गर्दीत क्यू गार्डनला भेट द्यायला विसरू नका !