अशी कशी ग तु...........
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
असतेस दिवसभर डोळ्यात
अन रात्री स्वप्नांतही जागतेस...........
मी पहातो तुझे प्रातिबिंब
या चमचमणार्या नभात
कधी भेटतेस होउनी चांदवा
कधी चंदेरी चांदण्यात लपतेस..............
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
सजतेस अल्लड सरींनी
अलवार ओल्या मिठीत शहारतेस
मी मागतो तुझा इशारा
या चिंब भिजणार्या पावसात
कधी वेढतेस तुझ्या आवेगाने
कधी अलगद ओंजळीत साठतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
मोहरतेस आसमंत अस्तित्वाने
हवा तुझ्या श्वासाने गंधाळतेस
मी हरवतो तुझ्या असण्याने
या तुझ्या मंतरलेल्या जगात
कधी भुलवतेस हरएक अदेने
कधी नुसत्या नजरेनेच नशावतेस......
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
रहातेस गुपचुप हृद्यात
सदा आठवणींच्या उंबर्यात रेंगाळतेस
मी शोधतो तुझ्या सयेला
या एकांती उरल्या शिवारात
कधी हरवतेस मावळतीच्या रंगात
कधी पापण्यांच्या किनारी अडतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }