Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाटक वाटू नये

ग — गंगाधर मुटे, Tue, 04/07/2015 - 15:57

नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

पिकल्या फळांनी लदबदलेले, रान जरी मोकळे
हवे तेवढे भरपूर खावे, फुटवे छाटू नये

सगे-सोबती गाळून घे तू, 'अभय' घप्प मनाने
बिनकाम्यांची अवतीभावती, गर्दी दाटू नये

                             - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==


प्रतिक्रिया द्या
1678 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पॉइंट ब्लँक Tue, 04/07/2015 - 19:08 नवीन
सुंदर कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/08/2015 - 09:14 नवीन
लिहित राहाच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 04/08/2015 - 14:43 नवीन
खूपच सुंदर लिहिता तुम्ही!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा