Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी

व — वेल्लाभट, Wed, 04/08/2015 - 13:34
महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं. आता गेले काही वर्ष, मराठी आणि मुंबई बाबत जे घडलंय, घडतंय, त्यावर सुचलेलं हे मुक्तक. देशभरातून लोक मुंबईत आले मुंबईला 'आपलंसं' करत गेले मुंबईने त्यांना आपलं मानलं त्यांनी मुंबईला 'आपलंच' मानलं आपण आपलं बघितलंच नाही त्यांना त्यांचं सांगितलंच नाही आपले राजकीय पक्ष आले आपल्यातच ते भांडत गेले आपलं कुणी ऐकलंच नाही आपल्याला कुणी विचारलंच नाही आपण आपलं सोडत गेलो वाकत गेलो मोडत गेलो आपलं सुद्धा ते आमचं म्हणाले तेंव्हाही आपण गप्पच राहिलो उशीर फार झाला होता तेंव्हा काळ आला होता आपली 'मनं' जुळलीच नाहीत आपल्याला ती कळलीच नाहीत आता आपलंच हिसकावून नेत आहेत ते त्यांना हवं ते घेत आहेत ते वर आपल्याला दटावणारे काल आपले मानले तेच आहेत ते आता आपण आपलं बोललो तर राग येतो त्यांना आपल्यालाच गप्प बसवायचाही धीर होतो त्यांना चूक आपलीच मोठी झाली आपण शोधत बसलो आपला वाली आता तरी समजू का आपण की आता एकी दाखवायची वेळ आली? सक्ती काय कायदे काय नियम कसले करणार जिकडे तिकडे गळचेपी आहे कसे आपण तरणार ठरलेल्या त्या सणांना 'ट्रॅडिशनल' होणार आम्ही आणि 'माज आहे मराठीचा' टिशर्टवर लिहून फिरणार अवघं मैदान गेलंय आता घर तेवढं वाचवायला हवं इंग्रजीवर पकड हवीच पण आधी मराठी शिकवायला हवं मुखात असेल मराठी तर ती मनात असण्याला अर्थ आहे मनातच ती नसेल तर आपला मराठी जन्मच व्यर्थ आहे - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
2678 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
कविता१९७८ Wed, 04/08/2015 - 13:43 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/08/2015 - 13:49 नवीन
हेच म्हणतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/08/2015 - 14:57 नवीन
मस्तं.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 04/08/2015 - 15:01 नवीन
मान गये वेल्लाकाका!! जे ब्बात!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 04/09/2015 - 07:16 नवीन
कविता, मदनबाण, कॅप्टन, सूड धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/09/2015 - 07:29 नवीन
लय भारी...पण ते "माज आहे मराठीचा" खटकले...माज करणारा समोरचा कोण आहे हे न बघता माज करतो...त्यात मराठी अ-मराठी असे काहीही नसते...उ.दा. रिक्षावाले, सर्कारी कर्मचारी, मामालोक, बाईकवर झेंडे लाउन फिरणारे,....लिस्ट बरीच मोठी आहे
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 04/09/2015 - 08:08 नवीन
मला तुझा मुद्दा नाही कळला टका. 'गर्व नाही; माज आहे मराठी असल्याचा' वगैरे उक्त्या असलेल्या टी शर्टचं उदाहरण दिलं मी. माज करण्याचं नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/09/2015 - 08:22 नवीन
अर्रे हो...गल्तीसे मिश्टेक...आय माय स्वारी बर्का...सकाळी घाइघाइत वाचलेली आणि ऑफिसात आल्यावर पर्तिसाद लिहिला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 04/09/2015 - 08:09 नवीन
आणि धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु गुरुवार, 04/09/2015 - 08:27 नवीन
मुखात असेल मराठी तर ती मनात असण्याला अर्थ आहे मनातच ती नसेल तर आपला मराठी जन्मच व्यर्थ आहे
परवाचा इंग्रजी कलगी-तुरा पाहता हा बाण मर्मभेदी आहे आशयघन मुक्तकाव्य
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 04/09/2015 - 09:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 04/09/2015 - 10:43 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/09/2015 - 10:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा