Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रस्ता...

श — शब्दबम्बाळ, Wed, 04/08/2015 - 14:49
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना मी कधी फार अडखळलोच नाही, किंवा अडचणी काय असतात हे पाहायला, रस्त्याच्या त्या बाजूला मी कधी गेलोच नाही… त्यांच जगणं तर मी रोजच पाहायचो, जगणे ही लढाई आहे हे रोजच अनुभवायचो, पण लढाईत त्यांची कुमक करायला मी कधी धजावलोच नाही, कदाचित हरण्याच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही… चटणी बरोबर पण जेवता येत हे मला माहीतच नव्हतं, कधी कधी भुकेची आग शमवायला त्यांना पाणी देखील पुरेसं होत, पण जेवणात मीठ कमी म्हणून टाकून द्यायला मी कधी वरमलोच नाही, कदाचित उपासमारीच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही… त्यांच्यासाठी डोक्याचा वापर फक्त ओझी वाहून न्यायलाच होता, त्यात असलेला मेंदू जणू त्या ओझ्याखालीच दबला होता, तरी त्यांना मूर्ख ठरवताना मी कधी शरमलोच नाही, कदाचित मूर्ख ठरण्याच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही… स्वतःच्या आयुष्यात सुख आणताना मी त्यांच दुःख कधी पाहीलंच नाही, त्याचमुळे असेल कदाचित स्वतःच सुख कधी जवळच वाटलंच नाही, मेंदूच्या मार्गाने जाताना मी मनाचं कधी ऐकलच नाही, आता प्रश्न पडतो, का रस्त्याच्या त्या बाजूला मी कधी गेलोच नाही… -आशिष

प्रतिक्रिया द्या
956 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ए
एक एकटा एकटाच Wed, 04/08/2015 - 18:00 नवीन
छान मांडलय
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/09/2015 - 05:54 नवीन
अप्रतिम...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा