Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रोगप्रतिबंधात्मक उपाय २

आ
आयुर्हित
गुरुवार, 04/09/2015 - 09:57
🗣 88 प्रतिसाद
रोगप्रतिबंधात्मक उपाय १ व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते. आपल्याला जर अधिक सुखी, अधिक आनंदी व्हायचे असेल तर मात्र आपण स्वत: (वेळेआधी) ठरवून जे हवे ते (कालांतराने) मिळवू शकतो. याचाच अर्थ मनुष्यजीवनात काय हवे आहे ते आधी ठरवावे लागते व नंतर आपण ठरवलेले मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते. आपल्याला नेहमी हवे असलेले चांगले आरोग्यही असेच मिळवावे लागते. आपल्याला लागणारे चांगले आरोग्य हे काही कोणत्या दुकानात किंवा मॉल मध्ये उपलब्ध होत नसून ते मिळवण्यासाठी त्यासाठी आधी ठरवावे लागते, मग भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते. ते कोणी आपल्याला आणून देत नाही, किंवा आपल्याला मिळेल याची कोणी संपूर्ण जीवनभर(व एकदा घराबाहेर पडल्यावर) काळजी घेऊ शकत नाही. मान्य आहे, आपल्याला कुटुंबासाठी व कंपनीत नेमून दिलेल्या कामासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. समजा आपण खूप व्यस्त आहात आणि आपल्याला स्वत:ला आरोग्य चांगले रहावे यासाठी द्यायला (जो काही अर्धा ते एक तास)वेळच भेटत नाही. अशा परिस्थितीत जर आपल्यावर संपूर्ण कुटुंब व कंपनी अवलंबून असेल अशात जर जर मी आजारी पडलो व काही दिवस/ आठवडा/ महिने/ वर्षभर माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल माझ्या कुटुंबाचे व कंपनीचे/ माझ्या नोकरीचे/ माझ्या व्यवसायाचे? आणि जर मी काम करण्यास असमर्थ ठरलो तर कोण काळजी घेईन माझ्या कुटुंबाची? माझ्या नोकरीची? माझ्या कंपनीची/व्यवसायाची? यामुळे स्वत:ला निरोगी ठेवणे ही देखील सर्वात मोठी जबाबदारीच होवून बसते. आणि जर आपण स्वत: निरोगी व परिणामी अधिक आनंदी राह्यलो तर आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला व कंपनीला अधिकाधिक फायदा व तोही जास्त दिवस/वर्षे मिळत राहणार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे इतर कोणतेही कारण न देता, स्वत:ला न फसवता, आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी "जे काही आवश्यक असे ते सर्व" आवर्जून केलेच पाहिजे व पुरेसा वेळ दिलाच पाहिजे. जर आपण आपल्या स्वत:च्या आनंदासाठी जर वेळ देवू शकत नसलो तर मग आपण नेमके कोणासाठी जगत आहोत हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारला पाहिजे! आपण न थकता, न सुट्टी घेता कुटुंबाची/कंपनी व व्यवसायाची पार पाडत असलेली जबाबदारीही आता ह्या आनंदाचा एक भाग आहे. आता आधीच्या लेखात दिलेली आजारी पडण्याचे सर्व कारणे परत एकदा पाहू या व प्रत्येक कारणाआधी मला, माझे, मी ठरवलेले, मी मान्य केलेले असे शब्द वापरले तर काय होते/होईल ते पहा. मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने १) माझे वय २) माझे लिंग ३) माझ्या आहारातील घटक ४) माझी आहार घेण्याची वेळ ५) माझी आहार घेण्याची सवय ६) माझ्या घरात/मी जात असलेल्या खानावळीत आहार तयार करण्याची पद्धत ७) माझ्या आहारातून शरीरात शोषले जाणारे पौष्टिक घटक ८) माझी शैक्षणिक पार्श्वभूमी ९) माझा व्यवसाय १०)माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आरोग्य ११)माझ्या कुटुंबातील पूर्वजांच्या आजारांचा इतिहास १२)माझा समंजसपणा १३)माझा मानसिक दृष्टीकोन १४)माझ्या घरातील भावनिक वातावरण १४)मी घेत असलेला/ली आराम व झोप १५)मी करत असलेला शारीरिक व्यायाम १६)मी करत असलेले योगासने व प्राणायाम १७)माझी मानसिक व्यग्रता १८)माझे धार्मिक संस्कार व मान्यता १९)माझ्या कर्मावरील माझा विश्वास २०)स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची माझी प्रवृत्ती २१)माझी वैयक्तिक स्वच्छता २२)माझ्या वातावरणातील रासायनिक प्रदूषण २३)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग २४)मी निवडलेली संगत २५)माझ्या स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र २६)मी खातो त्या खाद्यान्नातील जैविक शक्ती २७)माझ्या आजारांवर केले/घेतले जाणारे वरवरचे/चुकीचे/प्रदीर्घ/अपूर्ण उपचार २८)माझ्यावर होवू घातलेल्या आवश्यक व अनावश्यक शस्त्रक्रिया ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते. यावरून असे लक्षात येईल कि आज जी काही परिस्थिती उद्भवली आहे किंवा उद्या उद्भवणार आहे ती संपूर्णतः माझ्या स्वत:च्या इच्छेनुसारच होणार आहे व त्याचे परिणाम आपण स्वत:, आपले कुटुंब व आपली कंपनीच/ आपला व्यवसायच भोगणार आहात. नंतर दुसऱ्या कोणाला दोष देवून बळीचा बकरा जरी बनवायला जाल तरी त्याआधी तुमचा स्वत:चा व कुटुंबाच्या आनंदाचा, कंपनीच,/नोकरीचा वा व्यवसायाचा बळी गेलेला असेल. जर आपले आयुष्य हे जर क्षणभंगुर आहे तर सदैव निरोगी रहाणे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे आता मान्य करावेच लागेल. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जाहीर करा कोण कोण स्वत:ला निरोगी आयुष्य देण्याचे ठरवते आहे ते.....

प्रतिक्रिया द्या
16940 वाचन

💬 प्रतिसाद (88)
ट
टवाळ कार्टा Fri, 04/10/2015 - 07:20 नवीन
माझे ब्रँडनेम वापरून बर्याच नकली गोष्टी मार्केटमध्ये/मिपावर येत आहेत...नक्कल करणार्यांपासून सावधान...फक्त आणि फक्त माझेच प्रतिसाद असली आहेत :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Fri, 04/10/2015 - 07:51 नवीन
मान+धन यासाठी बोलणी चालू आहेत तोपर्यंत नावनोंदणी तरी करू दे रे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 04/09/2015 - 19:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/09/2015 - 17:49 नवीन
बर्रर्रर्र!!! मग 'म' चा 'क' केल्यावर काय सांडले?? (नुसत्या प्रतिक्रिया?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/09/2015 - 17:52 नवीन
ठ्ठो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
भ
भीडस्त गुरुवार, 04/09/2015 - 18:51 नवीन
' 'म' चा 'क' ' केल्यावर काय सांडणार पैलवानभौ ;-) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
सूड गुरुवार, 04/09/2015 - 19:32 नवीन
'म' चा 'क'
माताय!! कायतरी शब्दरचना जुळून आलीय!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/09/2015 - 19:58 नवीन
@'म' चा 'क' केल्यावर काय सांडले?? (नुसत्या प्रतिक्रिया?) >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ब
बॅटमॅन Fri, 04/10/2015 - 08:58 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) नेमके हेच्च्च मनात आले होते =)) काय जुळून आलीये शब्दरचना =)) इंटेंडेड तर नव्हती ना हो एक्काकाका =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
न
नंदन गुरुवार, 04/09/2015 - 20:16 नवीन
आता इथे 'म' चा 'क' केला गेला आणि बदाबदा प्रतिक्रिया सांडत आहेत ! ;)
उगीचच फ्रेंचमध्ये ज्याला 'किंचित मृत्यू' म्हणतात, ते आठवले. (विकीचा दुवा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Fri, 04/10/2015 - 07:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
य
यसवायजी गुरुवार, 04/09/2015 - 18:04 नवीन
त्यानिमित्ताने अता "मी माझा तर माझा कुणाचा" या अतिसुप्रसिद्ध कवितासंग्रहाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 04/09/2015 - 18:39 नवीन
अता हा सु-प्रसिद्ध का-व्यसंग्रह कोणा-चा आहे? दु-वा दे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/09/2015 - 18:46 नवीन
सुर्यकान्ट खोकले नावाचे सुप्रसिध्द कवी आहेत त्यांचाच आहे तो कविता संग्रह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
काळा पहाड Fri, 04/10/2015 - 11:27 नवीन
पूर्वी कवींची नावं काय सुंदर असायची: कुसुमाग्रज, ग्रेस, गुलजार. आता 'खोकले'? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Fri, 04/10/2015 - 11:30 नवीन
त्यात गोखले आणि खोकले या दोन्ही नावांचे स्पेलिंग येकच येक आहे. =)) 'पोएटिक' जस्टिस यालाच म्हणावे की काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ह
हाडक्या Fri, 04/10/2015 - 11:45 नवीन
"मी माझा तर माझा कुणाचा"
"माझा" आता "कोकाकोला"ने घेतलाय म्हणे.. ;) (घेण्याचा योग्यच अर्थ घ्यावा..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 04/10/2015 - 11:46 नवीन
खिक्कं!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ख
खंडेराव Fri, 04/10/2015 - 11:48 नवीन
विषयाला वाचा फोडल्याबद्दल लेखकरावांचे आणि धागा ६१ पर्यंत पोहोचवल्याबद्दल इतरांचे अभिणंदण. जेपिसाहेब, कुठे आहात, सत्कार वगैरे हाय काय नाय काय?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 04/10/2015 - 11:53 नवीन
१०० होउंद्या की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
प
पॉइंट ब्लँक Fri, 04/10/2015 - 11:57 नवीन
व्हय १०० व्हायाच पाइजे! नशीबाची साथ किती जरूरू असते आणि धाग्याचा यशामध्ये वाचकांचा किती मोठा हातभार ( हिते मनावर ब्रेक लावणे ) असतो ह्याचे हे सर्वोत्तम उदाहरण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ह
हाडक्या Fri, 04/10/2015 - 12:25 नवीन
मनावर ब्रेक
ह्यावरुन आठवलं. ते मनोबा दिसत नैत इकडे हल्ली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
स
सूड Fri, 04/10/2015 - 12:28 नवीन
मनावर ब्रेक वरुन तुम्हाला मनोबा आठवले? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ज
जेपी Fri, 04/10/2015 - 17:43 नवीन
ओ ...ते जेपि नाय जेपी हाय गल्लत करु नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 04/14/2015 - 14:16 नवीन
मग होऊन जाउद्या की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ल
लॉर्ड फॉकलन्ड Fri, 04/10/2015 - 16:55 नवीन
एकदम कॉमेडी लिहिलय.खुप जास्त गोष्टी लिहिल्यात.फक्त खालील पॉइन्ट्स हवे होते.
मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने १) माझे लिंग २) माझी घेण्याची वेळ ३) माझी घेण्याची सवय ४) माझा व्यवसाय ५)माझी वैयक्तिक स्वच्छता ६)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग ७)मी निवडलेली संगत ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Fri, 04/10/2015 - 18:25 नवीन
मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने १)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग २)मी निवडलेली संगत ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉर्ड फॉकलन्ड
ज
जेपी Fri, 04/10/2015 - 17:03 नवीन
प्रतिक्रीया वाचुन निर्वाण पावलो...=)) अवांतर -स्वर्ग दिसला का असे विचारु न ये.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 04/10/2015 - 18:29 नवीन
निर्वाण पावण्यावर एक लेख येउद्या १०० करायची लेखी हमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
त
तुषार काळभोर Sat, 04/11/2015 - 09:39 नवीन
नाही विचारणार. कारण त्यासाठी "स्वतः करावे लागते!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
पॉइंट ब्लँक Sat, 04/11/2015 - 11:58 नवीन
पैलवान भाउ आपण जिकलेले आहात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
आ
आदूबाळ Fri, 04/10/2015 - 17:17 नवीन
ये कंपनी कंपनी क्या है, ये कंपनी कंपनी?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/11/2015 - 12:08 नवीन
@व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते...............................................................................................................................................................................................जर आपले आयुष्य हे जर क्षणभंगुर आहे तर सदैव निरोगी रहाणे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे आता मान्य करावेच लागेल. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जाहीर करा कोण कोण स्वत:ला निरोगी आयुष्य देण्याचे ठरवते आहे ते.....>>> ब्वॉर! तुमचं प्रॉडक्ट काय? ते बोला की मग आता! ;)
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Sat, 04/11/2015 - 12:31 नवीन
एक व्य नी करण्याचा झैर चर्चेचा काम संपलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पॉइंट ब्लँक Sat, 04/11/2015 - 13:33 नवीन
सरळ मुद्द्यालाच हात घातला की राव! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
त
तुषार काळभोर Mon, 04/13/2015 - 06:37 नवीन
नाय ओ!! धिस इज कॉल्ड "धोतराला / कासोट्याला हात घालणं!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/13/2015 - 06:43 नवीन
धिस इज कॉल्ड "धोतराला / कासोट्याला हात घालणं!"
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 04/13/2015 - 07:31 नवीन
ह्या लेखाचा पुढचा भाग आलेला आहे. टंकनकंडुग्रस्तांनी लाभ घ्यावा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा