Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काळरात्र....!!!!!

ए — एक एकटा एकटाच, Sat, 04/11/2015 - 19:43
लहानपणापासून पहात होतो मी तिला लोक सांगायचे कि ती वेडी आहे खायला काळ आणि भुईला भार अशी एक बिन अकलेची घोडी आहे मेंदूने असहकार पुकारला असला तरी शरिराने आपल कर्तव्य बजावलं होतं तिच्या निरागस मनाला न जुमानता तिला ज्वानीच्या बाजारात आणलं होतं एका ओल्या काळरात्री गावाच्या वेशीवर ती भांबावलेली सैरभैर रडवेली दिसली मला पहाताच " आई गर्दीत हरवली" निरागसपणे सांगुन दात विचकून हसली अश्याच संधीच्या शोधात मी देखील होतो म्हटलं मनात की शिकार आयतीच गवसली क्षणातच तिच्या गोबर्‍या गालावर वळ उमटले मुस्काट दाबून तिला झुडूपांत फरफटवली पाऊस आता बेभान कोसळत होता मला अडवायला जिवाचे रान करत होता त्याच्या राज्यातले हे वासनेचे कौर्य पाहुन चंद्र ही ढगांच्या आड तोंड लपवत होता बर्‍याच वेळाने तो बिभीत्स खेळ थांबला धरणी हळहळली,आसंमतानेही निषेध नोंदवला त्या विटंबित झालेल्या कलेवराची निर्जीवता बघुन माझ्याही काळजाचा ठोका चुकला सावरताच स्वतःला घडलेल्या कृत्याची सल बोचली आपल्या पापाचा पुरावा तिथेच गाडुन धूम ठोकली थोडे दिवस चाललेली गडबड बिनबोभाट थंडावली त्यावेळी मी ही सुखावलो "चला नसती ब्याद टळली" त्या रात्री केव्हातरी गडगडाटाने दचकून जाग आली पाहिल तर बाहेर पाउस अन कोपर्‍यात ती उभी होती विजेच्या लखलखाटात ओठांवर गहिर हास्य नाचवत थिजलेल्या डोळ्यांनी पहात, दात विचकून हसत होती.

प्रतिक्रिया द्या
5583 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ट
टवाळ कार्टा Sat, 04/11/2015 - 20:01 नवीन
आयला...तो स्पा एक न आता तुम्ही मिपावर भयकथांचा मोसम सुरु झाला कै
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/11/2015 - 21:51 नवीन
@मिपावर भयकथांचा मोसम सुरु झाला कै>> अगदी अगदी..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पॉइंट ब्लँक Sun, 04/12/2015 - 03:21 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ए
एक एकटा एकटाच Sun, 04/12/2015 - 06:20 नवीन
भयकथांचा मौसम....... खरच करायला काय हरकत आहे. विनोदी कथा प्रवास वर्णन व्यक्तीचित्रण ललित ह्याप्रमाणे भयकथा ह्यासाठी एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. धारप, मतकरी त्याच बरोबर मिपा वरचे ही बरेच लेखक उत्कृष्ट भयकथा लिहितात. निदान एका थोड्या काळापुरत तरी आमच्यासारख्या भयकथा वाचणार्यांची चैन होईल. बाक़ी प्रतिसादासाठी मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
स्पा Sun, 04/12/2015 - 04:49 नवीन
बाब्बॊ भयकविता पयल्यांदाच वाचली. डेंज्जर
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 04/12/2015 - 06:28 नवीन
धन्यवाद "स्पा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ज
जडभरत Tue, 06/30/2015 - 07:23 नवीन
भयानक रसात पार बुचकळून काढलेली कविता आहे. ३ए भाऊ, तुम्ही भयकथा का लिहित नाही. मस्त लिहाल याची खात्री आहे. असो, पण खूप छान सुचली आहे. (कविता ही लिहिली जात नसते, ती सुचतच असते, बरोबर नं!). अशी अनेक खरी उदाहरणं आहेत. कवितेला छान म्हणणं बरोबर नाही, कारण जे कथानक आहे, ते खरंच मनाला भयचकित करणारं आहे.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 06/30/2015 - 08:29 नवीन
विदारक सत्य. अशा घटना अगदी राजरोस घडू शकतात हे केवढं दुर्दैव.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Tue, 06/30/2015 - 08:49 नवीन
पुढे काय झालं ? खरंच मी पा वर भयकथा , गुढकथा आहेत आहेत . कुणीतरी मनावर घ्या कि लिहायचं
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 06/30/2015 - 16:53 नवीन
माझ्या माहितीत तरी मिपावर स्पा आणी विशाल कुलकर्णी ह्यांच्या भयकथा वाचा मजा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ए
एक एकटा एकटाच Tue, 06/30/2015 - 16:54 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 06/30/2015 - 17:26 नवीन
भयानक सत्य
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 07/18/2015 - 06:13 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 07/18/2015 - 11:39 नवीन
अतिशय प्रभावी लिहिलय. भयानक रस आणि करुण रस यांचं जबरदस्त मिश्रण.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 07/18/2015 - 12:24 नवीन
कविता थेट पोचते आहे! त्रासदायक...
  • Log in or register to post comments
व
वडाप Sun, 07/19/2015 - 06:55 नवीन
खुनी कवी मोकळ्या डोसक्यानी हितंबी फिरतायेत.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Wed, 07/22/2015 - 13:15 नवीन
एक एकटा एकटाच, तुमचं जेवढं पण लेखन मी मि . पा वर वाचलंय ते सगळंच आवडलं . लिवा अजून . मस्त लिवताय
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 07/22/2015 - 17:08 नवीन
छान म्हणावस वाटत नाही पण कविता प्रभावी आहे!
  • Log in or register to post comments
र
रसिकामहाबळ Fri, 01/22/2016 - 23:35 नवीन
ही तुझि सर्वात मस्त कविता आहे अमोल my all time favorite
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 01/23/2016 - 17:34 नवीन
धन्यवाद रसिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रसिकामहाबळ
ए
एक एकटा एकटाच Sat, 01/23/2016 - 17:35 नवीन
सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 01/24/2016 - 06:31 नवीन
मिपावरच्या बेस्ट कवितांपेकी ही एक! जबरदस्त लिहीलीयं! सुचलेल्या संधीचं सोनं केलंयं! जियो!!!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 01/27/2016 - 23:02 नवीन
धन्यवाद मालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
द
दिनु गवळी Sun, 01/24/2016 - 07:28 नवीन
असे प्रसंग घडतात पन या जगात कविता आवडली
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 01/27/2016 - 23:02 नवीन
जव्हेरगंज आणि दिनु साहेब प्रतिसादासाठी आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा