Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन

म
माहितगार
Sun, 04/12/2015 - 07:00
🗣 53 प्रतिसाद
आंतरजालीय वेबसाईट्स आणि सुविधा या सध्याच्या आंतरजालीय जोडणीची सर्वांना समान दर आकारणी आणि उपलब्धता एवजी प्रत्येक वेबसाईट आणि सुविधांवर आधारीत दर आकारणीस आणि उपलब्धतेस इंटरनेट सर्वीस प्रोव्हायडर्सना स्वातंत्र्य देण्या बाबत भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI ने ह्या कन्सल्टेटीव्ह पेपर अन्वये २४ एप्रील २०१५ च्या आत advqos ॲट trai.gov.in या इमेल पत्त्यावर जनतेकडून मते मागवली आहेत. नवीनतम धोरण TRAI ने स्विकारल्या भारतातील Net neutrality कशी धोक्यात येईल आणि त्याचे परिणाम आणि विरोध इत्यादी बद्दल इतर चर्चा सध्या आंतरजालावर होऊ लागली आहे. '''विकिपीडियाच्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास''' ''ज्ञानविषयक लेखनात ज्ञानकोशीय लेखनाचा मोठा भाग आहे. नेट न्यूट्रॅल आंतरजालाच्या सुविधेमुळे कुणीही शोध घेऊन संदर्भ देऊन ज्ञान विषयक लेखन अगदी त्यांच्या ब्लॉगवरही किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर संस्थळावर सुद्धा करू शकतो करतात. ज्ञानविषयक माहिती शोधण्यासाठी आणि संदर्भादी गोष्टी नमुद करण्यासाठी सर्वसंस्थळांना मुक्त अ‍ॅक्सेसच उपलब्ध नसेल तर आंतरजालाच्या माध्यमातून आज जी ज्ञानविषयक लेखनात मोठी वाढ झालेली आहे त्याची प्रगती आणि सोबतच मुक्त ज्ञानकोशांची प्रगती खुंटेल किंवा कसे ? असा प्रश्न पडतो आहे.'' माझ्या माहितीनुसार विकिमिडीया फाऊंडेशन नेटन्यूट्रालिटीच्या मुद्याला पुरेसे महत्व देते. या चर्चा विषयाबाबत आंतरजालावर मराठीतून कितपत माहिती आहे याची कल्पना नाही. ऐसी अक्षरे या मराठी संस्थळावर काही चर्चा दिसते. आपण आंतरजालावर इंग्रजीतून संबंधीत बातम्या आणि मते शोधू शकाल. TRAI ने त्यांना आलेले सर्व (लाखो) प्रतिसाद ऑनलाईन पब्लिश केले आहेत. यात सर्वीस प्रोव्हायर्सच्या कॉमेंट्सचा वेगळा गटही उपलब्ध करून दिला आहे. या प्रतिसादांचा प्रतिवाद advqos अ‍ॅट trai.gov.in या इमेल पत्त्यावर ८ मे पर्यंत कळवायचा आहे. ज्या लोकांनी अद्याप प्रतिसाद पाठवले नाहीत त्यांच्यासाठी ही आणखी एक संधीच म्हणता येईल. (हा परिच्छेद नव्याने जोडला -२८-४-२०१५) प्रश्न भारतीय धोरणांच्या संबंधाने असल्यामुळे ज्ञान आणि माहिती विषयक लेखन करणार्‍या आणि वाचन करणार्‍या भारतीयांनी या बाबत उचित भूमिका घेण्याची गरज आहे आणि म्हणून TRAI (इमेल: advqos ॲट trai.gov.in) कडे आपापली मते नोंदवण्याचे आवाहन आहे.

प्रतिक्रिया द्या
23116 वाचन

💬 प्रतिसाद (53)
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 09:12 नवीन
ह्या टिप्पणीविरोधात आम्ही फेसबुक सोडतोय. देशाचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही. चीनसारखं आपलं स्वत:चं फेसबुक तयार करुयात. Image removed. (स्नॅपडील अनइन्स्टाल करणारे किती लोक मला फॉलो करतात बघू आता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 09:20 नवीन
ह्या बाबतीत मंग आम्ही एक नंबरनं देशभक्त अन काळा म्हावरे पायनारे होतो डांगे ब्वा!! आम्हीनं नोकरी लागल्या बरोबरच फेसबुक ले आयुष्यातनं काढून टाकलं!! :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 09:27 नवीन
=)) __/\__ आमच्या कामामुळे र्‍हा लागत होतं. आता आमचं आम्ही बगुन घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा