Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अजुनी रुसूनि आहे

स
सचिन
Sun, 04/12/2015 - 15:26
🗣 3 प्रतिसाद
कवी अनिलांच्या "आजुनी रुसूनी आहे " या अत्यंत भावस्पर्शी गीताबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कुमारांनी हे अजरामर गीत आपल्या सर्वांपर्यंत पोचविले . असे म्हणतात की ही कविता अनिलांनी त्यांच्या पत्नी कुसुमावती यांचे दु:खद झाले त्यावेळी लिहिली . हे मी देखील कित्येक वर्षांपासून ऐकून आहे आणि मानत आलो आहे. मध्यंतरी काही ठिकाणी असे वाचनात आले, की वस्तुस्थिती तशी नसून हे गीत त्यापूर्वीच केव्हातरी लिहिले होते. इतक्या वर्षांची माझी समजूत चुकीची होती कि काय ? जाणकार प्रकाश टाकतील काय ?

प्रतिक्रिया द्या
3827 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अत्रन्गि पाउस Sun, 04/12/2015 - 16:58 नवीन
ह्यावर लिहिलेले आहे अनिलांनी गजेंद्रगडकर ह्यांना सांगितले कि हि कविता त्यांनी स्वत:च्या प्रतिभेला उद्देशून लिहिली आहे .. कुसुमावती बाई त्यावेळी हयात होत्या ...
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 04/12/2015 - 19:33 नवीन
धन्यवाद !! अजूनही कोणास काही माहिती असल्यास कळवावी.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 04/13/2015 - 04:40 नवीन
मला कुठेतरी वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे अनिलांनी ही कविता त्यांच्या मित्राच्या मुलासाठी लिहिली होती. तपशील आत्ता नाहीत, पण मिळवून सांगतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा