गिरनार मोहीम
💬 प्रतिसाद
(33)
स
सौन्दर्य
Mon, 04/13/2015 - 15:55
नवीन
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 04/13/2015 - 16:12
नवीन
मस्त लेख. फोटो अजून असायला हवे होते लेखात.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/13/2015 - 17:52
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Mon, 04/13/2015 - 16:21
नवीन
चांगली माहिती ,
त्यावरून हा एक धागा आठवला .
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Mon, 04/13/2015 - 17:24
नवीन
छान माहीती, एकदा जायला हवे
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 04/13/2015 - 17:51
नवीन
फोटो पुरलेच नाहीत. शॅ!
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Mon, 04/13/2015 - 18:35
नवीन
मिपावर फोटो अपलोड करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे फक्त निवडक फोटो अपलोड केले. अजून काही चांगले फोटो आहेत ते लवकरच लोड करीन म्हणतो. प्रतिसादांबद्दल आभार.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 04/13/2015 - 18:43
नवीन
बापरे!! फारच अवघड दिसतय हे प्रकरण!
लेखन आवडले व त्या ठिकाणी जाऊन आल्यासारखे वाटले, आता प्रत्यक्ष जायला नको.
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Tue, 04/14/2015 - 07:55
नवीन
या होळीला गिरनार दर्शन झाले. पायर्यांची संख्या प्रत्येकजण वेगले सांगतात. आम्हाला ९९९९ सांगण्यात आल्या. पहिल्या ३ हजार पायरयापर्यंत क्रमांक नोंदवलेले आहेत. गिर-सोम्नाथ -गिरनार अशी सहल होती. लेख लिहायला फार आळस केलेला आता आपला लेख पाहून लवकरच उरकायला लागेल असे दिसतेय ….
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Tue, 04/14/2015 - 15:42
नवीन
विवी, तुमचे पण अनुभव येऊ द्यात की. वाचायला आवडतील. मी देखील हा लेख ३ वर्षानंतर लिहितोय.
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Tue, 04/14/2015 - 17:08
नवीन
टंकवीतो लवकरच अजून कोणी नंबर लावण्याआधी ...
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Tue, 04/14/2015 - 08:10
नवीन
गोसावी आणि गुहेत राहणार्या साधुंची भीती असते म्हणजे गृपने जाणेच योग्य ठरेल का की दोन-तीन जणांनी गेलेले चालेल, खरंच वाघांपासुन तिथे काही भीती आहे का?
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Tue, 04/14/2015 - 09:04
नवीन
गिर आणि जुनागढ जवळपास ६० किमी अंतरावर आहे. त्यामुळे वाघ आणि सिंह येथे येतात हि तर अफवा आहे. कारण पायर्या सोडल्या तर दोन्ही बाजूला दाट झादिसुद्धा नाही आहे. गिरनार मंदिराच्या प्रवेशाच्या उजव्या हातास जुनागड forest department चे कार्यालय आहे. तेथेसुद्धा सावधानतेच्या सूचना पाहण्यात नाहीत.
group ने यासाठी जावे कि कारण सरसकट पायर्या चढताना सोबत असलेली केव्हाही चांगली.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Tue, 04/14/2015 - 09:22
नवीन
कुठल्या स्टेशन वर उतरुन पुढे कसे जायचे , राहण्याची सोय, याची डीटेल मधे माहीती मिळेल का,
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Tue, 04/14/2015 - 10:12
नवीन
by flight - जुनागडला विमानतळ आहे पण चालू नाही. राजकोटला विमानाने उतरून २-२.३० तासात जुनागड गाठू शकता.
by train - जुनागडला जाण्यासाठी बर्याच ट्रेन आहेत. गिरनार हे जुनागड पासून अंदाजे १० किमी अंतरावर आहे. जुनागडला पोहोचताच आपल्याला एका पर्वत रांगेचे दर्शन घडेल तेच गिरनार ! कारण गिरनार सोडला तर तेथे पूर्ण मैदानी परिसर आहे. येथे लोकल रिक्षा पायथ्याशी सोडतील. गिरनारच्या पायथ्याशी साधूंच्या घरी सुद्धा राहण्याची व्यवस्था होते. पायर्यांच्या सुरुवातीस मारुती मंदिर आहे तेथे सोय होते. पैसे आपल्या मर्जीनुसार द्यावेत.महत्त्वाचे सांगायचेच राहिले कि साधूंचे घर असले तरी स्वच्छता असते आणि गरम पाणी सुद्धा मिळते. जुनागड तसे बर्यापैकी विकसित आहे पण तेथील हॉटेल मध्ये राहिलेलो नाही त्यामुळे माहिती देऊ शकत नाही. गीरनार चढायला साधारणतः तेथील लोक सकाळी ५ वाजता सुरुवात करतात. पण परतीच्या प्रवासात थोडे उन लागते. त्यामुळे बरोबर खाणे पिणे असेल तर शक्यतो रात्री १२.० वाजता सुरुवात करावी म्हणजे सकाळी ५.० वाजता मंदिर उघडण्याच्या वेळेस आपण तिथे हजार असाल. तसेच ६.- ६.३० ला परतीचा प्रवास सुरु केला तरी सकळी १०.० पर्यंत खाली उतराल.
डोली ने जाणार असाल तर माणशी ५- २० हजार इतका खर्च येतो. आपल्या वजनावर नि आपल्या पेहरावावर भाव ठरतो. ६० किलोपर्यंत ५ हजार रुपये घेतात त्यापुढे वजन असेल तर त्यांच्या मर्जीने भाव ठरतो. डोली म्हणण्यापेक्षा तो एक प्रकारचा झोपाळा च आहे. अनुभवाने ठरवा.
गिरनार दर्शनाचा स्वानुभव तर अविस्मरणीय आहे. तो लवकरच टंकीन.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Tue, 04/14/2015 - 10:46
नवीन
धन्यवाद, डोली ने जाण्याचा प्रश्नच नाही , दर्शनापेक्षा पर्वत चढायची इच्छा जास्त आहे.
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Tue, 04/14/2015 - 15:40
नवीन
विअर्ड विक्सनी चांगलीच माहिती दिली. गोसावी,साधूंची भीती अश्यासाठी म्हंटले आहे की त्यांचा पेहराव, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे हे फार वेगळे असते,कित्येकांच्या हातात चिलीम वगैरे असते. त्यांच्या गुहेत गेल्यास ते बळजबरीने देवासमोर पैसे वगैरे ठेवायला भाग पडतात. सर्व तसे नसतील तरी एकट्या-दुकट्याने त्यांच्या गुहेत न शिरलेलं बरं. गिरनार जवळच गिर जंगल आहे जे सिंहासाठींचे अभयारण्य आहे. उन्हाळ्यात, दुष्काळ असल्यास ते त्यांचे जंगल सोडून इतरस्त भटकू शकतात. जरी गिरनारच्या पायर्या चढताना आसपास दाट झाडी नसली तरी रात्रीच्या/पहाटेच्या अंधारात सावध असलेलं केव्हाही चांगलं. जुनागढ शहरातील हॉटेल्स ठीक आहेत. २०१२साली मी आणि माझा मित्र एका रात्रीचे आठशे रुपये देऊन राहिलो होतो. हॉटेलवाल्याला सांगून ठेवल्यास भल्या पहाटे चार वाजता देखील रिक्षा मिळू शकते. रिक्षा साधारणपणे पन्नास ते ऐंशी रुपये घेते, मीटर नसल्यामुळे भाव आधीच करणे श्रेयस्कर. शक्य असल्यास रात्रीच बारा-एकच्या सुमारास चढायला सुरवात करावी. रात्रीच्या अंधारात हवामान थंड असल्याने श्रम कमी पडतात तसेच अजून किती चढायचे आहे हे न कळल्यामुळे मनावर ताण येत नाही. एकट्याने जाताना कंटाळा, थकवा येऊ शकतो म्हणून ग्रुपने चढणे योग्य. चढताना एक काठी अवश्य घ्यावी, कमीत कमी सामान बरोबर असावे. अंगात स्वेटर, कानटोपी, मफलर असलेला बरा कारण सुरवातीला थंडी वाजते, जसजसे चढण्याचे श्रम होतात, उकाडा होतो आणि शेवटी दत्तात्रयाच्या पायर्या चढताना वाहणाऱ्या वार्यामुळे खूप थंडी वाजू शकते. वाटेत खाण्यापिण्यासाठी अंबाजीच्या शिखरापर्यंत अधेमधे सोय आहे परंतु दत्तात्रयाच्या पायर्या चढताना तशी सोय नाही त्यामुळे स्वताजवळ थोडेफार खाण्याचे पदार्थ (सुकामेवा) बाळगणे योग्य. डोली फार महाग पडते आणि ती आरामदायक नाही. जुनागढला अजूनही दोनचार प्रेक्षणीय स्थळे आहेत त्यामुळे दोन दिवस जुनागढला राहू शकता, पहिला दिवस प्रेक्षणीय स्थळांसाठी आणि दुसरा दिवस गिरनार दर्शनासाठी. मी राजकोटला पाच वर्षे राहिल्यामुळे आणि जुनागढ हे माझे मार्केटींगचे क्षेत्र असल्यामुळे ह्या प्रदेशाची बर्यापैकी माहिती आहे. अजून काही माहिती हवी असल्यास कळवावे. सर्व प्रतिसादांसाठी आभार.
- Log in or register to post comments
ज
जुइ
Tue, 04/14/2015 - 20:22
नवीन
ह्या नव्या ठिकाणाची माहिती करुण दिल्याबद्दल आभारी आहे. आपण चिकाटीने हा खडतर मार्ग दोनदा सर केल्याबद्दल अभिनंदन!!!
- Log in or register to post comments
क
क्रेझी
Wed, 04/15/2015 - 06:31
नवीन
२०१० मधे मी, माझे बाबा आणि माझा भाऊ असे आम्ही तिघेजण गिरनार पर्वताची वारी करून आलो. माझ्या आई-बाबांनी २००९ मधे पहिल्यांदा इथे भेट दिली आणि त्यानंतर खास आम्हा दोघांना हा १०००० पाय-यांचा अनुभव काय असतो हे दाखवायला म्हणून मुद्दाम घेऊन गेले.
गिरनार पर्वताच्या पायथ्याशी ब-याच गावक-यांची घरे आहेत जेथे रहायची व्यवस्था होऊ शकते अगदी माफक दरात.तिथे धर्मशाळा सुध्दा आहे पण साधारण थंडीच्या दिवसांमधे किंवा फेब्रुवारीपर्यंत तिथे जागा बुक्ड असतात. असो, तर आम्हांला तिथे एका घरामधे एक खोली मिळाली. बाबांना आधीचा अनुभव असल्यामुळे खाण्या-पिण्याचं काय न्यायचं आणि पहाटे किती वाजता सुरूवात करायची हे सगळं माहित होतं. त्यानुसार आम्ही दुस-या दिवशी पहाटे ४वाजता तयार होऊन खाली आलो. जिथे राहत होतो त्याच माणसाकडून प्रत्येकासाठी एक मोठी काठी घेतली आणि चढायला सुरूवात केली. सोबत फक्त ऑरेंजच्या गोळ्यांची तिन पाकिटं घेतली.
आमच्या सोबत ब-याच लोकांनी चालायला सुरूवात केली. ते सगळेजण राजस्थान का कुठून तरी आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ग्रुपमधे अगदी ६महिन्याच्या बाळापासून ते वय वर्षे ७० पर्यंतची सर्व लहान-मोठी मंडळी, बायका होत्या.
सुरूवातीला अंधार होता तेंव्हा आणि उत्साह होता त्यामुळे भराभर आम्ही १००० पाय-यांचा टप्पा ओलांडला. पुढे ५००० पाय-यांचा टप्पा येईतो साधारण ८वाजून गेले होते मग मात्र पाय अगदी जड आणि जॅम झाले होते.
उन्हामधे आजूबाजूचा निसर्ग स्वच्छ दिसत होता. इतक्या दाट जंगलामधे असं काहितरी कोणीतरी बांधून उभं केलंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता! जेंव्हा पाय-या उतरून परत वर चढण दिसायला लागली तेंव्हा वाटलं आपण चायना वॉलच बघतोय समोर!
सकाळी ११वाजता एकदाचे आम्ही पोहोचलो मंदिरापाशी! दर्शन घेतलं, घंटा वाजवली आणि बाहेर पडलो.
तिथे असं समजलं की, मंदिरामधे बांधलेली घंटा वाजवली की तिचा आवाज स्वर्गामधे ऐकू जातो. त्या मंदिराची उंची पाहता मला वाटलं खरंच असं होतही असेल ;) म्हणून आम्ही परत एकदा जाऊन घंटा वाजवून आलो :p
उतरतांना जवळपास धावतच आम्ही खाली उतरलो.तरी तीन-एक तास लागले आम्हांला.
गिरनार पर्वत चढून-उतरून खाली येणं हा शारिरीक कसोटीचा पण मानसिक समाधानाचा अत्युच्च बिंदू वाटला निदान माझ्यापुरता तरी :)
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 04/15/2015 - 08:37
नवीन
मलाही त्यासाठीच जायचंय.. पदयात्रा करते तेव्हाही अनुभवतेच पण गिरनार पर्वत ही चढायची इच्छा आहे.
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Wed, 04/15/2015 - 17:02
नवीन
गिरनार पर्वत चढून-उतरून खाली येणं हा शारिरीक कसोटीचा पण मानसिक समाधानाचा अत्युच्च बिंदू वाटला निदान माझ्यापुरता तरी :) - एकदम सहमत. छान अनुभव.
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Wed, 04/15/2015 - 07:18
नवीन
गिरनार चढ उतार ( जेवण , साधुभेट ) धरून ६.४५ तासात संपविला आहे. हे जेव्हा तिथल्या लोकांना सांगितले तर त्यांना धक्काच बसला…. थरार लवकरच डकवितो.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 04/15/2015 - 08:34
नवीन
वाट पाहतोय..
- Log in or register to post comments
स
सविता००१
Wed, 04/15/2015 - 10:25
नवीन
फार कुतूहल आहे.
- Log in or register to post comments
म
मॅक
Wed, 04/15/2015 - 09:25
नवीन
मस्तच......
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Wed, 04/15/2015 - 21:00
नवीन
आम्ही सुद्धा गिरनार पर्वतावर दोन वेळा थेट ' दत्ताच्या पादुका ' पावेतो जावून आलो आहोत. पहिल्या वेळी गिरनारला जाण्यापुर्वी, मला वडिलांकडून योग्य मार्गदर्शन मिळाले होते. वडिलांनी सांगितले होते कि जातांना नाश्ता , फराळ वगैरे काहीही खावयाचे नाही. फारच तहान लागली तर दोन नारळ सोबत ठेवायचे. एक अंबाजी मातेच्या मंदिराजवळ फोडून, त्यातील पाणी प्यावयाचे व आतील खोबरे खावयाचे. दुसरे नारळ , दत्ताच्या पादुका जेथे आहेत , तेथे फोडून , खोबरे खावयाचे. फराळाचे जिन्नस सोबत न्यायचे , पण येतांना खाण्यासाठी ! ! इतर काही वजन वाढेल असे सोबत न्यावयाचे नाही. १९७९ च्या मे मधील ते दिवस होते. दोन्ही मुलांना ( वय वर्षे साडेतीन व सव्वा दोन वर्षे ) घेवून तर गिरनार चढणे शक्यच नव्हते. पण ज्यांच्याकडे आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी थांबलो होतो , त्या जुनागढ निवासी नातेवाइकांनी, आमच्या दोन्ही मुलांना , सांभाळण्याची हमी घेतल्याने , आम्ही हे धाडस करावयाचे ठरवीले. त्यांनी आम्हाला फराळ म्हणुन
दशम्या, चटणी करुन दिली होती. सुचनेप्रमाणे आम्ही दोन नारळ सोबत घेतले होतेच.कमीत कमी वजन म्हणुन मी पायजामा व साधा शर्ट घातला होता आणि विशेष म्हणजे पायात काहीही न घालता , अनवाणी निघालो होतो. त्यावेळी ' बिसलरि ' ची फ्याशन नव्हती, त्यामुळे पाण्याची साधी बाटली सुद्धा जवळ घेतली नव्हती. नातेवाइकांचा , इयत्ता आठवीत असणारा मुलगा आमच्या बरोबर येणार होताच. जनागढ एस टी बस स्थानकावरुन ' गिरनार तळेठी ' ( गिरनार पायथा ) येथे जाण्यास निघालो. बरोबर साडेसहा वाजता , आम्ही गिरनारच्या पायर्या चढण्यास सुरवात केली.जैन मन्दिरे येतांना पहाण्याचे अगोदरच ठरवून ठेवल्याने , आम्ही फारच कमी वेळात अंबाजी मातेच्या मंदिराजवळ जावून पोहोचलो. जरी मे चा महीना असला तरीही, सकाळी सकाळी थंडगार वारा आमच्या सोबतीस होता, त्यामुळे फारसे श्रम असे झालेच नाहीत. ठरल्याप्रमाणे एक नारळ फोडून, त्यातील पाणी पिवून, तहान शमविली आणि खोबरे खाता खाता, चढण्यास सुरवात केली. पाच सहा पायर्या चढायच्या आणि पुन्हा सपाट प्रुष्ठभागावर पाच सहा पावले चालत जाणे , असा तो मार्ग आक्रमावा लागतो. पथ्य पाळल्याने , आम्ही अवघ्या दोन तासात , दत्ताच्या पादुकांजवळ पोहोचलो.( अर्थात , दोन्ही मुलांना घरी टाकून आलो होतो त्यामुळे , त्यांनी नातेवाइकांना त्रास देण्याच्या , अगोदर घरी पोहोचण्याची काळजी हेही एक जलद गतीचे कारण होतेच ! ! ) दत्ताच्या पादुकांचे दर्शन घेवून, तेथे एक नारळ फोडला. थोडी विश्रांती घेवून, खाली उतरण्यास सुरवात केली.खरोखर भूक लागल्याने, अंबाजी मंदिराजवळ , सोबत आणलेला फराळ खाल्ला. पाणी-विक्रेते होतेच. पाणी पिवून, खाली उतरावयास लागलो. " चढणे कठीण , पण उतरणे सोपे " अशी समजूत होती, पण येथे तो अंदाज चुकला ! ! अंबाजी माता मन्दिर ते जैन मन्दिर याच्या दरम्यान, आमच्या पायात , विशेषत: पोटर्यात चांगलेच गोळे आल्याचे जाणवू लागले.
जैन मंदिर पाहुन झाल्यानंतर तर एकेक पाउल टाकतांना , जणू हत्तीच्या पावलाप्रमाणे ,पावले पडत गेलीत. साडेबारा च्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो.मुलांनी काहीही त्रास दिला नव्हता , हे समजल्यावर फार फार बरे वाटले.
मागील अनुभव जमेस असल्याने , १९९१ साली , पुन्हा एकदा , गिरनार चढाई , पुर्ण करुन आलो.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/16/2015 - 03:49
नवीन
अनुभवकथन खूप आवडले. लेखनशैली एकदम खुसखुशीत आहे.
मुक्तागिरीला असा पायर्या चढण्या-उतरण्याचा अनुभव आहे. परंतु तुमच्या गिरनार मोहिमेच्या तुलनेत ते काहीच नाही.
प्रतिसादांमध्ये इतरांनी लिहिलेले अनुभवही आवडले.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 04/16/2015 - 03:11
नवीन
काय सुंदर ठिकाण आहे हे! खरच!
या लेखामुळे बाकिच्या लोकांचे अनुभव कथन वाचायला मिळाले.
मस्त वाटल सगळेच अनुभव वाचताना.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 04/16/2015 - 06:44
नवीन
अनुभव आवडले सर्वांचेच. डोंगर चढायची केवळ आवड असल्यानेच माझी भटकंती चालते परंतू शारिरिक क्षमता नाही. पायऱ्या पाहिल्या की(सप्तश्रृंगीची जुनी वाट ,विरारची जिवदानी वगैरे) धडकीच भरते कारण पाय फार दुखतात यापेक्षा खडी चढण परवडते. उतरताना मात्र हळूहळू एकेक पायरी उतरण्यापेक्षा धावत उतरल्याने त्रास कमी वाटतो आणि तसेच करतो. सह्याद्रीचे चढ पश्चिमेला असल्याने दुपारी दोनला चढताना उन पाठीवर सैकवर पडते आणि तासातासाने सौम्य होते त्यामुळे दुपार बरी वाटते शिवाय वरती आसरा असतो आराम करून दुसरे दिवशी निघता येते. असे बहुतेक गिरनारला करता येत नसावे त्यामुळे त्रासदायक ठरत असेल. (माझी मते पटण्यासारखी नसतील)तिकडे न जाताच लिहिले आहे क्षमस्व.
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
गुरुवार, 04/16/2015 - 11:59
नवीन
कठिण काम दिसतय. पण गिरनार बघायची/चढायची उत्सुकता ताणली गेलेय. फोटो अजून असले तर नक्कि अॅड करा
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 04/16/2015 - 14:51
नवीन
पहिला फोटो बघूनच धडकी भरली !
तेवढं दत्तमहाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्हालाही घडवलं असतंत की !
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 04/16/2015 - 14:51
नवीन
पहिला फोटो बघूनच धडकी भरली !
तेवढं दत्तमहाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्हालाही घडवलं असतंत की !
- Log in or register to post comments
अ
अनय सोलापूरकर
Fri, 04/17/2015 - 12:23
नवीन
लेख
असाचअनुभव शिखरजी यात्रेचा आहे जम्ल्यास टन्क्तो
http://en.wikipedia.org/wiki/Shikharji
- Log in or register to post comments