Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सीट नको पण स्त्री आवर

व
वेल्लाभट
Tue, 04/14/2015 - 08:24
🗣 154 प्रतिसाद
प्रसंग १: स्थळ: साधारण गर्दी असलेली एक बस 'स्त्रीयांसाठी राखीव' आसनावर एक आजोबा बसलेले आहेत. एक 'स्त्री' हटो! हटो! करत उभ्या असलेल्या पुरुषांना ढोसत येते आणि 'समझता नही क्या? लेडीज सीट है' असं म्हणत त्या आजोबांच्या अकलेला हात घालते. आजोबा गरीब (स्वभावाने) असल्याने ते सॉरी म्हणून उठतात. कसेबसे उभे रहातात. या बयेचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. 'पढनेको नही आता लोगोंको. जान बूझके बैठते है लेडीज सीट पे' इत्यादी इत्यादी. प्रसंग २: स्थळः प्रचंड गर्दी असलेली एक बस बस खचाखच भरलेली आहे. उभं रहायलाही पुरेशी जागा नाही. लोकं लोंबकळत आहेत. एक स्त्री (मध्यमवयीन) कशीबशी उभी आहे. एक सज्जन व्यक्ती आपल्या जागेवरून उठतो व 'मॅडम आप बैठिये' म्हणत तिला बसायला जागा देतो. ती आभार मानत नाहीच. वर 'हं! कसा धाक आहे बघ!' असे भाव चेह-यावर आणत धप्पकन त्या सीटवर बसते. प्रसंग ३: स्थळः कमी गर्दी असलेली एक बस. बसण्याची आसने बहुतेक भरलेली आहेत. बाकी बस रिकामी. स्त्रीयांसाठी असलेल्या आसनांपैकी दोन आसनं रिकामी आहेत. बाकी जनरल आसनांवर तीन स्त्रीया बसलेल्या आहेत. एक पुरुष बसमधे चढतो. जागा शोधत नजर फिरवतो. जनरल आसन रिकामं नाही हे बघून नाईलाजाने उभा रहातो. तीनही प्रसंगात स्त्री आपल्या सवलतीचा गैरवापर करताना दिसते. (या वाक्यावर युद्ध अपेक्षित) पूर्वी काही आसनं राखीव असायची. आता चालकामागची अर्ध्याहून जास्त आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतात. डाव्या बाजूला अपंग, वृद्ध, सैनिक इत्यादी. उरलेली आसनंही 'पुरुषांसाठी' राखीव नसतात. ती जनरल असतात. जिथे प्रसंग २ प्रमाणे पुरुषच अनेकदा जागा देतात. असो. तर. ही सवलत किंवा हे प्रिविलेज जे दिलंय त्यामधे आणि हक्क किंवा राईट मधे फरक आहे. दुर्दैवाने तो अनेकांना कळत नाही. कुठलंही जनरलायझेशन न करता काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो, काही मतं मांडू इच्छितो. १) खांद्याला खांदा लावून चालण्याची भाषा करणा-या स्त्रीया, राखीव आसनांचा उपयोग किंवा समर्थन करतात, हा दुटप्पीपणा नाही का? २) आणि असं असेल तर मग स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी राखीव आसनांवर'च' बसावं. अन्यथा उभं रहावं. ३) जर काही आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतील आणि तिथे बसलेल्या पुरुषांना अपमानित करून उठवण्याचा त्यांना हक्क असेल तर बाकी आसनं पुरुषांसाठी राखीव असावीत, आणि तिथे बसलेल्या स्त्रीला उठवण्याचा पुरुषाला हक्क असावा. ४) एक सल्ला, बसचा पुढचा भाग स्त्रीयांसाठी तर मागचा पुरुषांसाठी राखीव करावा. मधे पार्टिशन. दोन वेगळे वाहक असावेत. म्हणजे वाहकाने मुद्दाम काही करण्याचाही संभव नको. ५) बरं, म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते? असो. प्रसंग ४: स्थळ: प्रचंड गर्दी असलेली एक बस एक सभ्य पुरुष स्वतःला सांभाळत एका सीटला टेकून उभा आहे. एक स्त्री उतरण्यासाठी पुढे जात असते. तोंडाने काही बोलत नाही बाजूला व्हा सांगत नाही आणि खबदाडीतून पुढे सरकत असते. असं होत असताना त्या पुरुषाला तिचा/तिला पुरुषाचा धक्का लागतो. आणि ही आधीच तडकलेली; अजून तडकते. 'गर्दीत मुद्दाम उभे राहता काय? लावू का एक कानशिलात?' काहीबाही बोलायला लागते. शिव्याही देते दोन. (स्त्रीने शिव्या देऊ नयेत / द्याव्यात किंवा स्त्रीयांसाठी राखीव शिव्या असाव्यात का हा एक विषय होऊ शकतो). तो सुरुवातीची चार वाक्य शांतपणे बोलतो. सॉरीही म्हणतो. पण शिवी दिल्यावर, 'मुद्दाम', 'चान्स' असे शब्द वापरले गेल्यावर तोही आवाज चढवतो. घरचे राग समोर येईल त्यावर काढायचं काम नाही मॅडम. ऐकून घेतोय म्हणून वाट्टेल ते बोलू नका. इत्यादी शाब्दिक चकमक घडते. आसनांचा एक वेगळा मुद्दा झाला. पण सर्वसाधारणपणे पुरुषाकडे खुनशी नजरेनेच बहुतेक स्त्रीया बघताना दिसतात. याला आजूबाजूला घडणा-या गोष्टी जरी काही अंशी कारणीभूत असल्या तरीही हे अती होतं अनेकदा. म्हणजे प्रत्येक पुरुष हा वाईटच आहे आणि तो आपल्याला काहीतरी करणारच आहे असा भाव घेऊन वावरण्याची गरज नाही. ६) सभ्य पुरुष हे बस, ट्रेन इत्यादी सर्वच ठिकाणी सभ्यपणा दाखवतात. परंतु सगळ्यांना एकाच चश्म्यातून बघितलं जात असल्याने, प्रसंग २ प्रमाणे त्यांच्या नशिबी साधं थँक्यू सुधा येत नाही. ७) प्रिव्हिलेज आणि राईट यात गल्लत होते आणि मग माणुसकीलाही त्या राखीव जागेवर जागा मिळत नाही. प्रसंग १ प्रमाणे एखाद्या व्यक्तीला खरोखर उभं राहता येत नसेल तरीही उठवलं जातं, तेही उद्दामपणे. ८) आमचं ते आमचंच पण तुमचं तेही आमचं या तत्वानुसार स्त्रीया कुठल्याही आसनावर बसू शकतात, रेल्वेत कुठल्याही डब्यात चढू शकतात. पण पुरुषांना तो हक्क नाही. कॉमन डब्यात (बघा हं, तो ही जेंट्स डबा नसतो टेक्निकली) प्रेमी युगुलं, किंवा गर्दीत सेफ वाटणा-या महिला प्रवेश करतात आणि ती अदरवाइज कम्फर्टेबल असणारी गर्दी उगीच अनकम्फर्टेबल करून टाकतात. चुकून धक्का लागला तर आपणच मार खाऊ या भीतीने पुरुषच अंग चोरून उभे राहतात. धागा नीट मांडता आला नाही याची कल्पना आहे. पण ठीक आहे काथ्याच कुटायचा आहे मग तो आधीच थोडा कुटल्यासारखा असला म्हणून काय बिघडलं? असं म्हणून धागा टाकत आहे. वरील तीनही प्रसंग अनेकदा बघितलेले आहेत. बाकी पुढे तुम्ही बघितलेले अनुभवलेले प्रसंग सांगायला आमंत्रण देण्याची गरज नाही. जाता जाता; जिकडे तिकडे स्त्रीयांना प्रेफरन्शिअल ट्रीटमेंट, रिझर्वेशन असतं. मिपा वरही अनाहिता फक्त स्त्रीयांसाठी आहे. तर मिपावर फक्त पुरुषांसाठी एक्स्क्लूजिव एक सेगमेंट असावं असं मी सुचवू इच्छितो. वाट्टेल ते झालं तरी लेडीज सीट वर न बसणारा. वेल्लाभट नवीन म्हण - सीट नको पण स्त्री आवर.

प्रतिक्रिया द्या
37309 वाचन

💬 प्रतिसाद (154)
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 11:57 नवीन
नो नो मेन आर फ्रॉम मार्स ना... मग मेन शुड गो देअर. असा युक्तिवाद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Tue, 04/14/2015 - 12:04 नवीन
मग ठिकाय आपण सगळे मंगळावर जाऊ. जास्तीत जास्त काय तर ऑक्सिजन सिलींडर घेवून फिरावं लागेल. बट विमेन आर फ्रॉम व्हिनस. तेव्हा त्यानी तिकडं गेलं पाहीजे. सध्या तिकडं ४६० डिग्री तपमान आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ब
बॅटमॅन Tue, 04/14/2015 - 12:16 नवीन
अतिरेकी अन एकांगी स्त्रिमुक्तिबाधित स्त्रियांनी अगोदर शुक्रावर गेले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मोदक Tue, 04/14/2015 - 12:21 नवीन
त्यांनी पुरूषनामवाचक ग्रहावर का जावे..? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पॉइंट ब्लँक Tue, 04/14/2015 - 12:27 नवीन
अ मिलियन डॉलर क्वेश्शन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बॅटमॅन Tue, 04/14/2015 - 12:33 नवीन
त्याचं असंय की शुक्र हे नाव इंड्यन आहे तर व्हीनस हे स्त्रीवाचक नाव विंग्रजी आहे. तसंच बघायचं झालं तर सूर्य नामक पुरुषी नावाच्या तार्‍याची ऊर्जाही स्त्रियांनी घेतली नाय पायजे, कसें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 04/14/2015 - 12:37 नवीन
तरी अजून धाग्याचे नांव नीट वाचले गेले नसावे. त्या एका मुद्द्यामध्ये धागालेखकाला काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवण्याचे पोटेन्शिअल आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 04/14/2015 - 12:40 नवीन
वेगळी चूल मांडल्यापासून (काय स्त्रीवादी उपमा आहे =)) ) सुस्त झाले असावेत लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पॉइंट ब्लँक Tue, 04/14/2015 - 11:54 नवीन
बाकी, स्त्रियांसाठी स्वतंत्र देशच का नसावा?
लै बोर होतील सगळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्वधर्म Tue, 04/14/2015 - 11:55 नवीन
या निमित्ताने माझ्या अायुष्यात घडलेला एक प्रसंग: माझ्या मुलीची शाळेला घेऊन जाणारी बस सोसायटीच्या गेटवर साधारण सव्वा अाठ वाजता येत असे. ती वेळ माझा लहान मुलगा झोपेतून उठण्याची असल्याने व बायकोला डबा वगैरे करण्याची गडबड असल्याने मुलीला सकाळच्या वेळी शाळेच्या बसला सोडण्याचे काम बर्याचदा माझ्यावर येत असे. तिथे बर्याच बायकाही अापअापल्या मुलांना सोडायला येत असत. मुलगी बसमध्ये बसली, की ती रोजच हसून बाय करायची. मी पण हात हलवून तीला निरोप देत असे. हे सगळे ती बसमध्ये जागेवर बसल्यावर अाणि मी खाली असताना बर्याचदा व्हायचे. सगळेच अाईवडील हसत हसत निरोप द्यायचे. एक दिवस दुसर्या सोसायटीतल्या एक बाई अापल्या मुलाला बसमध्ये जागेवर बसवून देण्यासाठी अात चढल्या. सहसा कोणी पालकाने अापल्या मुलाला पार जागेवर बसवून देण्याची गरज नसायची अन बसही तेवढा वेळ थांबायची नाही. त्या दिवशी बस सुरू झाली, मी नेहमीप्रमाणे मुलीला निरोप दिला व माघारी वळून चालू लागणार, एवढ्यात त्या बाईंनी एकदम अारडाअोरडा चालू केला. पहिल्यांदा मला समजलंच नाही, काय झालं ते. नंतर डोक्यात प्रकाश पडला. त्या मलाच अोरडत होत्या. बायकांकडे बघून हसायला लाज वाटत नाही का, वगैरे तोंडाचा पट्टा सुरु केला. मी पहिल्यांदा अवाक झालो, नंतर डोक्यात रागाचा प्रचंड स्फोट झाला व अर्ध्या मिनीटानंतर मनातल्या मनात शरमेने लालीलाल झालो. बाजूला अापअापल्या मुलाला सोडायला अालेल्या सगळ्या बायका माझ्याकडे बघत होत्या. अाता जर ही जमीन पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. एवढा धक्का बसला होता, की काय प्रतिक्रीया द्यावी हेच समजत नव्हतं. कसाबसा तिथून घरी अालो. मनात काय चालले होते, ते अाज वर्णनही करू शकत नाही. पहिल्यांदा बायकोला सगळं सागितलं. एक क्षणभर तिलाही काय करावं, ते सुचलं नाही. शेवटी अांम्ही तिथे असलेल्या ईतर बायकांबरोबर दोघांनी बोलायचं असं ठरवलं. तो दिवस विचित्र गेला. कशातच मन लागत नव्हतं. अापल्याच घरी जाताना, सोसायटीच्या गेटमधून अात शिरताना चोरासारखं वाटत होतं. दुसर्या दिवशी मुलीला सोडायला दोघेही गेलो. त्या बाई अाल्याच नव्हत्या. बस गेल्यावर, बायकोने तिथल्या ईतर पालकांजवळ कालच्या घटनेबद्दल चौकशी केली. मला कोणाशीच काही बोलायला सुधरत नव्हतं. कुणाच्या नजरेला नजर दयायची छाती नव्हती. झालं असं होतं की, मी नेहमीप्रमाणेच मुलीला हसत हसत निरोप दिला होता, पण मी त्या त्यांच्याकडे बघून हसलो, असा बाईंचा गैरसमज झाला होता. त्यांनी एवढा मोठा अाकांडतांडव केला होता, की मी संपूर्णपणे दिग्मूढ होऊन गेलो होतो. मी व बायकोने तिथल्या एक दोघींना विनंती केली व अांम्ही ४-५ जण त्या बाईंच्या घरी गेलो. त्यांना व त्यांच्या नवर्याला भेटून बोलल्याशिवाय मला स्वस्थता लाभणे शक्यच नव्हते. त्यांच्या नवर्यानेच दार उघडले. अांम्ही त्यांना अामच्या येण्याचे कारण सांगितले. त्यांनी शांतपणे ऐकून घेतले व ते एकच दोनच वाक्ये बोलले. ठीक अाहे, तुंम्ही विसरून जा, अामचा काही गैरसमज झाला असेल. माझा जीव अक्षरश: भांड्यात पडला. पण बायकोने त्या बाईंना अातून बोलवा असा अाग्रह धरला. नवरा म्हणत होता की ठीक अाहे, अाता तुंम्ही विसरून जा, पण माझी बायको त्या बाईंशी बोलायचंच या मताची होती. शेवटी त्यांच्या नवर्याने अांम्हाला सांगितले, की माझा मुळीच गैरसमज झाला नाही, तुंम्ही तिच्याशी बोलण्याचा अाग्रह धरू नका. तिचा मनावर ताबा रहात नाही व त्याबाबत ट्रीटमेंट चालू अाहे. उद्यापासून मीच मुलांना सोडायला येत जाईन. घरी परतताना मनावरचं प्रचंड ओझं उतरल्याची जाणीव झाली होती. अाता कधीतरी तो माणूस परिसरात दिसतो व हसून ओळखही दाखवतो. हा प्रसंग माझ्यावर एका बाईमुळेच अाला होता, अाणि केवळ बायकांनीच त्यातून सोडवले. नशिब की घराजवळ झाला होता, तोंडअोळखीचे तरी लोक अाजूबाजूला होते, समजा बाहेर असे काही झाले असते, तर मी कसे काय तोंड दिले असते असे वाटून कधी कधी थरकाप होतो.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 12:00 नवीन
खरं तर उलटं व्हायला हवं होतं इथे. स्त्रीयांनी काही स्त्रीया कशा कधी कधी चुकीच्या वागतात ते अनुभव सांगायला हवे होते आणि पुरुषांनी पुरुष कसे चुकीचे वागणारे असतात त्याचे. दॅट वुड हॅव बीन समथिंग. रिअली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/14/2015 - 12:08 नवीन
बसने प्रवास करण्याचे प्रसंग सुदैवाने कमीच येतात परंतु बर्याचदा स्त्रियांच्या सीट्स रिकाम्या ठेवून त्या पुरुषांच्या सीटवर बसलेल्या दिसतात. त्यामुळे स्त्रियांच्या सीट वर बसता येत नाही आणी वर त्यांच्या शेजारी बसावे तर अंग चोरून बसावे लागते. निदान सुरुवातीच्या थांब्यावर तरी स्त्रियांनी त्यांच्या राखीव जागेवरच बसावे आणी त्या जागा भरल्यावरच इतर जागांवर बसावे अशी सक्ती का करता येऊ नये?
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Tue, 04/14/2015 - 12:16 नवीन
कोण सक्ती करणार. कारण १. सांगायला गेल्यावर "माय चॉईस" अस म्हणतील. २. किंवा दुसरी शक्यता- त्यांना तुमच्याशी मैत्री करायची असेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 12:17 नवीन
हॅ.... या अशा सक्त्या करणं म्हणजे समाज टोट्टल रिव्हर्स मधे नेणं आहे. मूर्खपणा आहे. सिरियसली म्हणतोय. अरे रिझर्व्ड सीट, डबे करून तुम्ही जेंडर बायस ला खतपाणी देणार.... ठीक आहे तुमच्याकडे गुन्हे होतायत पण मग गुन्हे थांबवा ना ! ती धमक नाही. उलट काय, आरक्षण. बसच्या सीट, रेल्वेचे डबे, टॅक्सी च्या सीट, देवळातल्या रांगा... अरे काय चाललंय? द मेजर डिफरन्स बिटवीन अस अँड डेव्हलप्ड कंट्रीज इज धिस. लेट्स फेस इट. वी कान्ट पनिश द गिल्टी सो वी प्रोटेक्ट द प्रोबेबल व्हिक्टिम्स. बुलशिट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 12:37 नवीन
वी कान्ट पनिश द गिल्टी सो वी प्रोटेक्ट द प्रोबेबल व्हिक्टिम्स. बुलशिट.
हजार टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अवतार Tue, 04/14/2015 - 20:25 नवीन
Because we don't have a National Character
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
त
तिमा Wed, 04/15/2015 - 06:50 नवीन
स्त्रियांनी त्यांच्या राखीव जागेवरच बसावे आणी त्या जागा भरल्यावरच इतर जागांवर बसावे अशी सक्ती का करता येऊ नये? असे कसे करता येईल ? मग ते सर्वच राखीव जागांबद्दल करावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजीत अवलिया Tue, 04/14/2015 - 12:53 नवीन
खरे साहेबानशी सहमत. स्त्रीयाणी बस मधे चढल्यावर अगोदर त्यांच्या साठी राखीव असलेल्या जागी बसावे. जर तिथे जागा नसेल तरच दुसरीकडे बसावे. पण काही बायका मुद्दाम तसे करत नाहीत. वेल्लाभट, हजार टक्के सहमत
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Tue, 04/14/2015 - 13:11 नवीन
मी स्वतः स्त्री-पुरुष समानतेचा विरोधक आहे. निसर्गाने जर दोन गोष्टी वेगळ्या बनवल्या असतील तर त्यांना एका पातळीवर आणण्याचा अट्टाहास का ? समानता हि वेतनाबाबतीत, व्यवसायिक स्तरावर ,शिक्षणा बाबतीत ठीक आहे.प्रत्येक गोष्टीत पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे म्हणजे स्त्री- पुरुष समानता नव्हे. राखीव जागा बद्दल म्हणाल तर हरकत घेण्याचा प्रश्नच येत नाही. जर स्त्रिया साधारण डब्यातून आपल्या कुटूम्बियासम्वेत प्रवास करत असतील नि यावेळेस आपण साधारण डब्यातून प्रवास का करता असा आक्षेप घेतलात तर स्त्रीपेक्षा पुरुषांकडून च शाब्दिक व प्रसंगी शारीरिक प्रसाद मिळण्याची शक्यता अधिक…
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/14/2015 - 13:18 नवीन
समानता हि वेतनाबाबतीत, व्यवसायिक स्तरावर ,शिक्षणा बाबतीत ठीक आहे.
मग अजुन काय वेगळं आहे समानता म्हणजे? मुळात "जे जे पुरुष करतील ते ते मिळवणे" असली टुकार व्याख्या नाहीचे स्त्री समानतेची.. तुमचा बाकीचा प्रतिसाद समजलाच नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 13:25 नवीन
मी स्वतः स्त्री-पुरुष समानतेचा विरोधक आहे. निसर्गाने जर दोन गोष्टी वेगळ्या बनवल्या असतील तर त्यांना एका पातळीवर आणण्याचा अट्टाहास का ?
कुठे कुठे वेगळं वागवायचं याची यादी संपणार नाही बरं का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
ब
बॅटमॅन Tue, 04/14/2015 - 13:30 नवीन
फायदा होईल तिथे वेगळेपणा, तर फायदा नाही तिथे समानता असे पाठिंब्याचे धोरण ठेवलेले बरे असते म्हणे. दुटप्पीपणाचा आरोप करणार्‍यांना त्यांच्या आईबहिणीबायकोमुलीबद्दल एखादा वैयक्तिक प्रश्न विचारून गप्प केले की झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ब
बाळ सप्रे Tue, 04/14/2015 - 13:33 नवीन
खरंतर सर्वांनी समजून वृद्ध्/अपंग यांना बसायला जागा द्यावी पण सगळे समजुतदार नसल्याने शारिरीक असहाय्यतेसाठी वृद्ध्/अपंगांसाठी बसण्यास जागा समर्थनीय आहे. परंतु खर्‍या स्त्रीवादी व्यक्तिने बस/ट्रेनमधील स्त्रियांसाठी राखीव जागांचा निषेधच करावा. खर्‍या स्त्रीवादी स्त्रीने एखादा धडधाकट पुरुष बसलेला असला तरीही स्वतःला जागा न मिळाल्यास बसलेल्या पुरुषास उठवु नये. हे मत बसायच्या राखीव जागांबाबत आहे. इतर क्षेत्रातील राखीव जागा स्त्रियांच्या सहभागाला उत्तेजन देण्यासाठी काही काळ असण्यात मात्र काही गैर नाही.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 13:36 नवीन
एक किस्सा सांगतो. स्वित्झर्लंड ट्रिप मधे माझ्या बाबतीत घडलेला. मी आणि बायको बसमधून प्रवास करत होतो. समोर एक म्हातारी बाई उभी होती. बसायच्या जागा भरलेल्या होत्या. मी सवयीप्रमाणे उठून तिला बस म्हणून जागा देऊ केली. तर काहीसं रागाने बघत ती म्हणाली 'नो. थेंक्स. आयम फाइन'
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Tue, 04/14/2015 - 15:24 नवीन
हा हा हा... एकदा असंच एका ७५+ वयाच्या म्हातारीला जागा ऑफर केली होती.. आजी मिश्कील होत्या, म्हणतात कशा, "I am not that old, dear!" .. मग काय, सगळेच मस्त हसले. उरलेला २० मिनिटांचा प्रवास त्या आजी उभे राहून आणि आम्ही तिथेच बसून गप्पा मारत मारत झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
विअर्ड विक्स Tue, 04/14/2015 - 13:41 नवीन
पिरा ताई… ती तुमची व्याख्या असेल सर्वांची नाही. ती असती तर my choice सारखे विडीओ बनलेच नसते. संततीसाठी सुद्धा पुरुषांची काय गरज ? अशी मतेसुद्धा मी ऐकलेली आहेत. प्रश्न राहिला राखीव जागांबद्दल टिपणीचा …. तो स्त्रियांस राखीव जागा बद्दल आक्षेप घेणार्यांसाठी आहे…. नि त्या जागा असाव्यात या स्पष्ट मताचा मी आहे. राखीव जागा या सुरक्षेच्या मुद्द्यासाठी नव्हे तर सोयीच्या मुद्द्यासाठी दिलेल्या आहेत. नि स्त्रियांच्या डब्यासाठी सुरक्षा पुरवण्याची गरज राहणार नाही तो सुदिन…
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/14/2015 - 13:57 नवीन
तुमची व्याख्या काय समानतेची? नाही म्हणजे विरोधात आहात समानतेच्या.. त्यात पुन्हा "पाश्चात्यांचे अंधानुकरण" असाही मुद्दा आणलाय.. म्हणुन विचारलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
व
विअर्ड विक्स Tue, 04/14/2015 - 15:50 नवीन
शिक्षण, वेतन नि व्यावसायिक स्तरावर समानता असावी हे मी मान्य केलेलेच आहे नि कोणत्या गोष्टीत नको हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे. अंधानुकारणाचा मुद्दा ज्यांना समजायचा होता ते समजले नि त्यांनी इतर दाखलेही दिले. नि मी विरोधक आहे ते आंधळ्या स्त्रीवादि स्त्रियांचा ज्यांनी स्त्री-पुरुष समानतेच्या व्याख्या बदलल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
स्पंदना Tue, 04/14/2015 - 14:05 नवीन
सगळे प्रतिसाद वाचुनही वेल्लाभट अस म्हणावसं वाटत की तुम्ही हा लेख लिहुन तुम्ही आणि कोल्हेबाई यातल अंतर कमी केल आहे. काही गरज नाही स्त्री स्त्री आणि पुरुष पुरुष म्हणुन एकमेकाचा पानउतारा करण्याची, शेवटी माणुस (ह्युमन) वाईट अथवा चांगला असतो. नाहीतर महाराष्ट्रात घडलेली चोरलेल्या बालकांना विजेच्या खांबावर आपटुन मारणारीहो स्त्री नसती, अन युरोपात स्वतःच्या मुलीला वर्षोनवर्ष घराखालीच डांबुन घालिउन ...राहूदे मला लिहीवत नाही आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 14:08 नवीन
बरोबर आहे. पण कोल्हेबाईंच्या काव्याला डांगे साएबांनी न्यूट्रलाईझ केलंय. हा मुद्दा वेगळा होता. असो. :) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
आ
आजानुकर्ण Tue, 04/14/2015 - 14:37 नवीन
मी दहा ते बारा वर्षे बसने प्रवास केला आहे. मुलींना आणि बायकांना बसमध्ये राखीव जागांची नितांत गरज आहे. निदान पुण्याततरी पुरुषांपेक्षा मुली-बायका याच बसमध्ये प्रामुख्याने दिसतात. किंबहुना बसमधील धक्काबुक्की टाळण्यासाठी बायकांना पुढील दरवाजाने व पुरुषांना मागील दरवाजाने असे प्रवेश देणेही आवश्यक आहे. बसचा पुढील अर्धा भाग बायकांना राखून ठेवावा व मागील अर्धा भाग पुरुषांना. त्यामुळे धक्काबुक्कीचे प्रसंग बरेच टळतील.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 04/14/2015 - 14:42 नवीन
हे गंमतीत लिहितोय. ड्रायव्हर ला पण उठवतील ओ सीटवरुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ध
धर्मराजमुटके Tue, 04/14/2015 - 15:02 नवीन
पिलियन रायडर यांचा प्रतिसाद आवडला. पण माझी खरोखरच एक प्रामाणिक शंका आहे. पि.रा. यांनीच नव्हे तर कोणीही उत्तर दिले तरी चालेल. 'पुरुषांचे तसले स्पर्श बायकांना बरोबर कळतात' हे वाक्य मी इतक्या वेळा ऐकले आहे पण ते नक्की कसे कळतात हे मला आजतागायत कळाले नाही. व्यक्तीशः मला बसने प्रवास करायचा प्रसंग फारच कमी येतो. पण जेव्हा कधी येतो तेव्हा तेव्हा मला बस मधे चढल्यावर स्वतः पुरुष असल्याची भीती वाटते. यात मी काहीही अतिशयोक्ती करत नाही. जर एखाद्या स्त्रीला चुकूनही धक्का लागला तरी मला मनातल्या मनात भिती वाटत राहते की आता काहि विपरीत प्रसंग तर घडणार नाही ना ? बेस्ट आणि एकंदरीत सगळ्याच जुन्या बसेस ह्या उभे राहणार्‍यांसाठी फारच कंफर्टेबल होत्या असे आजच्या बसेस बघून वाटते. आताशा नवीन मॉडर्न बसेसच्या दोन्ही बाजूच्या सीटसमधील मार्गिका एवढी चिंचोळी झालीय की मनात कितीही ठरवले तरी दुसर्‍याला धक्का लागल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. बसमधे स्त्रिया नकोसे स्पर्श टाळण्यासाठी आपल्या बॅग्स, बॅकपॅक पुढील बाजूस किंवा गरज असेल तशा घेतात. नेमके हेच तंत्र मी स्त्रियांकडून शिकून आपल्या शरीराचा धक्का दुसर्‍या स्त्रीला लागू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतो. शेवटी कितीही प्रयत्न केला तरी सर्वथा टाळणे शक्य नसते. असे माझ्यासारखे अनेक पुरुष असतील त्यांच्या मनातील भावना मांडण्यासाठी हा प्रतिसाद. सांगायचा मुद्दा हा की तसले स्पर्श कसे ओळखता येतात याबद्द्ल काही मार्गदर्शन मिळाले तर आमच्या सारख्यांची लाईफ थोडी इझ्झी होईल एवढेच.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/14/2015 - 15:16 नवीन
मी नाही हो सांगु शकणार कसं ते.. पण किमान मी तरी सतत संशय मोड ऑन करुन फिरते हे मी मान्य करते. इतक्या वेळा घाणेरडे स्पर्श अनुभवलेत की आता न्याय-अन्याय, समज- गैरसमज ह्या पलीकडे गेलेय मी. प्रत्येक स्त्री जात असावी. पण कसा कोण जाणे चुकुन लाग्लेला धक्का आणि मुद्दाम मारलेला धक्का कळतो. शिवाय धक्का उगाच असेल (बसचा ब्रेक नाही तरी कुणीतरी आदळणे / बाकी जनता ब्रेकने इंचभरपण हलली नसताना आपल्याच मागचा मनुष्य फुटभर ध्डपडुन आपल्यावर आदळणे) तर तो समजतोच. आणखीन म्हणजे सतत धक्का लागणे. एखाद्या वेळेस जनरली बेनिफीट ऑफ डाउट देतोच. पण सतत तसं झालं की मग आवाज चढवावा लागतो. सभ्य माणुस एकदा जरी धक्का लागला की खुप सावरुन उभा रहातो. अजुन एक म्हणजे मुद्दाम लेडीज सीट पाशी उभे रहाणे. गर्दी आहे म्हणुन सीटवर झुकणे. ह्यापेक्षाही जास्त प्रमाण आहे हात लावण्याचं.. ह्यात शाळेतली चिमुरडी पोरं सुद्धा असतात. :( शेवटी असला घाणेरडा मनुष्य बसमध्ये असेल तर वाईट प्रसंग येतात. तसंच नेमकी हलक्याशा चुकुन लागलेल्या धक्क्यालाही कानाखाली वाजवणारी बाइ असेल तर पुरुषांनाही वाईट वेळ पहावी लागते. चुकुन धक्का लागला तरी तमाशा केला तर सभ्य पुरुषाला त्याचा किती त्रास होऊ शकतो ह्याची जाणीव आहेच. सभ्य स्त्रीलाही असे आगंतुक स्पर्श झाले की खुप किळस वाटते.. चीड येते.. अशा परिस्थितीची जाणीव पुरुषांनी ठेवावी (अनेकांना असतेच..) आणि म्हणुनच राखीव जागा ठेवाव्या लागतात हे समजुन घ्यावं हेच मांडायचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 15:30 नवीन
सतत संशय मोड ऑन करून फिरण्याची वेळ महिलांवर यावी, हे किती वाईट आणि दुर्दैवी आहे याचा प्रामाणिक विचार प्रत्येक सूज्ञ माणसाने करावा. आपल्या वागण्यात काळजी घ्यावीच पण समोरचा चुकीचं वागत असेल तर त्या स्त्रीने कानाखाली मारण्या आधी आपण त्याला ताडावे; किमान आवाज तरी करावा. स्त्रीयांनीही कुठेतरी कुठलातरी राग न काढता प्रसंग्/व्यक्ती बघून आपल्याला असलेली सवलत्/हक्क याचा उपभोग घ्यावा. शक्य होईल तिथे 'तसला' आणि 'तसला नाही' यात भेद करून उगीच कुणावर बरसू नये. तुम्हाला न सांगताही रिस्पेक्ट मिळेल तिथे अ‍ॅक्नॉलेज करावं. (करत असतील त्याना हे वाक्य लागू नाही. उगीच नवा वाद नको.) तेंव्हा कुठल्याच एका वर्गाचं जनरलायझेशन करणं चूकच. किंबहुना धाग्याचा उद्देशही तो नव्हता. 'ऐसा भी होता है' हा संदेश धाग्यातून घेतला तरी पुरे आहे. असो. माझ्या मते इथे चर्चा थांबावी. तरीही, निर्णय अर्थातच प्रतिसादकांचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नाखु Wed, 04/15/2015 - 05:39 नवीन
जिंकलस. संतुलीत समारोप कसा करावा त्याचे एक दुर्मीळ उदाहरण घालून दिले आहेस. जगात सगळेच फक्त पांढरे आणि फक्त काळे नसते यामध्ये बरेच रंग आहेत माणसाच्या जीवनात (इ.एक्कांच्या एका प्रतिसादातून उधार) फक्त नजर आणी जाणीव सतर्क असली की "रग" आणि "रंग" नक्की ओळखता येतो. सर्व समंजस प्रतिसादकांचे विशेष आभार (धाग्याचा -----न केल्याबद्दल) लेकीचा बाप नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 04/15/2015 - 06:27 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
भ
भाग्यश्री कुलकर्णी Wed, 04/22/2015 - 14:42 नवीन
तुम्ही विचारलंत म्हणुन सांगते.एकदा बस खचाखच भरली होती.एका माणसाने माझ्या पर्सचा पट्टा धरला...तो धरताना त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या स्त्री भागाला झाला..मी तिरीमिरीत वळून त्याला बोलणार तेवढ्यात माझ्या लक्षात आले की तो एका पायाने अधू आहे...बसच्या वरच्या दांड्याला पकडून तो उभा राहूच शकत नव्हता...प्रतिसाद चुकीच्या जागी लिहीला गेला.धर्मराज यांच्या स्पर्श ओळखण्यावरच्या प्रश्नाचे ते उत्तर आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 15:59 नवीन
फारच संतुलित चर्चा होऊन धागा संपतोय हे पाहून एक मिपाकर म्हणून... अभिमान वाटत आहे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 04/14/2015 - 18:39 नवीन
जनरलायझेशन दोन्ही बाजूंना गैरलागूच. ..आणि कलगीतुरा म्हटलं तरी पुरुषप्रकृतीचं भांडण त्यांच्या निर्मितीइतकंच प्राचीन आहे... तस्मात, चालूद्या...
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Tue, 04/14/2015 - 18:45 नवीन
लेखकाने वर धागा संपल्याची आणि युद्धबंदिची घोषणा केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/15/2015 - 06:19 नवीन
भरले रे भरले ... १०० भरले! ;-)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 04/15/2015 - 06:28 नवीन
चेरी ऑन द टॉप ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पॉइंट ब्लँक Wed, 04/15/2015 - 06:54 नवीन
झालं एकदाचं. नायतर आमाला वाटलं तेंडुलकर होतोय वेल्लाभटांचा. ९०-९२ वर विकेट टाकून बाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कपिलमुनी Wed, 04/15/2015 - 12:27 नवीन
५० % जागा आरक्षित म्हणजे त्या ५० % शिवाय उरलेल्या ५० % फ्री जागांवर सुद्धा क्लेम येतोच ! हे अ‍ॅडमिशनच्या बाबतीत वर्षानुवर्षे होत आहे. मग फक्त याच बाबतीत स्त्रियांनी ५० % आरक्षित जागावरच बसला पाहिजे असा आग्रह कसा काय ?
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील गुरुवार, 04/16/2015 - 10:16 नवीन
आयुर्वेदिक वैद्य म्हणुन ज्या प्रकारचे नमुणे समोर येतात ते इथे लिहुही शकत नाही.(आयुर्वेदाकडे आजही ४०% रुग्न सेक्स मेडिसिन साठी येतात.) त्यात स्त्रिया आणी पुरुष दोन्ही आले पण हरामखोरीचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे हे मान्यच करावे लागेल.कॉलेजियन्स परवडले पण हे जे ३५ च्या पुढचे पुरुष जो काही प्रकार करतात तो धक्कादायक आहे.ज्या दिवशी एखाद्या बस मध्ये एखादी लढवय्यी स्त्री एखाद्या विकृताचा जिव घेत नाही तोपर्यंत अश्या नमुण्यांना जरब बसणार नाही.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/20/2015 - 13:58 नवीन
परवाच बसने प्रवास केला.. ७.३० - ८ - वाट पाहुनी जीव शिणला... ८- ८.३० - धक्काबुक्कीत जीव गेला.. ८.३० - ९.१५ - बस बंद पडली म्हणून रस्त्यात देह ताटकळला... ९.१५ - ९.३० - भरल्या बसला अजुन ७-८ लोकांचा काय भार म्हणुन देह गर्दीत कोंबला... ह्यात सांगायची गोष्ट अशी की सगळेच जाम वैतागले होते.. खुप बस बंद पडल्या होत्या.. राखीव जागेवर ४ पुरुष बसले होते.. पण मला जागा द्यायला एक मुलगी उठली. मग एका आजींना धक्काबुक्की होऊ नये म्हणुन मी अबीरला त्यांच्या मांडीवर देऊन उभी राहिले. गाडीत ५-६ जणी उभ्या होत्या. पण पुन्हा एकदा, एकीनेही एकाही पुरुषाला उठवले नाही... तसल्या तुफान गर्दीमध्ये सुद्धा... तुमच्या धाग्याची २ तास पुष्कळ आठवण काढली!!!
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Tue, 07/14/2015 - 13:26 नवीन
काही नाही हो, असा पिढ्यांनपिढ्या त्रास सहन करून आता स्त्री चा पण "पुरुष" झालाय.. आता तीच "बिचारी" नाय राहिली तर वरिजनल पुरुषाला त्रास होणारच.. :)
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Tue, 07/14/2015 - 13:50 नवीन
पिलीयन रायडर >>+1111111111111111111 हजारो वर्षांच्या अन्यायाचा बदला घेताहेत हो>>> म्हणजे हजारो वर्षे अन्याय झालाय हे मान्य आहे तर . मुळात स्त्रियांसाठी राखीव जागा कशासाठी दिलेल्या आहेत हेच बर्याच जणांना माहित नाहीयेत . गर्दीचा फायदा घेवून स्त्रिया मुलींना त्रास देणार्यांच्या त्रासातून सुटका होण्यासाठी ह्या जागा दिल्या आहेत . म्हणजे अर्थातच त्याच्यावर तरुण स्त्रिया मुलींनी बसणं अपेक्षित आहे . गडी माणसांना एवढा राग येतो तर त्यांनी राखीव सीट वर बसावच कशाला ?
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Tue, 07/14/2015 - 14:01 नवीन
म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते?>>> म्हातारेच खरे हरामखोर असतात . कारण त्यांच्या वयाकडे बघून आपल्याला कोणी जाब विचारणार नाही हि त्यांची समजूत अस्ते. आपल्या नातीच्या वयाच्या मुलीशी बसमध्ये निर्लज्ज चाळे करताना मी स्वतः बघितलं आहे म्हतार्यांसाठी हि राखीव असन असतात . पण हे म्हातारे तिथं बसत नाहीत . मुद्दाम स्त्रियांच्या रांगेत बसतात . माझ्या बसने रोज येणारे आजोबा सगळी बस रिकामी असली तरी मुद्दाम तिथेच बसायचे . एकदा चांगलं झापलं म्हातार्याला . मग इकडच्या बाजूला बसायला लागला. काही बिनडोक बायका मुली सुधा मुर्दडासारख्या गप्प बसतात . तर पण हिम्मत नसते त्यांच्यात .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा