१२ वी नंतर करिअर संबंधी मार्गदर्शन
१२ वी नंतर करिअर संबंधी मार्गदर्शन
माझ्या ओळखीत असणार्या एका जेवण बनवण्यासाठी येणार्या बाईंच्या मुलाने सध्ध्या १२ वीची परिक्षा दिली आहे. त्याला १२वी नंतर मेडिकल अथवा इंजिनीअरींगला नाही जायचे तर त्याला कोणते दुसरे पर्याय सुचवता येतील?
मुलगा आत्तापर्यंत कणकवलीला शिकला आहे. १२ वी सायन्स ला होता (PCMB).
१०वीत स्वत: अभ्यास करून ८५% मिळवलेले होते आणि मुलगा अभ्यासू आहे
घराची आर्थिक परिस्थिती फार बेताची आहे
शक्यतो असे पर्याय सुचवावे वाटतात जे थोडे हटके आहेत जसे
मरीन इंजिनीअरींग
मर्चंट नेव्ही
शिपिंग फिल्ड
समस्त मिपाकरांना आवाहन आहे की जर उपयुक्त माहिती असेल तर या धाग्यावर लिहावी…माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी
अवांतर -
जसा मी दुसर्यांच्या धाग्यावर दंगा करतो तसा या धाग्यावर जर कोणाला दंगा करायचा असेल तर माझी ना नाही …अट फक्त एकाच की दंगा घालायच्या आधी १ तरी प्रतिसाद असा लिहावा ज्यामुळे त्या मुलाला करिअरसाठी उपयोग होईल
असे पर्याय सुचवावे वाटतात जे थोडे हटके आहेतहे जरा जपून.काही ओळखी/गाईडन्स/लींक असतील तर असले धाडस करावे. aircraft maintenance चांगल्या मार्काने पास होऊनही ४-५ वर्षापासून वैतागलेला १ मित्र आता परत MBA करतोय. अशा कोर्सेसना जॉब ओपनिंग कमी असते. exception ही आहेत. बाकी रिस्क जास्त असेल तिथे बार्याचदा फायदेही जास्त असतात. पण जपून.There are colleges in pune offering these courses. Diploma courses available in Pune. Degree courses in Mumbai, dhule, Jalgaonसरफेस कोटींग टेक्नोलोजी जर इंडस्ट्रीयल प्रीपेंटेड कलर कोटींग शीट्स (स्टील शीट्स) बद्दल म्हणत असाल तर त्याला जास्त स्कोप नाही कारण स्टील पेंट मॅनुफॅक्चरीं कंपन्या पुर्ण भारतात मोजुन ५-६ आहेत त्यामुळे नोकरीसाठी प्रॉब्लेम होतो आणि मग बाकीच्या क्षेत्रात ही फारसा वाव नाही.