Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व

अ — अश्विनि कोल्हे, Tue, 04/14/2015 - 08:41
आजपर्यंत बर्याच कविंनी, आई,बहीण,पत्नी,मुलगी या सर्वांवर अनन्य साधारण कविता रचल्या आहेत पण सासुवर कधी कोणी कविता रचलीय? कि नुसत्या नावानेच तुमची हिंम्मत खचलीय? अरे,असतील तुम्हाला खर्या भावना तर रचवा सासुवर कविता आणि समजू द्या या जगाला सासुच्याही मनातल्या यातना. आजपर्यंत सासुची प्रतिमा नेहमी सुनेला छळणारी म्हणुनच केली गेलीय पण कधी तिलाही सुनेने छळले असेल याची कल्पना तरी कोणी केलीय? प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते तिलादेखील भावना असतात,मन असते तिचे मन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला तर,कळेल की तिनेही किती सहन केलंय. तिलाही तिच्या सासुने छळलेलं असतं तिच्याही इच्छा मारल्या गेलेल्या असतात. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ती तिच्याही आकांक्षा चिरडल्या गेल्या असतात. जेव्हा हीच सुन आता होणार असते सासु तेव्हा हळुच तिच्या चेहर्यावर उमलतं हसु ठरवते ती मनातल्या मनात स्वःताशीच की, मी माञ होइल एक चांगली सासु. तिनेही तिचा संसार फुलवलेला असतो तिनेही सासरची मनं सांभाळलेली असतात तिचाही कोणी आदर करावा, प्रेम करावं अशीच स्वप्न उराशी बाळगलेली असतात. तिचे हे स्वप्न समजुन घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही तिच्याही आपल्याप्रति अपेक्षा असतील याचा काडीमाञ ही विचार करत नाही. सुनेने आपली सेवा करावी,सुख द्यावं असेच तिला नेहमी वाटत असतं इतकेच नव्हे तर या समाजात फक्त आपल्याच सुनेचं कौतुक व्हावं असंही प्रत्येक सासुला वाटत असतं. पुर्वीची सासु "बोलकी" होती पण स्वभावाने नव्हती मनमोकळी कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात होती एक असाधारण पोकळी. आजची सासु पुर्वीसारखी राहीली नाहीय ती आता सुनेशी मैञी करायला लागलीय वाटुन घेतेय सुनांसोबत स्वःताचे सुखदुःख त्यांच्याही भावनांचा विचार करायला लागलीय. आपणही एक पाऊल पुढे जाऊया आपल्या पुढे आलेला तिचा हात कायमचा आपल्या हातात घेऊया करुया कधीतरी तिच्याही मनाजोगं तिच्या नाजुक मनाला अलगद जपुया.

प्रतिक्रिया द्या
32370 वाचन

💬 प्रतिसाद (85)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 04/14/2015 - 13:55 नवीन
सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व
ह्या शिर्षकाच्या निमित्ताने इथुन गायबलेल्या आणि सर्वांची प्रेमाsssSsssSSने
विचारपुस करणार्‍या, हातात हात घालणार्‍या, गवतात फिरायला जाणार्‍या, हातात हात धरुन पुसु शकणार्‍या
एका महान, एपिक कवियत्रीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 04/14/2015 - 14:08 नवीन
मी या कवितेचा शिलालेख बनवुन ठेवणार आहे.बारा तेरा वर्षानी मी सासू होईन तेव्हा बराय वापरायला.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 14:09 नवीन
शिलालेख ! लोल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ब
बॅटमॅन Tue, 04/14/2015 - 14:22 नवीन
शिलालेख
तुझं नाव काय? तू कुठे चाललीस? एकमेवोत्तरम् | - इयत्ता लहानी फ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Tue, 04/14/2015 - 14:13 नवीन
सून एक निसटतं व्यक्तिमत्व सासरा एक सपकसं व्यक्तिमत्व नणंद एक कुजकसं व्यक्तिमत्व जाऊ एक येडपटसं व्यक्तिमत्व ही डोमेन अव्हेलेबल आहेत.काव्यसंधीचा लाभ घ्यावा हि विणंती.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Tue, 04/14/2015 - 14:18 नवीन
कशाला ओ कशाला? आधीच दोन गद्य कवितांनी इथं वादळं उठलेत. कशाला उचकवताय त्यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्पंदना Tue, 04/14/2015 - 14:22 नवीन
विहीण?????? ;) एक नकोसं व्यक्तीमत्व?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Tue, 04/14/2015 - 14:30 नवीन
##%%^^&& भापो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सूड Tue, 04/14/2015 - 14:31 नवीन
हे सासूच्या दृष्टीने झालं, सासरा कदाचित 'विहीण एक मैत्रीण' असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 04/14/2015 - 14:33 नवीन
दुसर्‍या दिवशी सासरेबुवा: एक आठवण किंवा सासरेबुवा: एक पुण्यस्मरण वगैरे पण कविता पाडायला लागतील मग. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Tue, 04/14/2015 - 14:37 नवीन
आज हमारे दिलमें अजब ये उलझन है; गाने बैठे गाना, सामने समधन है! हम कुछ आज सुनाये, ये उनका भी मन है; गाने बैठे गाना, सामने समधन है! -एकालग्नाचीअखंडडीव्हीडी ऊर्फ हमाप्केहैकौन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 04/15/2015 - 11:22 नवीन
सासू एक अवजड व्यक्तिमत्व सासरा एक सज्जड व्यक्तिमत्व मेव्हणा एक डोईजड व्यक्तिमत्व मेव्हणी एक भानगड व्यक्तिमत्व साडू एक बोजड व्यक्तिमत्व हे सुद्धा विषय विचारात घेता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 14:17 नवीन
आता येतीलच या डोमेन्स वर काव्यं. समर्थ मंडळी आहेत इथे खूप.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/14/2015 - 14:20 नवीन
डेब्यू तर कडक झालाच पण दुसरी इनिंग पण दमदार चालू आहे ५० अप !
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 04/14/2015 - 16:18 नवीन
कोल्हेकाकू - आज काय नवीन?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/14/2015 - 18:21 नवीन
मेव्हणी-एक हवंहवंसं व्यक्तिमत्व अशी कविता लिहावी म्हणतो ;) #हीनप्रतिसाद
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 04/14/2015 - 18:47 नवीन
_^_ धन्य आहात तुम्ही , आमच्या सारख्या भावी सुनांना तुमचा हां प्रेरणादायी लेख / कविता मैलाचा दगड ठरणार आहे याची णोंद घ्यावी , ए व्हड़े बोलून मी माझे ५० शब्द संपवते जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 04/14/2015 - 22:40 नवीन
ह्म्म्म चांगलंय...
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Wed, 04/15/2015 - 06:04 नवीन
छान गं आशुताई ! तू लिहित रहा हळुहळु सफाई येइल लेखनात ! टवाळ मिपाकराङ्कडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम !
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 02/22/2016 - 15:18 नवीन
वाह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
त
तिमा Wed, 04/15/2015 - 06:29 नवीन
प्रश्न मिपावरील ज्ञानी मंडळींना: पदार्पणातच, दोन्ही इनिंग्ज् मधे सेंचुरी ठोकणारे क्रिकेटर्स कोण कोण आहेत हो ?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 04/15/2015 - 07:22 नवीन
यासिर हमीद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ब
बोका-ए-आझम Tue, 02/23/2016 - 03:55 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
व
विशाखा पाटील Wed, 04/15/2015 - 07:02 नवीन
या कवितेतलं गद्य, वाचकाला आक्रस्ताळेपणे विचारलेले प्रश्न, यमकाचा अभाव, उपदेशाचे डोस, अभिनिवेष इत्यादी इत्यादी वगळल्यावर जे काय उरेल ते उत्तमच असेल. तेवढं टाळता येतं का ते बघा. आपल्याला आणि वाचकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 04/15/2015 - 07:10 नवीन
इत्यादी वगळल्यावर जे काय उरेल ते!! ;) :) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
त
तिमा Wed, 04/15/2015 - 07:47 नवीन
इत्यादी वगळल्यावर या प्रतिसादानेच गलित गाञ झाल्यासारखे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/15/2015 - 09:30 नवीन
@ गाञ>>> :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अजया Wed, 04/15/2015 - 08:53 नवीन
वाचनमाञ रहावं आता!
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 04/15/2015 - 11:50 नवीन
धागा तेवढा 'वाचनमाञ' करु नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मोहनराव Wed, 04/15/2015 - 13:09 नवीन
मला कवितेतल काय कलत नाय पन इतके परतिसाद मंजी नक्कीच चांगलं लिवलं अस्नार..!! पुढच्या वाट्चालीस (जिलबीस) शूबेच्चा!!
  • Log in or register to post comments
म
मयुरा गुप्ते Wed, 04/15/2015 - 20:49 नवीन
अश्या सासुबाई कुठे असतात आम्हालांही दाखवा एकदा.. "वाचकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा! " हे बेश्ट आहे. -मयुरा
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 04/16/2015 - 11:23 नवीन
भरपुर करमणूक करत आहे त्या बद्दल कोल्हेबाईंचे अभिनंदन. पुकप्र....(पुढिल कवितेच्या प्रतिक्षेत)
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 04/16/2015 - 11:28 नवीन
मजा आली माञ. मी लिहीणारच. मिसळपाव वर पण टाकणार.कितीही आक्षेप आले तरी. मिञांनो वाट पहा माझ्या नविन कवितेची. कोल्हे तै कधि टाकताय नविन कविता ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/23/2016 - 03:15 नवीन
हैला! हे वाचलच नव्हतं अजून! इतक्या कळकळीने लिहिलेल्या कवितेवर मिपाकरांनी असा धुडगूस घातलेला पाहून.. . . . . . . धुडगूस घालायला मीही का नव्हते हे मनात येऊन, एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे..
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 03/09/2016 - 15:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा