Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरात....... २.... डभोई

ज
जयंत कुलकर्णी
Tue, 04/14/2015 - 08:52
💬 12
गुजरात....... २ दभोई हे शिल्प बहुदा चांमुंडाचे किंवा कालिचे असावे. सातव्या शतकात योगिनींच्या पूजेस प्रारंभ झाल्यावर भारतात अनेक ठिकाणी त्यांची देवळे तयार झाली ( वर्तुळाकार असतात) त्यातील काही देवतांच्या मूर्ती स्वतंत्रपणेही आढळतात. मला शंका आहे कदाचित या मूर्ती तत्सम असाव्यात. Simple, Free Image and File Hosting at MediaFire या देवतेखाली जे वाहन दाखविले आहे ते नीट दिसत नाही कारण छायाचित्र खालून काढले आहे. पण ही बहुदा सरस्वती किंवा ब्राह्मणी असावी. Simple, Free Image and File Hosting at MediaFire एका देवतेचे वाहन उंदरासारखे दिसते तर दुसरीचे मनूष्य. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे तर मनूष्य हे कुबेराचे. पण यात मला सुसंगती लागली नाही. अर्थात गणेशीचे शिल्प आपल्या येथे आहे पण कुबेरावरुन एखादी देवता असेल असे मला वाटत नाही. वल्लीने किंवा अजून कोणाला माहिती असल्यास यावर प्रकाश टाकावा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेजारच्याच देवळाच्या भिंतीत चिणलेला एक दगड. खाली अजून दोन दगडांची छायाचित्रे दिली आहेत. Simple, Free Image and File Hosting at MediaFire ही बहुद उमा योगिनीचे शिल्प असावे. सप्त मातृकांनंतर स्त्रिशक्तीच्या विविध रुपांचे प्रतिनिधित्व मूर्तींमधे दिसू लागले त्याचेच हे उदाहरण. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आतल्या खांबांवर प्रकाश इतका मस्त पडला होता की फोटो काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते. Simple, Free Image and File Hosting at MediaFire हिंदू देवळात हमखास आढळणारे शिल्प या माणसाचे असते. भारवाहक. अशी कल्पना आहे की हा आपल्या हाताने मंदीराचा भार उचलतो. काही भारवाहकांच्या शिल्पात त्याला तो भार वाहताना होणारे कष्ट स्पष्ट दिसतात. यात एक वेगळी गोष्ट मला आढळली ती म्हणजे त्याचे पाय. ज्या प्रकाराने ते गुडघ्यात वाकविलेले आहेत तसे अंतराळात/अवकाशात उडणार्‍या यक्षाचे दाखविले जातात. शिवाय याला चार हात आहेत. हा भारवाहक आहे का यक्ष ? का एखाद्या यक्षाला भारवाहकाचे काम दिले आहे ? (शिक्षा म्हणून ?) Simple, Free Image and File Hosting at MediaFire थोडे उजवीकडे बघितल्यास एक छोटी कमान दिसते त्यावर ही मुद्रा आढळली. बहुतेक ही नजर लागू नये म्हणून जे कोहळे तामिळनाडूमधे घरावर टांगतात त्याप्रकारचे काहीतरी असावे पण खात्री नाही. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आपल्याकडे जसे गधेगाळ सापडतात त्याप्रमाणे येथे गधेगाळ नव्हता पण भिंतीवर तत्सम शापवाणी कोरली होती. व गधेगाळावर जशी मूर्ती असते तशी अस्पष्ट असे चित्रही कोरले होते. एक माणूस उत्साहाने आम्हाला ते दाखविण्यास घेऊन गेला व त्याने जे सांगितले ते ऐकून मी पडायचाच बाकी होतो. " पूर्वी राजाची राणी गाढवाबरोबर झोपायची त्याचे ते चित्र आहे'' त्याचे ताबडतोब शंका निरसन करण्यात आले व पुढे खरे काय तेच सांगावे असे त्याला बजाविले. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेजारी जे मंदीर आहे त्याच्या कुंपणामधे जे दगड चिणले आहेत त्यावरील काही कोरीवकाम. Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire ही कमान बघून आम्ही हिराभागोलची चौकशी केली. त्यावरील नक्षिकाम अप्रतीम आहे त्याचा एक नमूना.....व बाकीची छायाचित्रे पुढच्या भागात. Simple, Free Image and File Hosting at MediaFire याच ठिकाणी आम्हाला वढवाणा तलावाबद्दल माहिती कळाली आणि आम्हाला पक्षांचा खजिनाच सापडला तेही पुढच्या भागात..... क्रमशः जयंत कुलकर्णी.

Book traversal links for गुजरात....... २.... डभोई

  • ‹ गुजरात....... १ डभोई.
  • Up
  • गुजरात.......३ डभोई हिरागेट ›

प्रतिक्रिया द्या
7929 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मोदक Tue, 04/14/2015 - 09:00 नवीन
सुंदर प्रचि - पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 04/14/2015 - 09:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कपिलमुनी Tue, 04/14/2015 - 09:43 नवीन
सफर छान चालू आहे
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Tue, 04/14/2015 - 09:49 नवीन
भारी माहिती आणि फोटो!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/14/2015 - 10:09 नवीन
भारीच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/14/2015 - 12:37 नवीन
दुसरी देवता कदाचित ब्राह्मणीच असावी. सरस्वतीची शक्यता कमी वाटतेय. कारण वाहन मोर असते तेव्हा त्याचा पिसारा लांबलचक दाखवलेला असतो. तसे येथे दिसत नाही. तिसरी प्रतिमा गुंतागुंतीची आहे खरी. मूषकवाहिनी खरे तर गणेशिनी किंवा विनायकी असते मात्र तीचे मुख गणपतीसारखेच असते. शेजारची प्रतिमा बहुधा प्रेतवाहिनी चामुंडा असावी. किंबहुना ह्या दोन्ही प्रतिमा गणेशिनी आणि चामुंडेपैकी नसून त्या योगिनींच्या असाव्यात. पोपटाचे मुख असलेली योगिनी उमा का योगिनी शुकी?
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Tue, 04/14/2015 - 12:50 नवीन
एकीकडे मोदक यांची इंदोर वारी तर तुमची गुजरात वारी, हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे …
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 04/14/2015 - 14:57 नवीन
मस्त फोटोज. अगदी मेजवानीच!
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 04/14/2015 - 16:02 नवीन
मस्त सफर.पुभाप्र.
  • Log in or register to post comments
म
मॅक Wed, 04/15/2015 - 09:08 नवीन
फोटो आणी माहिती दोन्ही खूप छान.......
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 04/20/2015 - 13:28 नवीन
फोटो पाहून डोळे निवले.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/27/2015 - 13:45 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा