Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असा मी तसा मी

R — Rajvardhan, Wed, 04/15/2015 - 07:44
असा मी तसा मी कधी असेन निर्मळ ब्रम्ह्कमळ तर कधी गलिच्छ बोतरा नदीकिनारी विसर्जित निर्माल्य मी वा गौरीपुजनासाठी वाहिलेला फ़ुलोरा मी नववधूने गृह्प्रवेश करताना ओलंडलेले माप मी वा शॄंगारच्या परमोच्च क्षणांचा सर्वेसर्वा मी असा मी तसा मी अळवावरुन घसरणारा दवबिंदू मी वा गवतातून हेलकावे घेणारे पर्णओहोळही मी काटेरी झूडपातील आंबट बोर मी वा काटेरी बाळसदार फ़ुलणारा एक सायाळ मी असा मी तसा मी तहानल्याची तृष्णा मी जीविताचा प्राणवायू मी देहाला शिरशीरी आणणारी एक मधाळ झूळूक मी वा वाऱ्याचे झंझावते नृत्य वादळ मी जिथे आभाळही ठेंगण होत ते क्षितीज मी असा मी तसा मी वर्षा ऋतुत न्हाऊन निघालेला पहाड मी पश्चिमेला सप्तरंगाची उधळण करणारे एक इंद्र्धनुष्य मी वा वसंत ऋतुची चाहूल देणारी कोकिळा मी ग्रीष्मातील गुलाबी शीतलहरी मी असा मी तसा मी चिरेबंदी वाड्याच्या कौलातून येणारी प्रकाशाची तिरीप मी देवघरात दरवळणारा प्रांजळ धूप मी पहाटेच्या दवांत उमललेला एक प्राजक्त मी वा अंगणातील पावित्र्य तुलसी वॄंदावन मी सात्विकतेने गॄहिणीने केलेली रंगांची उधळण रांगोळी मी असा मी तसा मी वेशीवर वर्षानुवर्षे तपश्चर्येत मग्न असलेला वट्वॄक्ष मी गावकूसाबाहेर ओसाड पडलेला पाण्याचा एक आड मी निर्जन टेकडीवरील निशांत एकांत मी वा नदीकिनारी पूरातून वाहुन आलेला एखादा निर्वासित देह मी असा मी तसा मी >> मी मात्र >>राजर्वधन

प्रतिक्रिया द्या
1195 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रचेतस Wed, 04/15/2015 - 07:55 नवीन
भगवद्गितेतला विभूतियोगच आठवला डायरेक्ट.
  • Log in or register to post comments
R
Rajvardhan Wed, 04/15/2015 - 08:29 नवीन
असो विभुतिसम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/15/2015 - 09:03 नवीन
@ भगवद्गितेतला विभूतियोगच आठवला डायरेक्ट.>> खरच खरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विवेकपटाईत Wed, 04/15/2015 - 18:11 नवीन
कृष्णाचे सर्व रूप आठवले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा