Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वळ्ण

य — योगेश भालेकर, Wed, 04/15/2015 - 10:11
अनोळखी वळणावर माझं आणखी एक पाउल, तू इथं नसतानाही इथंच असल्याची चाहूल, प्रत्येक शब्दं शब्दं मला सगळं स्पष्ट आठवतंय, तुझ्यामाझ्यातलं अंतर मला पुन्हा मागे पाठवतंय, तसं बरंच काही सांगायचं होतं,राहून गेलं, मनात साठलं ते, पावसासकट वाहून गेलं, "तू कसा आहेस?",विचारताना तु़झी घालमेल कळ्लीच, प्रश्न होते नवीन पण आपुलकी तुझी अगदी पहिलीच, थंड पडले होते तुझे ते काळे डोळे, ओठांवर हसु तरी शब्द थोडे ओले, बघ तुला काही अजुनही आठवतंय का? आठवणींच्या गाठोड्यात माझं काही सापडतंय का? गालांवर ओघळ्णार्या माझ्या त्या आठवणी, ओठांवर तरळणार्या माझ्या त्या आठवणी, थरथरत्या हातांत अडकलेल्या माझ्या त्या आठवणी, अन तुझ्या मिठीत सापडलेल्या माझ्या त्या आठवणी, खरंच सगळं कळ्तंय मला, तुझं जाणं आजही छळतंय मला, मी तुला दिलेला माझा शब्द पाळतोय, आजही तुझ्यातच स्वतःला जाळतोय, दिसतंय, आज उत्तरं बदलली आहेत तुझी, पण आज, प्रश्नंच कुठं आहेत माझी? अन अगदी लगेचंच, नेहमीप्रमाणे तू आसवांना वाट करून दिलीस, कदचित त्या दिवशी तुही काही आसवं पाहिली असतीस!! खरंच त्या दिवशी तुही काही आसवं पाहिली असतीस!!

प्रतिक्रिया द्या
1056 वाचन

💬 प्रतिसाद (3)
व
वेल्लाभट Wed, 04/15/2015 - 10:27 नवीन
कविता मस्त सुरू होती. सही जमलेली वाटत होती. लय, भाव, सगळं मस्त. आणि इतक्यात....
पण आज, प्रश्नंच कुठं आहेत माझी
आँय?????? माझी? आणि या पुढे कवितेचा शेवटही फुसका वाटला. वैयक्तिक मत हं. अनुभूतीचा चढता आलेख वरील वाक्याच्या कडव्यानंतर झपकन खाली आला राव. तरीही....छान ! जाळतोय.... इथेच संपवली तर कविता? शेवटचा पंचही अबाधित राहतोय. एक सल्ला मात्र.
  • Log in or register to post comments
य
योगेश भालेकर Wed, 04/15/2015 - 10:50 नवीन
धन्यवाद! प्रतिसादाबद्दल धन्यवाद :-) ! कदाचित मला शेवट अचुक शब्दांत पकडता आला नसावा. पण शेवटात मला नायकाची भूतकाळाची स्थिती आणि नायिकेची सध्यस्थिती यांमधले साधर्म्य दाखवायचे होते.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 04/15/2015 - 18:07 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा