Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुक्कुट शर्विलक-विलाप

च — चलत मुसाफिर, Wed, 04/15/2015 - 18:27
(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.) मालवणातिल सागरलहरी मला खिजविती अष्टौप्रहरी बाण लागता नको तिथे हा पर झाली 'कनका'ची नगरी 'कुक्कुट गेले साथ सोडुनी 'विकास' दिसता दुज्या अंगणी चोचीमधला दाणा जपती नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी 'वाघ' लागला मागावरती 'वांदरे'हि किलकारा करती वनवासातुन सुटका या हो कधी व्हायची? घटिका सरती.. 'सोनिया'सम ते दिन ना उरले 'घड्याळा'तलेही क्षण सरले ठेवावे हे मस्तक ऐसी दिसतिल का चरणांची 'कमले'?

प्रतिक्रिया द्या
3792 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/15/2015 - 18:37 नवीन
वाह, एकदम समयोचित काव्य.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 04/15/2015 - 19:22 नवीन
वाह !!
  • Log in or register to post comments
H
hitesh Wed, 04/15/2015 - 19:54 नवीन
घड्याळातले क्षणही सरले. असे केले तर सुरात बसेल
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 04/15/2015 - 20:17 नवीन
वाह !! क्या बात .... क्या बात .... क्या बात....!!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 04/15/2015 - 20:20 नवीन
क्या बात है राव ! क्या बात है ! आहा ! जम्या है!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/15/2015 - 20:51 नवीन
ह्हा ह्हा ह्हा ह्हा! जबरी एकदम!
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 04/15/2015 - 21:06 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 04/15/2015 - 21:13 नवीन
जबरी एकदम लय भारी
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 04/15/2015 - 21:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
र
रमेश आठवले Wed, 04/15/2015 - 22:34 नवीन
नुकत्याच झालेल्या चार पोट निवडणुकी मध्ये तीन ठिकाणी मृत आमदाराच्या पत्नी त्यांच्या पतिने जिंकलेल्या जागेवर त्याच्याच पक्षातर्फे निवडून आल्या. उत्तराखंड मध्ये कॉंग्रेस, वांद्र्यात शिवसेना व तासगावात पवारांची पार्टी जिंकली. पंजाब मध्ये मात्र तसे काही सुतक नसल्याने अकाली दलाने कॉंग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याने रिकामी झालेली जागा कॉंग्रेस कडून हिसकावून घेतली. ही पक्षीय राजकारणा पलीकडची मतदारांची भावनिकता, राणे यांच्या सारख्या जुन्या खेळाडूला आधीच लक्षात यायला हवी होती. समयोचित आणि समर्पक हास्यरस कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
क
कहर गुरुवार, 04/16/2015 - 05:15 नवीन
कहर केला राव …
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 04/16/2015 - 05:26 नवीन
ही "मुसाफीरी" जाम आवडली. आता नगरसेवक म्हणून निवडणूक लढविणार का हे बघावे लागेल. नाहीतर कोकणात ग्रामपंचायत आहेच की.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 04/16/2015 - 05:28 नवीन
जबरदस्त. समयोचित कविता.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 04/16/2015 - 05:46 नवीन
समयोचित!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/16/2015 - 06:32 नवीन
वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Trai
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर गुरुवार, 04/16/2015 - 06:35 नवीन
प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व कुक्कुटप्रेमींचे आभार. रच्याकने, "समयोचित"चा अर्थ "कविता काही खास नाही, पण टायमिंग बरं आहे" असा होतो हे समजण्याइतका आता मिपावर रुळलो आहे :-)
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 04/16/2015 - 06:58 नवीन
कचकुन एकदम
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 04/16/2015 - 11:09 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा