माझा स्वभाव
भातुकलीचा खेळ मांडणे हा तुझा रियाज
न खेळ मोडणे माझा स्वभाव
मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम
न दुर्लक्षित करणे माझा स्वभाव
रात्री अनेक गेल्या तुझ्या आठवांची
न दिवस मोजणे माझा स्वभाव
उत्तरार्ध तर तुझा कविता संग्रह
न पूर्वार्ध योजने माझा स्वभाव
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इंद्रधनू बरसात
न आसू ढाळणे माझा स्वभाव
ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव
न ओठ शोधणे माझा स्वभाव
@@ मी मात्र@@ राजवर्धन
💬 प्रतिसाद
(10)
च
चुकलामाकला
Sat, 04/18/2015 - 05:54
नवीन
कल्पना आवडली .
अवांतरः
ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव
न ओठ शोधणे माझा स्वभाव
या भटांच्या ओळी आहेत ना?
- Log in or register to post comments
R
Rajvardhan
Sat, 04/18/2015 - 07:15
नवीन
धन्यवाद , नाही
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Sat, 04/18/2015 - 08:02
नवीन
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही - एल्गार, सुरेश भट...
अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही
येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही
हे दु:ख राजवर्खी, ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही
त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही
जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही
झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही
गर्दित गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही
जावे कुण्या ठिकाणी उध्वस्त पापियांनी
संतांतही घराच्या राखेस भाव नाही
उच्चारणार नाही कोणीच शापवाणी
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही
- Log in or register to post comments
R
Rajvardhan
Sat, 04/18/2015 - 10:23
नवीन
मला माहित नव्हतं या बाबुजी च्या ओळी आहेत मलाजे काही सुचले ते मी लिहिले तरीही तुम्हाला काही आक्षेप असेल तर क्षमस्व .
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Sat, 04/18/2015 - 14:32
नवीन
आक्षेपाचा प्रश्न नाही . कधी कधी एकच कल्पना दोघांना सुचू शकते, फक्त ते लक्षात आणून देण्यासठी सांगितले . पु.ले.शु.
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 04/18/2015 - 10:23
नवीन
प्रसिध्द कविता आहे ही सुरेश भटांची.आणि त्यातला या दोन ऒळी तर विशेषतः!!
- Log in or register to post comments
R
Rajvardhan
Sat, 04/18/2015 - 10:39
नवीन
सर्व मराठी जनांची आम्ही जाहीर क्षमा मागतो क्षमस्व.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 04/19/2015 - 06:27
नवीन
मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम.... हा हा हा लग्नाला बरेच वर्षे झाली वाटते.
- Log in or register to post comments
R
Rajvardhan
Sun, 04/19/2015 - 22:28
नवीन
भाऊ लग्न नाही झाले माझे ;-);-);-):-);-)
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Sun, 04/19/2015 - 13:11
नवीन
:):):):)
- Log in or register to post comments