Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गावाकडची जुनाट आज्जी .....

च — चुकलामाकला, Sun, 04/19/2015 - 06:53
जुन्या वहीची कोरी पाने खिन्न उदासी त्यांच्यावरती हुशार अवखळ मुले आजची होड्या का हो बनवत नाही अंगणातली हळवी माती वाट पाहुनी थकून गेली इवले इवले पाय चिमुकले इथे कधी का धावत नाही सडा गुलाबी गोड फळांचा बदाम आहे उभा कधीचा मगज आतला शुभ्र बदामी कुणा कधी का खुणवत नाही आंब्याची ती डहाळ वेडी कैर्‍यांच्या वजनाने झुकली तिला वाटते तुटून जावे एकाकीपण सोसत नाही सुट्टी येते .... संपून जाते..... गावाकडची जुनाट आज्जी उगा बिचारी वाट पहाते .....वाट पहाते.... (पहिल्या कडव्याची कल्पना एका हिंदी शेरावर आधारित.)

प्रतिक्रिया द्या
6001 वाचन

💬 प्रतिसाद (38)
ए
एस Sun, 04/19/2015 - 07:01 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 04/19/2015 - 07:02 नवीन
आज्जीच्या नशिबी आता फक्त वाट पहाणेच उरले आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 04/19/2015 - 15:00 नवीन
अगदी खरे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पलाश Sun, 04/19/2015 - 18:52 नवीन
अलिकडे आजी व्हायचा आधीच आई असतानाच असा "जुनाट" झाल्याचा अनुभव काही प्रमाणात येतो. बहुदा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे नव्वद च्या दशकात व त्यानंतर जन्मलेल्या मुलांच्या आयांसाठी हे जग फार वेगाने बदलते आहे. जीव घाबरा होतो हे असं वाचलं पाहिलं की !!! :( हे वास्तव आहे हे माहित आहे तरीसुद्धा स्वीकार करवत नाही. आशा सुटत नाहीच. असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
स्पंदना Sun, 04/19/2015 - 07:05 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 04/19/2015 - 07:17 नवीन
अंर्तमुख करणारी कविता, आवडलीच
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/19/2015 - 07:47 नवीन
अत्तीशय सुंदर..आणि आशयपूर्ण!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 04/19/2015 - 09:10 नवीन
आवडली आज्जीची आठवण झाली आजच जाऊन आजीला भेटुन येतो
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sun, 04/19/2015 - 09:50 नवीन
"आजच जाऊन आजीला भेटुन येतो" बरं वाटलं वाचून!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 04/19/2015 - 10:21 नवीन
आजच वास्तव
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 04/19/2015 - 10:51 नवीन
म्हातार्या आज्जीला वाटच पाहत बसावी लागणार बहुतेक ! कारण नातवं बहुतेक उन्हाळी शिबिरात डाम्बली गेली असावीत कदाचित.
  • Log in or register to post comments
प
पलाश Sun, 04/19/2015 - 12:48 नवीन
सुंदर कविता!! आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 04/19/2015 - 12:55 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 04/19/2015 - 13:52 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 04/19/2015 - 14:15 नवीन
जीयो चुकलामाकला!सुरेख कविता!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 04/19/2015 - 15:13 नवीन
कविता आवडली. 'वो कागज की कश्ती वो बारिश का पानी' ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
च
चिमिचांगा Sun, 04/19/2015 - 17:02 नवीन
आजीला सांगा घराला चकाचक रंग काढून घे. मस्त गाद्यागिर्द्या टाकून सगळ्या खोल्यांच्या लक्झरी स्वीट्स बनवून टाक. डिश टीव्ही आणि वायफाय कनेक्शन दे. मग 'ग्रँडमा'ज रिझॉर्ट' वगैरे पाटी लावून पेप्रात जाहिरात दे. पब्लिकची रीघ लागेल. अंगणात इवल्या पावलांच्या जागी दारूने जड झालेले पाय नाचायला लागतील. आंब्याच्या डाळीला झोपाळा टांगून हनिमून कपल्सची गळ्यात गळा घालून बसायची सोय करता येईल. साला आपल्या लोकान्ला बिझ्नेस सेन्स नाय.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sun, 04/19/2015 - 17:12 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sun, 04/19/2015 - 18:58 नवीन
अशा भरपुर आज्या आजकाल खेड्यात पहायला मीळतात.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 04/19/2015 - 19:03 नवीन
खुप आवडली
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/20/2015 - 05:33 नवीन
प्रगती प्रगती म्ह्णतात ती, हीच असावी बहुतेक.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 04/20/2015 - 06:10 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Mon, 04/20/2015 - 11:16 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 04/20/2015 - 11:50 नवीन
कविता मस्तच फार आवडली. ते 'डाळ'च्या ऎवजी 'डहाळं' हवेय.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 04/20/2015 - 17:08 नवीन
बरोबर,डहाळी हा शब्द हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
न
नाखु Mon, 04/20/2015 - 11:55 नवीन
आज्जी असीच असावी असे वाटते.... पण आत्ताची आज्जे होसूयामीघ+जुयेरेघा+जम नी तिलाही आठवणी पेक्षा पाठवणीत जाम रस असतो.. ===== गावाकडच्या आज्जीची साथ फकस्त २च वर्षे अनुभवलेला जुनेर नाखु
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 04/20/2015 - 13:54 नवीन
होसूयामीघ+जुयेरेघा+जम हे काय म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चुकलामाकला Mon, 04/20/2015 - 17:07 नवीन
हो, सगळे डोक्यावरून गेले भाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
न
नाखु Tue, 04/21/2015 - 13:21 नवीन
सून (एक्दाची) मी या घरची जुळून येती (कश्याला त्या) रेशीम गाठी जयमल्हार (जीतेण्द्र-श्रीदेवी(जुनी)+जयप्रदा+रेखा+इतर त्यागी हिरवणी) यांच्या (सन १९८० ते १९९०) त्रिकोणी प्रेमकथांचा एक भक्तीपूर्ण-धार्मीक्ता मिश्रीत सुरस आणि अचाट २०१५ सालासाठी अवतार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
ग
गुनि Mon, 04/20/2015 - 12:06 नवीन
निदन आजि तरि आहे.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 04/20/2015 - 16:58 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/21/2015 - 17:23 नवीन
काय सुरेख कविता.. फार सुंदर.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 04/22/2015 - 04:57 नवीन
सगळ्यांनाच धन्यवाद!
  • Log in or register to post comments
B
B amol Fri, 06/05/2015 - 21:28 नवीन
सुरेख कविता
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/06/2015 - 00:17 नवीन
छान आहे, आवडली!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sun, 06/07/2015 - 04:31 नवीन
सुरेख आहे कविता.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 06/08/2015 - 07:50 नवीन
धन्यावाद!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2015 - 07:12 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा