रात्र...!!!!!
केली लाख आर्जवे
तरी सांज हात सोडवून गेली
नको नको म्हणताना
मला ह्या रात्रीस बांधुन गेली
मिटले सारे नकाशे
सार्या दिशा विझुनी गेल्या
होता जिचा दिलासा
ती सावलीही पळून गेली
येई काळोख अंगचटीस
लोचट वारा झोंबे तनामनास
उडताना घरावरी टिटवी
अंगभर शहारा टाकित गेली
मेघ नौबती झाडती
आसमंत गडगडाटी हासे
तो पोहचला वेशीवर
वर्दी दामिनी देऊन गेली
वाटे पळुनी जावे
तर तो दारी उभा ठाकला
मदतीस मारली आरोळी
त्याच्या हसण्यात विरुनी गेली
मग लेवुनी त्याची वासना
रात्र पसरली या माळराना
तो तोडित असता लचके
चांदणी हुंदका दाबित गेली
चंद्र लपला ढगाआड
आसमंत निशब्द झाला
मी फ़ोडित राहिले टाहो
अन वैरी रात्र रंगात आली
अखेर झाली उतरती ती रात्र
मग उगवली पहाट सुतकी
ऐकता व्यथा या उष्ट्या देहाची
माझी मलाच शिसारी आली
दिस झाला केविलवाणा
घरी सात्वंन करुन गेला
दररात्री का हिच शिक्षा?
अशी काय चुक झाली?
कधी संपेल का हा फ़ेरा?
देण्या उत्तर सांज हजर झाली
नको नको म्हणताना
पुन्हा या रात्रीस बांधुन गेली
💬 प्रतिसाद
(15)
प
पैसा
Mon, 04/20/2015 - 18:56
नवीन
कवितेत वेदना पुरेपूर उतरली आहे. काही कल्पना चमकदार आहेत, मात्र रचना थोडी विस्कळीत वाटली. जरा बांधीव झाली असती तर अजून जास्त परिणामकारक वाटली असती. लिहीत रहा. त्यानेच सफाई येईल.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Mon, 04/20/2015 - 20:06
नवीन
तुम्ही सुचवलेल्या सुचनेबद्दल आभार.
पुढल्या वेळेस जरुर प्रयत्न करीन.
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Tue, 04/21/2015 - 07:56
नवीन
वाचताना अंगावर काटा आला
- Log in or register to post comments
R
Rajvardhan
Tue, 04/21/2015 - 09:22
नवीन
कल्पना आवडली
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 04/21/2015 - 09:26
नवीन
शब्दांमागची व्यथा, वेदना आणि बोच पुरेपूर पोचली !
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Tue, 04/21/2015 - 13:32
नवीन
असेच म्हणते.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 04/21/2015 - 12:24
नवीन
सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे मनपुर्वक आभार
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 04/21/2015 - 12:26
नवीन
मागे केव्हातरी एकदा सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी अभिनयीत "त्या रात्री पाऊस होता" हां सिनेमा पहाण्यात आला होता.
त्या चित्रपटात दाखवलेले सोनाली कुलकर्णीच सयाजी शिंदे ह्याने केलेले शारिरिक / मानासिक शोषण, तिची ह्याविरुध्दची हतबलता तिची आगतिकता सगळ सगळ अगदी मनाला सुन्न करुन गेली. दोन दिवस डोकच काम करत नव्हतं.
चित्रपटातील दृश्य पाहून जर एव्हढा त्रास होत होता तर खरच हे सगळ जिच्याबाबतीत घडत असेल तीच काय होत असेल.
त्याच तिरमिरीत ही कविता लिहिलेली.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 04/21/2015 - 12:37
नवीन
अप्रतिम उतरली आहे..
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 04/21/2015 - 13:52
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Tue, 04/21/2015 - 13:34
नवीन
लै डिप्रेसिंग झालयं!
- Log in or register to post comments
V
Vimodak
गुरुवार, 04/23/2015 - 08:35
नवीन
- Log in or register to post comments
V
Vimodak
गुरुवार, 04/23/2015 - 08:35
नवीन
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
गुरुवार, 04/23/2015 - 09:06
नवीन
छान कविता , आवडली
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 04/23/2015 - 20:01
नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
- Log in or register to post comments