Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाहून घे महात्म्या

ग — गंगाधर मुटे, Tue, 04/21/2015 - 12:24

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्‍या
बदलेल भाग्य निव्वळ, घाम गाळल्याने?

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने

शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!

डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने

                                - गंगाधर मुटे 'अभय'
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=


प्रतिक्रिया द्या
2482 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/21/2015 - 15:47 नवीन
वा वा... आनंदकंद वृत्त ! आमच्या बुवांचे फार आवडते वृत्त ! त्यांना कळवतो.... लगेच चाल लावुन देतील ते ! बाकी हे भारी आहे
शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने
=))
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 04/21/2015 - 20:07 नवीन
तुमच्या बुवांच्या आवाक्यात असेल तर शेतीला बेसूर बनण्यापासून रोखा म्हणावं. ग्रामीण जीवनाची लय बिघडलेली आहे, त्याला सुंदरशा लयीत आणण्यासाठी शासनकर्ते सरळ येतील अशी चाल सुचवा म्हणावं. अनंत उपकार होतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 04/21/2015 - 20:15 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 04/22/2015 - 05:48 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 04/22/2015 - 11:17 नवीन
शेवटची ओळः काही तरी 'अभय' कर; . आणि त्या खाली स्वाक्षरी: गंगाधर मुटे 'अभय' . वाचून डोळे भरून आले.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/23/2015 - 06:55 नवीन
मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने काल दिल्लीत असेच काही घडले. अनधिकृतपणे विजेचे कनेक्शन जोडून देनारे काल एक शेतकरी झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असताना फायर ब्रिगेडला पाचारण करण्याऐवजी पोलिसांना आवाहन करत होते.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 04/23/2015 - 11:02 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 04/23/2015 - 19:34 नवीन
सद्य परीस्थितले सगळेच विदारक अनुभव तंतोतंत मांडलेत. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा