Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्षमा नावाच्या भूमातेस

द — देवदत्त परुळेकर, Wed, 04/22/2015 - 19:03
अगणित अत्याचार सोसलेस तू आ‌ई आ‌ई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही असंख्य नांगरांचे फाळ तू क्षमा केलीस आ‌ई, तुझे दुधाने भरलेले स्तन बुलडोझरने कापून टाकले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या दुधात हलाहल जहरिले वीष कालवले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध तू पोटात घातलास कृतघ्न उपजलो आम्ही उन्मत्त झालो आम्ही निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही आ‌ई, तुझे हिरवेगार वस्त्र या पापी हातांनी फेडले आम्ही तुझ्या अंगावर असंख्य वार हसत कृरपणाने केले आम्ही तुझ्या मांसाचे लचके तोडतोय तुझे रक्त घटाघटा पितोय आम्ही आम्हाला क्षमा करु नकोस आ‌ई आता तरी या लेकरांना शिक्षा कर - देवदत्त परुळेकर (२२ एप्रिल - वसुंधरा दिवस)

प्रतिक्रिया द्या
968 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पैसा गुरुवार, 04/23/2015 - 16:39 नवीन
कविता आवडली. वसुंधरेचे हाल करणार्‍या माणसाला निसर्ग वेगवेगळ्या मार्गानी शिक्षा करतोच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा