Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गिरिजा इन अ वंडर लॅन्ड

प — प्रसाद गोडबोले, गुरुवार, 04/23/2015 - 21:44
गिरिजाचा लॉग : १२:१६:१६ घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन ! सतरा . अंक १७ ! बिझिनेस येस बिझिनेस ! गूड आयडीया ! ग्रेट आयडीया इन्डीड ! मनात येतात ते विचार लिहुन काढ आणि वेळ नोंडवुन ठेव ! ग्रेट आयडीया ! गिरिजा यु आर जिनियस ... येस अ नार्सिसिस्टीक जिनियस ! फकिंग जिनियस ! ब्लडी पॅरामाऊंट जीनीयस ! गिरिजाचा लॉग : १२:१६:१५ घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन ! नो . स्टॉप . कॉम्प्युअटर मुव्ही महंमद ने मुव्ही लावलाय आतल्या खोलीत जा आणि चित्रपट बघ => १२:१९:३० धिस इज अ गुड आयडीया इन्डीड ! गिरिजाचा लॉग : १२:१६:१४ घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन ! ओके आठवायचा प्रयत्न कर . १२:०५:०० आपण महंमदच्या घरी आलोय . टेरेसवर गप्पा मारत बसलोय . प्रचंड उकाडा आहे . समोरच्या लेडीज हॉस्टेल मधुन पोरी आपल्या कडे बघत आहेत . कोठेतरी मिक्सरचा आवाज चालु आहे . आपला मित्र घाबरलाय त्याला मी म्हणालो There is nothing to fear ... there is nothing to fear ... we are the only ONE here ! अहंनिर्विकल्पो निराकार रुपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्ती र न बंधः चिदानंद रुपः शिवोहं शिवोहं : असो . च्यायला ह्यांच्या हे लक्षात येणार नाही म्हणा . आपण पायर्‍या उतरुन खाली गेलो आणि हॉल मधे जाऊन १/२ लिटर पाणी पिले . पाणी सम हाऊ दोन्ही बाजुच्या बरगड्या जेथे भेटतात तिथे जाऊन अडकुन बसलय . नाही नाही हा भास आहे . कशावरुन ? सत्य आणि भास ह्यातील फरक तुम्हाला कशावरुन कळणार ? आणि कळाला तेव्हा तुम्ही सत्यात आहात की स्वप्नात हे तरी कसे कळणार ? धिस इज अ गुड आयडीया इन्डीड ! गिरिजा यु आर जिनियस ! गिरिजाचा लॉग : १२:१६:१६ स्टॉप थिन्क राईट नोट डाऊन द टाईम स्टार्ट १२:४०:५० फर्स्ट लेव्हल ड्रीमींग . महंमद बीयर ऑफर करतोय . मला बीयर नकोय . नो बीयर . पश्या भाड्या हागु नकोस . बीयर संपव . घरी बाटली ठेवता येणार नाही मला . नो नो बीयर . महंमद दुसर्‍या मित्राला म्हणला गंडलाय आज नेहमी असं करत नाही असो आपण संपवु समाधी कॅलिब्रेट टाईम : तेक द क्लॉक : गो इन्साईड : रन : टाईम कॅलिब्रेटॅड : गोईंग इनसाईड : नो बीयर क्रेझ्झी क्योंकि सास भी कभी बहु थी हर्‍या इज जीनीयस ! गोड्या इज जीनीयस ! गिरीजा इज जीनीयस ! ११:२६ : ०० राँग टाईं कॅलिब्रेशन रीचेकड : करेक्ट १२: २६:००.................. गुड गुड गिरिजाचा लॉग : १२: २६: ०० घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! टाईम कॅलिब्रेशन केलेले ! टाईम स्टॅम्प १२: २४ : ५१ : इवेन्ट : एक मित्र सोडुन चाललाय : गुड गुड _________________________________________________________ १) भाषा हे केवळ भावना पोहचवण्याचे माध्यम आहे . टाईम कॅलिब्रेटेड : ११:३४:०० २) महंमद अनोळखी चित्रपट दाखवतोय : ल्युक लबास्की ? व्हाट द फक : ३)११: ३५: ३५: कॉपीराईट # बोरींग मुव्ही वी आर डन ! there is nothing to do , there is no where to go , you are already perfect and and you are already complete ! ४) एव्हरी वन इज जीनीयस # बोरींग मुव्ही ५ ) There is nothing to watch you are already perfect ! ६) कीप राईटिंग विथ टाईम स्टॅम्प फोकस ११ :३६:३६ ७) I dont belong here . We are not human beings having spiritual experiences we are spiritual beings having human experiences ! ८)I am not answerable to any one , I do not belong here ९)पिझ्झा . टॅक्सी ड्रायव्हर a १०) अस्युअतरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधि राजः ! I dont belong here .... I belong to himaleya !!! ११) फर्स्ट लेव्हल ड्रीमीन्ग : टाईम स्टॅम्प ११:४४:५० कॅलिब्रेटेड टाईम ! ११:४५:००: हॅल्युसिनेशन १ : बॉब डिलन माझ्या एका मित्रा सारखा दिसतोय आणि तो हसतोय माझ्या कडे पाहुन ! v _________________________________________ अशी ही बनवा बनवी ! महंमदने अशीही बनवा बनवी चित्रपट लावलाय.! अरे पण मित्र मगाशीच घरी गेला होता ना ? तो परत आलाय का ? ! येस बहुतेक त्याला घरच्यांनी गरात घेतले नाही हकलुन दिल्याने परत इथे आलाय ? टाईम स्टॅम्प ११:४५:०० : महंमद टार्टुर्र्र्र्र्र्र्र =)))) दादा कोंडके . My brain is still working ! I know URDU !!!! _______________________________________________________________ ___________________________________ ( हे उलट्या अक्षरात लिहिले आहे ) Yes indeed you do ! Bingo !! काय पांचट पणा आहे हा ? ( इथुन पुढे परत सरळ अक्षरात) __________________________________________________ १२:५०:४०: अ‍ॅक्शन : पायाच्या मधल्या बोटाने अंगठे झटकणे ! महंमद आत्ता हे करतोय . मी थोड्या वेळा पुर्वी हेच करत होतो ( टाईम स्टॅम्प का लिहुन ठेवला नाहीस ) No hindu ... You are Arya sanatan vaidik !! _________________________________________________________ १२:५१:००: हॅल्युसिनिशन २: ह्यॅल्युसिनेशन १ रीपीट : बॉब डिलन माझ्या मित्रा सारखा दिसतोय आणि माझ्याकडे पाहुन हसतोय . गिरीजा नो टॉकिंग !! यु आर ड्रंक ( ? =)) ;) ) Drinking and talking is as bad as drinking and driving ! शॉशॅन्क रीडेम्प्शन हायला ह्या आयडीलिस्टीक लोकांचा नक्की काय प्रॉब्लेम असतोप : पश्या आपसाठी काम करतोय . हाऊ फनी !! हॅल्युसिनेशन ३: मला असं हॅल्युसिनेशन होतय कि मगाचचेच हॅल्युसिनेशन परत येत आहे . आणि आता बॉब डिलन जोरात हसतोय ... हाहाहाहाहाहाहा ________________________________________ ११:५६ टेस्ला Time is absolute ! Time calibration correct ! Varified !! # अशी ही बनवा बनवी शिखंडी कनेक्शन : ट्विटर ग्राफ अ‍ॅनालिटिक्स # पीजे हॅल्युसिनेशन ४ : मला डास चावतोय , डास अजुन चावतोय , हसतोय ! ___________________________________________________________ टाईम स्टॅम्प १२:०१: ?? हायबरनेट : एन्जोय द स्टेट : रीस्टार्ट व्हेन अ‍ॅल्गोरिदम कन्वर्जेस : स्टार्ट हायबरनेशन : हायबरनेट ______________________________________________________________ ह्यॅलुसिनेशन ५: मी पडत आहे . ग्रॅव्हिटी झीरो स्टेट ! नीमो , आय लव्ह माय नीमो !! How do you know what is real and what is hallucination ? ह्यॅल्युसिनेशन ६ : महंमद खरचं महंमद आहे !! ह्यॅलुसिनेशन ७: Hyper dopamine secretion ! माझ्या मेन्दुच्या कोणत्यातरी कोपर्‍यात प्रचंड प्रमाणात डोपामाईन सिक्रीट होतय , Yes this is it ! This is it ! this is NOT an hallucination !! What is TRUTH ? A Tautology ?? # अशी ही बनवाबनवी How do you know ? You yourself in a dynamic state ! Physics => Maths => Philosophy => Absolute Truth !! हॅलुसिनेशन ९ : देजावु !!टाईम स्टॅम्प : १२:१३:२५ !! Very funny !! हाहा !! ( कॅलिब्रेटेड घड्याळ हॉलमधल्या घड्याळा पेक्षा १ तास मागे होते म्हणल्यावर देजावु होणार की तासाभराने !) Proc Log : महंमद म्हणाला एन्जॉय द स्टेट ! १२:१६:००: _____________________________________________________________________ ह्यॅल्युसिनेशन १० : I am burning like a ghost rider x You dont have proof for n=0 ! तिसर्‍या मित्राने मान्य केले की तो जीनीयस नाहीये ! _________________________________________________________________ पेपर संपत आलाय . मला अजुन पेपर हवाय १२:२०:०० अ‍ॅट झीरो ! Bingo ! my brain is still working !! गिरिजाचा लॉग : १२:२० : ३१ घड्याळ : मला घड्याळ पाहिजे आणि पेपरही , व्यवस्थित चालणारं घड्याळ ... सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन ! _______________________________________________________________

प्रतिक्रिया द्या
16080 वाचन

💬 प्रतिसाद (77)
प
पैसा Fri, 04/24/2015 - 04:43 नवीन
हे काय आहे! प्रगो, सगळं ठीक आहे ना?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 04/24/2015 - 05:25 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रसाद गोडबोले Fri, 04/24/2015 - 16:33 नवीन
अरे नाही नाही नाही ! ही समाधी अवस्था खचितच नाही , उलट अज्ञ जन ज्याला समाधी समजुन गुरफटुन बसतात तीही अवस्था आहे ! समाधी अवस्थेविषयी काय बोलणार ... बोलणें तितुकें व्यर्थ जातें । बोलतां अनुभवा येतें । अनुभव सांडितां तें । आपण हो‍ईजे ॥ अशी काहीशी अवस्था आहे ती !! कधीतरी वेळ काढुन निवांतपणे लिहिन ह्या विषयावर :) समाधी साधन संजीवन नाम | शांती तयासम सर्वांभूती || १ || शांतीची पै शांती निवृत्ती दातारू | हरिनाम उच्चारू दिधला तेणें || २ || शम दम कळा विज्ञान सज्ञान | परतोनि अज्ञान न ये घरा || ३ || ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट | भक्तीमार्ग नीट हरिपंथी || ४ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
सतिश गावडे Fri, 04/24/2015 - 16:36 नवीन
तुम्हाला स्वतःला समाधीचा अनुभव आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 04/24/2015 - 17:01 नवीन
तुम्हाला स्वतःला समाधीचा अनुभव आहे का?
हा प्रश्न म्हणजे मौन पाळणार्‍या माणसाला तुम्ही मौन पाळत आहात का असे विचारण्यासारखा आहे , म्हणजे त्याने उत्तर दिले तर मौन भंगले , नुसते डोके हलवले तरीही मानसिक मौन भंगलेच की आणि उत्तर नाही दिले तर शंका घ्यायला जागा राहिली ! अनुभव आहे असे म्हणावे तर अनुभवता म्हणुन कोणीतरी त्रयस्थ होता अर्थात समाधी लागलीच नव्हती असा अर्थ होतो , अनुभव नाही म्हणावे तर मग वरचे सगळेच "तोंड पसरुनिया सुणे ! भुंकुन गेले ! " असे होईल आणि काहीच न बोलावे तर शंका घ्यायला जागा राहील !!! असो ! विषय गंभीर आहे ! ऑफलाईन चर्चा करु ! You have to understand, most of these people are not ready to be unplugged. And many of them are so inured, so hopelessly dependent on the system, that they will fight to protect it. - The Matrix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 04/24/2015 - 04:52 नवीन
रविवारी येतोस का? १/२ ऐवजी १ लिटर कोल्ड कॉफी पाजतो जर्रा थंडावशील ;) ;) ;)!!!
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 04/24/2015 - 05:44 नवीन
टिकटिक वाजते डोक्यात बरंच काही प्रगोच्या(डोस्क्याच्या)खोक्यात!! रच्याकने:कुछ लेते क्युँ नहीं?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 04/24/2015 - 06:12 नवीन
शायद कुछ लिया है, इसीलिये तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सतिश गावडे Fri, 04/24/2015 - 06:23 नवीन
बरंचसं असंबद्ध आहे त्यामुळे विशेष काही कळलं नाही. एक लक्षात आलं ते हे की या असंबद्ध विचारांच्या सुपर फास्ट एक्स्प्रेसने खुप सार्‍या विषयांना ओझरता स्पर्श केला आहे. त्यातले दोन विषय तत्वज्ञान आणि मानसशास्त्र. पूर्वी माझ्या मनात डील्युजन (भ्रम) आणि हॅल्युसिनेशन (भास) या शब्दांच्या अर्थांबाबत गोंधळ व्हायचा. एका मित्राने म्हटलं, "तू जर नास्तिक असशील तर या शब्दांचे अर्थ लक्षात येणं खुप सोपं आहे." मी म्हटलं, "कसं?" "देव आहे हा भ्रम. आणि देव माझ्याशी बोलतो हा भास". मित्र चेहर्‍यावरचे उडालेले रंग पाहून हसत होता. "आणि मी जर बिलिव्हर असेन तर?" माझा प्रतिप्रश्न. "देवाच्या जागी भूत शब्द वापर. बाकीचं तसंच". मित्र स्थितप्रज्ञासारखा शांत. "आणि माझा भूतयोनीवरही विश्वास असेल तर?" "तुझा देव त्या भूतांपासून तुझे रक्षण करो." there is nothing to do , there is no where to go , you are already perfect and and you are already complete ! कुणी म्हटलं असेल बरं हे? कुणी का असेना, कुणीतरी मोठा तत्ववेत्ता किंवा विचारवंत असणार. चिंतनातून त्याची अशी मनोभुमिका झाली असणार आणि मग कधी तरी त्याच्या त्या मनोभुमिकेला शब्दरुप मिळाले असणार. लोक ते वाचत असणार. क्षण, दोन क्षण स्वतःला मुक्त समजत असणार आणि तिसर्‍या क्षणाला पन्नास लाखाच्या आसपास टू बिएचके कुठे मिळेल हे शोधायला इंटरनेटकडे धाव घेणार. शेल्डन कॉप त्याच्या If You Meet the Buddha on the Road, Kill Him! मध्ये आपल्याला धक्का देतो. Philosophy, religion, patriotism, all are empty idols. The only meaning in our lives is what we each bring to them. सारं काही शब्दांचे बुडबुडे आहेत तर मग हे काय आहे: अहंनिर्विकल्पो निराकार रुपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्ती र न बंधः चिदानंद रुपः शिवोहं शिवोहं : मी शेल्डन कॉपचे वाक्य पुन्हा वाचतो. माझं मलाच कळलं असं वाटतं. हा ही माझ्या कुठल्यातरी पुर्वजाने त्याच्या अस्तित्वाला दिलेला अर्थ आहे. मग अस्तित्वाचं प्रयोजन काय? The continuation of species. हे कुणी सांगितलं? असं डार्विन म्हणतो. हे ही एक तत्वज्ञानच नाही का? माणसाने दिलेला अर्थ? नाही. म्हणजे नसावं. स्वार्थी जनुकं आपल्या पीढया निर्माण करण्यासाठी धडपडत असतात हे आता प्रयोगशाळांमधील चाचण्यांमधून सिद्ध झालंय. हा रिचर्ड डॉकिन्सच्या The Selfish Gene चा प्रभाव म्हणायचा का? नाही. ते डॉकिन्सचं तत्वज्ञान नाही. डॉकिन्सने ते फक्त समजावून सांगितलंय. जर तुला चुलत भाऊ आणि सख्खा भाऊ यांच्यातून एकाला फेवर करायची वेळ आली तर तू कुणाला फेवर करशील? ज्याची बाजू योग्य असेल त्याला. आता हे नितिमत्ता वगैरे बाजूला ठेवून उत्तर दे. सख्खा भाऊ. का? कारण तो माझ्या सख्खा भाऊ आहे. बरं. आणि जर ही निवड सख्खा भाऊ आणि मुलगा यांच्यात करायची असेल तर? मुलगा. का? कारण तो माझा मुलगा आहे. हे तू बोलत नाहीस. तुझे स्वार्थी जीन्स बोलत आहेत. त्यांना आपला वंश फेवर करायचा आहे. हे होतं कसं? स्वार्थी जीन्स आपली प्रजाती पुढे कशी सरकवतात? डोपॅमाईनच्या मदतीने. म्हणजे? हे माणसाच्या मेंदूतील एक रसायन आहे. आपल्या मेंदूत काही कोटी विशेष पेशी आहेत ज्यांना चेतापेशी म्हणतात. या चेतापेशींची साखळी किंवा जाळं ही माहिती मेंदूतील वेगवेगळ्या माहिती पॄथक्करण आणि त्यावर कृती करण्याचे आदेश देणार्‍या भागांकडे वाहून नेण्याचं काम करतं. दोन चेतापेशींच्या जोडणीशी एक अती सुक्ष्म फट असते ज्याला सिनॅप्स म्हणतात. एका चेतापेशीतील संदेश त्या चेतापेशीच्या प्रक्षेपक टोकाशी येताच ती चेतापेशी जोडणीपाशी असलेल्या फटीत काही रसायने स्त्रवते. चेतापेशीतील संदेश मग त्या संदेशवाहक रसायनावर स्वार होऊन दोन चेतापेशींमधील अती सुक्ष्म दरी पार करुन ग्राहक चेतापेशीत प्रवेश करतो. मेंदूतील या चेतापेशींच्या जाळ्यांना आणि माहिती पॄथक्करण आणि त्यावर कृती करण्याचे आदेश देणार्‍या भागांना त्यांच्या त्यांच्या कामानुसार नावं दिलेली आहेत. यातलं एक आहे रिवार्ड सर्किट. आणि यातला रासायनिक संदेशवाहक आहे डोपॅमाईन. माणसाचा (किंवा कुठल्याही प्राण्याचा) वंश टिकून राहण्यासाठी प्रजनन होणे आवश्यक आहे. आणि प्रजनन होण्यासाठी जिवंत राहणे. जिवंत राहण्यासाठी अन्न आणि पाणी अत्यावश्यक आहेत. पण जर माणसाने अन्न घेतलेच नाही आणि प्रजनन केलेच नाही तर? ते तसं होणार नाही याची काळजी घेण्याचे काम निसर्गाने रिवॉर्ड सर्किटवर सोपवलंय. रिवॉर्ड सर्किट डोपॅमाईन हे रसायन संदेशवाहक म्हणून वापरते. आणि हे डोपॅमाईन माणसाला अन्न पाणी घेण्यासाठी किंवा प्रजनन करण्यास उद्युक्त करण्यासाठी माणसामध्ये हवीहवीशी भावना निर्माण करते. एकदा का या डोपॅमाईनच्या आमिषाला बळी पडून माणसाने जेवायला सुरुवात केली किंवा प्रजनन क्रिया सुरु केली की डोपॅमाईनचे काम संपते. थोडक्यात, अस्तित्वासाठी अस्तित्व असा काहीसा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 04/24/2015 - 06:28 नवीन
मला पार्किन्सन सिंड्रोम आल्यासारखं अचानक वाटायला लागलंय. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 04/24/2015 - 06:31 नवीन
चॉकलेट खाव डोपॅमाईन मिलाव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आनन्दिता Fri, 04/24/2015 - 06:46 नवीन
स गा शेट गिर्जा काकांची अतर्क्यातली कवितासदॄष्य,लेखरुपी, भटकंती तुम्ही सोपी करुन सांगितल्याबद्दल आभार! पण प्लिज आता तुमच्या प्रतिसादाचा थोडक्यात अर्थ समजवा. =)) डोकं गरगरतंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
पैसा Fri, 04/24/2015 - 06:48 नवीन
पुण्यातला आमरस किंवा काकवी खाल्ली तर असं काहीतरी होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
ए
एस Fri, 04/24/2015 - 15:22 नवीन
रत्नागिरी हापूसचा आमरस केव्हाही वाईटच. असे होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 04/24/2015 - 15:31 नवीन
हापूस आंब्याला नाव ठेवायाचा काम नाय! तो पुण्यात खाल्ला तर बाधतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/24/2015 - 15:36 नवीन
@ तो पुण्यात खाल्ला तर बाधतो! >>> दुत्त दुत्त! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Fri, 04/24/2015 - 15:37 नवीन
पुण्याला नाव ठेवायचं काम नाय.. काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नगरीनिरंजन Fri, 04/24/2015 - 06:33 नवीन
:-) डोपॅमाईनची ओळख पटलेला आणखी एक माणूस पाहून बरं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सस्नेह Fri, 04/24/2015 - 07:02 नवीन
गिर्जाकाका यांच्या लेखाच्या सगा यांनी काढलेल्या सुलभ नवनीताचे कुणीतरी मराठीत भाषांतर करून ग्रहणास सुलभ असा रस काढून देईल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
विशाखा पाटील Fri, 04/24/2015 - 07:18 नवीन
मूळ कविता पूर्ण वाचण्याचे श्रम घेतले नाहीत, त्यामुळे कवितेचा आणि याचा काही संबंध आहे का हे ठाऊक नाही. पण एक स्वतंत्र लेखन म्हणून आवडलं. रिचर्ड डॉकिन्सच्या विचारांवर तुम्ही वेगळा लेख लिहावा, असे वाटते. इथे ती चर्चा नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रसाद गोडबोले Fri, 04/24/2015 - 16:28 नवीन
सकाळी इन्टर्नेट स्लो असल्याने प्रतिसाद जात नव्हते . आत्ता सकाळचा प्रतिसाद देतोय >>>
there is nothing to do , there is no where to go , you are already perfect and and you are already complete ! कुणी म्हटलं असेल बरं हे? कुणी का असेना, कुणीतरी मोठा तत्ववेत्ता किंवा विचारवंत असणार. चिंतनातून त्याची अशी मनोभुमिका झाली असणार आणि मग कधी तरी त्याच्या त्या मनोभुमिकेला शब्दरुप मिळाले असणार. लोक ते वाचत असणार. क्षण, दोन क्षण स्वतःला मुक्त समजत असणार आणि तिसर्‍या क्षणाला पन्नास लाखाच्या आसपास टू बिएचके कुठे मिळेल हे शोधायला इंटरनेटकडे धाव घेणार.
हे वाक्य ओशोंच्या एका प्रवचनातील आहे ! आणि मुक्त माणसांनी घर घेवु नये असे कोठे लिहिले आहे ? मुक्ती म्हणजे कर्मफलातुन मुक्ती ... जेथे कर्माचा लय झाला तेथे कर्ताही संपला च की ! त्यानंतर योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः । यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव || अशी काहीशी अवस्था असते . आपल्याला उगाचच पद्मासन घाउन निवांत बसलेल्या लोकांची चित्रे जीवनमुक्त म्हणुन पहायची सवय असल्याने कर्मयोगी माणुसही मुक्त असु शकतो हा विचारच झेपेनासा झालाय . आमचे रामभाऊ चक्क ब्यँकेत नोकरी करत होते , गणु व्यवस्थित संसार करत होता , लोकमान्य वृत्तपत्र चालवत होते , हे सारे जीवनमुक्त होतेच की ! युध्द भुमीवर नष्टो मोहो स्मृतीलब्ध्वा असे म्हणुन युध्दाला उभाराहिलेला अर्जुन मुक्तच होता की ! अखंड स्थीतीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !! हेही मुक्तच होते की ! तात्पर्य काय की मुक्तीचा कर्माशी संबंध नाही , अत्यंत कर्मासक्त माणुसही मुक्त असु शकतो आणि अत्यंत निवान्त पडुन रहाणारा भिक्षुकही बध्द असु शकतो . ( अर्थात हे विधान कळायला फार चिंतन करावे लागते ) प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वशः | अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते || २७ || हे ज्याच्या लक्षात आले तो मुक्तच ! चला आता ९९ एकर्स वर जाऊन फ्लॅट शोधुयात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्राची अश्विनी Fri, 04/24/2015 - 07:14 नवीन
गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे वाटते.:)
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 04/24/2015 - 12:47 नवीन
दोस्तहो या विषयावर बोलू काही. "काय लिहिलय यापेक्षा कुणी लिहिलयं यालाच जास्त महत्व दिलं की असं होणारच" ज्याच्याशी काही विषयांवर तीव्र मतभेद असूनही तोच जर काही योग्य आणि समतोल विचार मांडत असेल तर पाठिंबा+सहमती द्यायला अजिबात न कचरणारा. चांगल्याला चांगले म्हणण्याची अति वैट्ट खोड असलेला. जुनाट ना़खु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 04/24/2015 - 07:30 नवीन
पो.प.संप्रदायाच्या प्रेषीतांना आणि स.गा. यांना असे कधीपासून होते?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 04/24/2015 - 09:05 नवीन
पोपशास्त्र्यांची मार्कोव्ह चेन आवडली. आमच्याही मनात असे कैकदा होत असते, किंबहुना बहुसंख्य जन्तेच्या मनात अशी विचारमाळका चालतच असते. आय आय डी नसलेली व्हेरिएबल्स एका सेरीज़मध्ये मांडली की असेच होणार. काय गिर्जाकाका, बरोबर म्हणतोय ना?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 04/24/2015 - 16:38 नवीन
मार्कोव्ह चेन
करेक्ट ! मार्कोव्ह चेन पेक्षा स्टोकॅस्टीक प्रोसेस ! ती ही नॉन स्टेशनरी आणि नॉन टाईम होमोजीनीयस ! आणि विचारांची स्पेस कन्टिन्युअस मानली तर मग तर कन्टीन्युअस टाईम कन्टिन्युअस स्पेस ! http://en.wikipedia.org/wiki/Continuous-time_stochastic_process अवघड आहे रे खरंच ! अभ्यास कमी पडतोय ! अजुन वाचलं पाहिजेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 04/24/2015 - 17:53 नवीन
मार्कोव्ह चेन ही एक स्टोकॅस्टिक प्रोसेसच आहे बादवे. :) बट येस, कंटिन्युअस स्पेस आणि कंटिन्युअस टाईम इंडीड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 04/24/2015 - 17:57 नवीन
हा तेच ते ! मार्कोव्ह चेन डीस्क्रीट मधे असते ना ... टाईम तर कन्टीन्युअस आहे आणि विचारही कन्टीन्युअस आहेस ... आपण लिहित असतो तेव्हाही काळ आणि विचार चालुच असतात म्हणुन जरी लिहिलेले शब्द डीस्क्रीट आणि लिहिलेली वेळ डीस्क्रीट वाटत असली तरी मुळात ती तु म्हणाल्याप्रमाणे कन्टीन्युअसच आहे , आपण जे करत आहोत त्याला डीस्क्रीटायझेशन एर्रर म्हणतात म्हणुन मी आपलं म्हणलं की मार्कोव्ह चेन पेक्षा स्टॉकस्टिक प्रोसेस म्हणु तसे मुद्दा दोघांनाही कळाल्या असल्यामुळे शब्दांचा कीस काढण्यात अर्थ नाही ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 04/24/2015 - 17:59 नवीन
इंडीड. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
स्पंदना Fri, 04/24/2015 - 09:29 नवीन
काय होतय गिरिजा काका?
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 04/24/2015 - 10:20 नवीन
गिर्जा म्हणाली प्रगोला प्रतिसाद तुझा किती हीन प्रगो म्हणाला गिर्जाला व्हाय आर यु सो मिन? गिर्जा म्हणली तुझ्या डोक्यातली रद्दी विक प्रगो म्हणे अनाहिताज मेक मी सिक गिर्जा म्हणे काढुन टाक ती विचारांची माळ प्रगो म्हणे अनाहितात जायचे टाळ ^_~ वर लिहिलेले वाचुन आलेली गुंगी अजून न गेल्याने एवढीच यमके सापडली.बाकीची गुर्जींनी उधार दिल्यास वापरल्या जातील!!
  • Log in or register to post comments
म
मितान Fri, 04/24/2015 - 10:33 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पिलीयन रायडर Fri, 04/24/2015 - 10:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मधुरा देशपांडे Fri, 04/24/2015 - 10:56 नवीन
:)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्मिता श्रीपाद Fri, 04/24/2015 - 11:03 नवीन
अजया ताई सहीच :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रीत-मोहर Fri, 04/24/2015 - 11:10 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कविता१९७८ Fri, 04/24/2015 - 11:22 नवीन
अजया सहीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Fri, 04/24/2015 - 11:24 नवीन
अग्गागा...येक नंबर प्रतिसाद \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सतिश गावडे Fri, 04/24/2015 - 11:30 नवीन
मठाची ही अजून एक वेगळी शाखा म्हणायची का? आधीचा "तांब्या संप्रदाय" आणि आता हा "यमक संप्रदाय" :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Fri, 04/24/2015 - 11:58 नवीन
मठाची ही अजून एक वेगळी शाखा म्हणायची का? आधीचा "तांब्या संप्रदाय" आणि आता हा "यमक संप्रदाय" :प
साहेब तुम्ही आधी काय लिहिले आहे ते समजवा की आम्हा पामरांना...का तुम्हीसुध्धा एक नवीन कूट-संप्रदाय सुरु करत आहात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 04/24/2015 - 12:21 नवीन
अरे अरे टका बालका, कळले नाही का रे तुला? औषधाविना बरे व्हायचे असेल तर व्यनि कर मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 04/24/2015 - 12:23 नवीन
आपणा सर्वांचा लाडका, पोपटहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 04/24/2015 - 12:26 नवीन
जवा नविन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला (औषधाविना) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 04/24/2015 - 12:29 नवीन
औषधाच्या नावाखाली ज्योतिष सांगू लागला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 04/24/2015 - 12:30 नवीन
पो.प.टहित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्राची अश्विनी Fri, 04/24/2015 - 10:37 नवीन
अजया सही!!
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 04/24/2015 - 11:45 नवीन
लवकर बरे व्हा प्रगो !!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Fri, 04/24/2015 - 11:50 नवीन
अजया मलाहि गुंगी आलीये.वरची कविता/लेख जे काहि असेल ते एक अक्षर उमगल नाहिये. तुझी कविता मात्र सहिच.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 04/24/2015 - 11:56 नवीन
उत्सवमुर्ती प्रगो कुठे आहात तुम्ही? शंभरीबद्दल अभिनंदन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/24/2015 - 16:49 नवीन
(.)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा