Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका शेतकर्याची आत्महत्या

आ
आकाश कंदील
Fri, 04/24/2015 - 07:31
🗣 58 प्रतिसाद
केजरीवाल नावाचा हिमनग पाण्यात किती आणि दिसतो किती जे झाले ते खूपच दुखदायी होते पण खालील मुद्दये सौंशय उत्पन करतात १. १० एकर शेत, २ फळबागाचा मालक. २. फेटा बांधायाचा व्यावसाय करत होता. ३. आत्महत्येच्या दिवशी त्याच्याकडे १.५० लाख होते(शंका वाटते) ४. समाजवादी पार्टीतून २ वेळा निवडणूक लढला. ५. कॉंग्रेस मध्ये गेला होता. ६. आता आप मध्ये होता. ७ झी न्यूज (२३/०४/१५) दाखवलायानुसार, त्याचा भाऊ सांगतो आत्महत्येच्या चिट्ठीतले अक्षर त्याचे नाही, पुरावा म्हणून त्याचे हस्ताक्षार दाखवले. ७. श्री मनीष सिसोदियानि बोलावले म्हणून दिल्लीला गेला असे घरचे सांगतात.

प्रतिक्रिया द्या
12521 वाचन

💬 प्रतिसाद (58)
न
नाखु गुरुवार, 04/30/2015 - 09:30 नवीन
गणेशा सलाम स्वीकारा _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 09:36 नवीन
प्रांजळपणाचे काही नाही क्लिंटन साहेब, मते वेगवेगळी असु शकतात बर्याचदा.. मग ते आप बद्दल असतील भाजप बद्दल असतील किंवा इतर अनेक घटनांबद्दल असतील .. परंतु आपण सारे मिपापरिवारात आहोत हे जाणुन पुढच्याच्या विरोधाला विरोध न करता आपल्याला काय वाटते ते वयक्तिक लेवल ला न जाता लिहिले पाहिजे असे माझे नेहमी म्हणने असते. भले कित्येकदा चुकीचीही असतील मते परंतु सयंत प्रतिक्रीया असाव्यात असे नेहमी वाटते. आणि पुढच्याने ही त्या वयक्तीक घेवु नये असे वाटते उद्या, नेटवरती विरुद्ध टोकाने बोलणारे एकत्र आले तरी त्यांचे व्यक्तिमत्व वेगळेच असते असे जानवु शकते.. असो... आणि मतदारांच्या वाक्याबद्दल .. मी स्वता एकदा राष्ट्रवादी.. एकदा जनता दल.. एकदा भाजप आण एकदा शिवसेने ला मत दिले आहे, त्यामुळे जरी कोणत्याही पक्षाच्या बाजुने बोललो तरी वयक्तिक रित्या विधानसभेला उमेदवार पाहुन आनि लोकसभेला पक्ष पाहुनच मी मदतान करतो, त्यामुळे भक्त, समर्थक असे आवडत नाही मला तरी. अतिरेक नसावा बस्स.. आप ने वेळीच सुधारले नाही सगळे तर मात्र ही पार्टी जशी वर आली त्याच स्पीड मध्ये खाली जाईन असे वाटते. बाकी अवांतर : मला वाटते राजकारणावर मी आता लिहिणे बंद करावे.. तेव्हडा अभ्यास नाहीही आणि माझे आवडते भटकंती आणि काव्य विभाग मस्त आहे या पेक्षा असे उगाच वाटुन गेले राजकारण सोडले तर मला वाटते गांधी..एक विचार या धाग्यावर आपण बोललो होतो बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मृत्युन्जय Mon, 05/04/2015 - 06:39 नवीन
अनाठायी समर्थनाच्या पल्याड जाउन (जी आजकाल फ्याशन झाली आहे) प्रांजळ मते मांडण्याच्या तुझ्या धाडसाचे कौतुक आहे गणेशा. आजकाल तशी दुर्मिळ गोष्ट आहे ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
क
कपिलमुनी गुरुवार, 04/30/2015 - 09:34 नवीन
हाच प्रांजळपणा मोदी समर्थक कधीच दाखवत नाहीत . अगदी परदेशात जाउन आपलया देशाला नावे ठेवली तरीदेखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मृत्युन्जय Mon, 05/04/2015 - 06:37 नवीन
अभ्यास वाढवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/30/2015 - 10:59 नवीन
उत्तम विचार. ब्राव्हो * !! फक्त खालच्या विधानात... तसेही मतदारांनी जे चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये.. एक थोडासा फरक सुचवतो. तो असा... तसेही मतदारांनी जे देशाच्या दृष्टीने चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये.. कारण वैयक्तीक फायदा तात्पुरता असतो आणि त्यात देशाचा फायदा असेलच असे नाही. पण, देशाचा फायदा झाला तर तो प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे देशाच्या सद्य नागरिकांपर्यंतच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतो. आजचे तथाकथित विकसित देश ज्या स्थितीवर पोहोचलेले आहेत, ते केवळ सद्याच्या पिढीच्या कर्तृत्वामुळे नाही तर त्यामागे देशाच्या भल्याचा विचार करणार्‍या अनेक पिढ्यांचा हातभार लागलेला आहे. ====== * प्रत्येक माणसाची कळत नकळत कधीना कधी चूक होतेच... तो माणूसधर्मच आहे ! मात्र ती चूक प्रामाणिकपणे पत्करून, त्या अनुभवांतून शिकून पुढे तशी चूक परत होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा माणूस प्रामाणिक आणि प्रगतीशील असतो. त्याउलट, चूक डोळ्यासमोर धडधडीत दिसत असताना ती चूक नाहीच असे म्हणत, चुप्पी साधणारे किंवा तिचे प्रत्यक्ष समर्थन करणारे, अप्रामाणिक आणि/अथवा कांगावाखोर असतात. असे लोक इतर लोकांची दिशाभूल करता करता स्वतःच्याच खोट्या मायाजालात गुरफटून स्वतःचे नुकसान करतात, हे त्यांच्या मूर्खपणाचे फळ असते. पण त्याबरोबर त्यांच्यावर अंधविश्वास ठेवणार्‍या त्याच्या पाठीराख्यांचेही त्यापेक्षा जास्त नुकसान करतात, हे अक्षम्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ह
हाडक्या गुरुवार, 04/30/2015 - 16:13 नवीन
त्याउलट, चूक डोळ्यासमोर धडधडीत दिसत असताना ती चूक नाहीच असे म्हणत, चुप्पी साधणारे किंवा तिचे प्रत्यक्ष समर्थन करणारे, अप्रामाणिक आणि/अथवा कांगावाखोर असतात. असे लोक इतर लोकांची दिशाभूल करता करता स्वतःच्याच खोट्या मायाजालात गुरफटून स्वतःचे नुकसान करतात, हे त्यांच्या मूर्खपणाचे फळ असते. पण त्याबरोबर त्यांच्यावर अंधविश्वास ठेवणार्‍या त्याच्या पाठीराख्यांचेही त्यापेक्षा जास्त नुकसान करतात, हे अक्षम्य आहे.
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ज
जयनीत Mon, 05/04/2015 - 05:46 नवीन
सभा आपची होती, अन ज्याच्या सोबत ही दुर्घटना घडली तो त्या क्षणी तरी आप सोबत होता हे नाकारु शकत नाही. ह्या घटनेच्या संदर्भात तरी आप विरुद्धचा रोष चुकीचा वाटत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा