Welcome to misalpav.com
लेखक: फुंटी | प्रसिद्ध:
आज सकाळी बाईक पार्क करत होतो.अविदादा अचानक गेला त्याची बाईक अजूनही पार्क केलेली आहे.पार्किंग वाला म्हणाला,' देखो आजकल गाडी पार्क करके जानेवाला शाम को वापस आयेगा उसका भरोसा नही रहा ...पार्किंग के लिये रोज वही जगह नही मिली तो लोग खामखा झगडा करके जाते है ' अस काही घडलं की अंतर्मुख होऊन विचार करण्याशिवाय पर्याय रहात नाही.मानवी जगण्याच्या मर्यादा स्पष्ट होतात.आपण कितीही म्हटलं तरी आपल्या आवाक्यात आपल जगण नसतंच..आपल्या विचारांच्या पलीकडे असलेली ही शक्ती आपल्या जगण्यावर अंमल करत असते.तोच देव असेल का?? अज्ञात अशा या शक्तीचा वावर आपल्या सभोवती असेल का ? आहेच.....आपण ,आपला इगो किती शुल्लक,निरर्थक वाटू लागतो या सगळ्यात....आपण या पृथ्वीवर 'लिव्ह लायसन्स' वर रहायला आलोय .कुणी ५० वर्ष कुणी ६०,७०,८०....पण नेमक आपली वर्ष किती ते कुणालाच माहित नाही.हीच जगण्यातली मज्जा ....जे बर वाईट आपल्या वाट्याला मिळेल त्यात समाधान मानत जगावं हेच आपल्या हातात उरत ..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया