लग्न पत्रिकेतील मुलासाठी 'चिरंजीव' व मुलींसाठी 'चि.सौ.कां.' असा भेदभाव का?
लग्न पत्रिकेतील मुलासाठी 'चिरंजीव' व मुलींसाठी 'चि.सौ.कां.' असा भेदभाव का?
सध्या लग्नांचा सिझन चालू आहे..पत्रिका छापताना मुलासाठी केवळ 'चिरंजीव' आणि मुलीसाठी चिरंजीव 'सौभाग्यकांक्षिणी' असा भेद का? चिरंजिवित्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे एक वेळ मान्य केलं तर मुलीसाठी "सौभाग्यकांक्षिणी" असा वेगऴा उल्लेख का? मला कोणतीही पत्रिका वाचताना असा प्रश्न पडतो की सौभाग्याची आकांक्षा करताना ती मुलगी लग्नाआधी दुर्भागिनी असते आणि लग्नानंतर नशीबवान होते, असा काही आपल्या परंपरेला व्यक्त करायचेय का? तुम्हालाही असा प्रश्न कधीतरी पडला असेल. तसं असेल तर आईवडील आपल्या मुलीला दु:खातच ठेवतात आणि सासरचे सुखातच ठेवतात, असे म्हणण्याचे धाडस आपण करू शकू?
हे असं का, याचा थोडक्यात उहापोह करणारा हा लेख.
'सौभाग्यकांक्षिणी' या शब्दाचा भाग्य, सुख वैगेरे गोष्टींशी जया आपल्या पटकन लक्षात येतो तसा संबंध नाही..येथील सौभाग्य या शब्दाची फोड 'सु-भग' अशी आहे..'भग' या शब्दाचा अर्थ "स्त्री-जननेंद्रीय" असा आहे..भगिनी शब्दाचा जन्म यामुळेच झालाय..
सौभाग्यकांक्षिणी म्हणजे, पतिसौख्य भरपूर व शेवटपर्यंत मिळो अशी इच्छा असणारी स्त्री..त्यातून संतती निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू..ही तर प्रत्येक लग्नोत्सूक मुलीची इच्छा असणे अगदी नैसर्गिक आहे..व म्हणून ती 'सौभाग्यकांक्षिणी.' त्यात ती अर्थार्जनासाठी पतीवर अवलंबून व म्हणूनही ती 'सौभाग्यकांक्षिणी'..ज्योतिष शास्त्रातील गुणमेलन वा पत्रिकेतील मंगळ या दोन गोष्टी संपूर्णपणे शरिरसंबंधांचाच-त्यातही स्त्रीच्या- विचार करतात..!!
आपल्या समाजात वेश्या ही कायमची सौभाग्यवती मानली जायची ते यामुळेच..तीला नगराची पत्नी या अर्थाने 'नगरवधू' म्हणतात..वेश्येला वैधव्य नाही..
आपल्या समाजाची रचना पाहाता पुरूषाला अशी इच्छा धरण्याची काहीच गरज नसते..तो सामाजीक व नैसर्गीक दृष्ट्या मोकळाच असतो..नवरा असणं आणि तो टिकवणं ही आपल्या समाजात स्त्रीचीच जास्त गरज होती व काही प्रमाणात आजही आहे..म्हणून तर तो व्यसनी, आजारी कसाही असला तरी स्त्री त्याची सेवा करताना दिसते त्यामागील मोठे कारण हेच असतं..आता परिस्थिती बदलतेय व या बदलामागील सर्वात महत्वाच कारण, स्त्रीचं स्वत:च्या पायावर उभं राहाणं हेच आहे..स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली आणि तिच्यावरची बंधनं हळुहळू कमी होऊ लागली..नव-याचा धाक व गरज कमी होऊ लागली हे तीच्या शिक्षणाने व नोकरीने तिच्यात निर्माण केलेलं धैर्य..विवाहबाह्य संबंध वाढू लागले हे याचं एक बायप्राॅडक्ट..
विवाह, लग्न वैगेरे शब्द अगदी अलिकडे प्रचारात आले..पुर्वी लग्नासाठी 'शरिरसंबंध' असा रोखठोख शब्द पत्रिकेवर वापरला जायचा हे तुमच्याही वाचनात आलं असेल कुठेतरी..
..आता बदललेल्या परिस्थितीनुसार पत्रिकेवर मुलगा-मुलगी या दोघांनाही 'चिरंजीव' म्हणायला हरकत नाही. 'सौभाग्यकाक्षिणी' हा शब्द आपल्या त्यावेळच्या सामाजीक परिस्थितीचा निदर्शक आहे, त्याला तसा काहीच अर्थ आता राहीलेला नाही..पण गतकाळाची आठवण म्हणून तसा राहायलाही हरकत नाही..
खुप आहे लिहिण्यासारखं पण आता थांबतो..
-गणेश
.नवरा असणं आणि तो टिकवणं ही आपल्या समाजात स्त्रीचीच जास्त गरज होती व काही प्रमाणात आजही आहे..म्हणून तर तो व्यसनी, आजारी कसाही असला तरी स्त्री त्याची सेवा करताना दिसते त्यामागील मोठे कारण हेच असतं..बरोबर आहे, आजही बर्याच स्त्रिया छळ , मारहाण सहन करत राह्तात, खेड्यापाड्यात तर नवर्याने बाहेर रंग उधळले तरीही गप्प बसतात आणि बाकीच्या बायका नवर्याने इतका त्रास दिला तरी ती नवर्याला सोडुन गेली नाही अशी तिची वाहवाई करतात.