समुद्र
तासंतास समुद्र प्यायलो मी,
दिवसभराचा सारा मुद्राभिनय,
तपशिलासकट, थोडा-थोडा करून...
बराच समुद्र प्यायलो मी.
समुद्र....
स्वत:हुन जवळीक साधत,
पायांशी घोळणारा...
अथवा, सगळी गरळ मागे टाकुन,
कोरडा निघून जाणारा.
सारे ढग हाकून थकल्यावर,
सूर्य गिळायला मोकळा झालेला..
लाल समुद्र.
एक दिवसाचा समुद्र फाडून ओतला
डोळ्यांमध्ये, मावळत्या तप्त सुर्यासकट.
खारट समुद्र,
वाहत राहिला बंद डोळ्यांमधून,
बराच वेळ...
सूर्य मात्र,
विनासायास ह्रदयापर्यंत गेला.
आधीच उकळत्या राक्तात,
न वितळलेल्या ब-याच आठवणी थेट,
सूर्यात वितळल्या...
रात्र,
समुद्रआणि मी, दोघेही,
एकेक सूर्य गिळुन,
बरच, काही वितळवून,
रात्रीच्या काळ्या घुमटाखाली,
तारे मोजत पडलोय,
बाकी सारं शांत-शांत...अर्थातच,
सूर्योदयापूर्वी.
💬 प्रतिसाद
(8)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/25/2015 - 03:35
नवीन
आवडली कविता. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 04/25/2015 - 15:02
नवीन
आशयसंपन्न... !
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 04/29/2015 - 13:59
नवीन
अप्रतिम रचना .. खरेच खुप जब्रदस्त कल्पनाशक्ती ..
अवांतर :
काव्य वाचनात प्रतिसाद/वाचणे जास्त होण्याची गरज आहे असे वाटत आहे.. निदान अशा सुंदर सुंदर कवितांना तरी
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/29/2015 - 14:19
नवीन
मला तर पहिली २ कडवी वाचून अगस्ती ऋषींचे रूपक वापरले आहे का असे वाटून गेले होते पण नंतर गैरसमज दूर झाला.
कविता आवडलीच.
- Log in or register to post comments
V
Vimodak
Wed, 04/29/2015 - 21:32
नवीन
प्रातिक्रियेबद्दल सर्व मित्रांचे आभार : )
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/29/2015 - 21:56
नवीन
मी करून झोपतो हिमालयाची उशी...
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 04/30/2015 - 04:03
नवीन
आवडली कविता!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 04/30/2015 - 07:14
नवीन
जबरदस्त अथांग कविता.... क्या बात है राव ! क्या बात है
- Log in or register to post comments