Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भोगानंदिश्वरा

प
पॉइंट ब्लँक
Sat, 04/25/2015 - 09:10
💬 31
नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे. नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला. मंदिराच्या कलाकृतींमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. मंदिराचा आवार प्रशस्त असून तिथे अरुणाचलेश्वर, उमामहेश्वर आणि भोगानंदिश्वर असे तीन मंदिरांचे संकुल आहे. अरुणाचलेश्वर ही महादेबाची बाल अवस्था, भोगानंदिश्वरा ही तारुण्य अवस्था आणि योगानंदिश्वरा ही वैराग्यावस्था मानन्यात येते. भोगानंदिश्वरा हे शिवाच्या तारुण्य अवस्थेला समर्पित केले आहे. मंदिराचा आवार प्रचंड मोठा आहे. त्याचे काही फोटो DSC_0014 DSC_0040 DSC_0574 मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. DSC_0053 प्रवेशद्वारावर कोरलेल्या काही अप्सरा. DSC_1259 DSC_0060 DSC_0054 आता मुख्य मंदिराचे काही फोटो. DSC_0233 DSC_0239 DSC_0222 DSC_0221 DSC_1373 आता मंदिरातील मूर्त्या आणि इतर कलाकुसर. bn2 DSC_2572 DSC_2566 DSC_2564 DSC_1320 DSC_1306 DSC_1286 DSC_0632 DSC_0045 DSC_0042 bn30 bn29 bn11 bn10 bn8 bn7 ह्या मंदिराच्या आवारात शृंगेरी तिर्थ नावाची एक मोठी पुष्कर्णी आहे आणि तिथे पिनाकिणी नदिचा उगम होतो असे मानन्यात येते. पुष्कर्णीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला मंड्प. DSC_0625 पुष्कर्णीचे फोटो DSC_0602 DSC_0182 bn12 पुष्कर्णीच्या भोवतलचा परीसर आणि तिथले मूर्तीकाम. bn13 bn15 bn5 bn4 आता नंदिहिल्स वरून सूर्यास्ताच्या वेळी काढलेले काही फोटो. DSC_2475 DSC_0423 चोला, होयसाला आणि विजयनगर ह्यांच्या कलाकृती एकाच ठिकाणी असणारे हे दुर्मिळ मंदिर आहे. प्रत्येक इतिहासप्रेमी मानसाने भेट जरूर द्यावी. मंदिराला भेट देण्यासाठी दोन प्रकारे प्लॅन करता येत. नंदि हिल्स वर सूर्योदय पाहा. मग खाली येवून मंदिराला भेट द्या. किंवा दुपारी दोन-तीनच्या सुमारास आधी मंदिराला भेट द्या मग नंदिहिल्सवर सुर्यास्त पाहायला जा. मंदिराविषयी अधिक माहीत तुम्हाला इथे मिळेल. http://www.karnataka.com/nandi-hills/nandi-village-bhoga-nandeeshwara-temple/

प्रतिक्रिया द्या
8447 वाचन

💬 प्रतिसाद (31)
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/25/2015 - 09:18 नवीन
सुंदर लेख आणि फोटो ! अजूण एक प्राचीन भारतिय सौंदर्यस्थळ !! त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 04/25/2015 - 09:40 नवीन
छान जागा आणि फोटो. चांगली चाललिये भटकंती.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 04/25/2015 - 09:47 नवीन
मस्त !!! फोटो अप्रतिम आहेत. या जागेबद्दल बंगळूरूवासी मित्रांकडून खुप ऐकले होते.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 04/25/2015 - 10:43 नवीन
मस्त माहीती, फोटो सुरेख.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 04/25/2015 - 11:41 नवीन
या देवळाबद्दल ऐकून होतो, मात्र बेंगरुळास असतानाही कधी जाणे झाले नाही. विस्तृत माहितीकरिता अनेक धन्यवाद! मूळ शिल्पकलेप्रमाणेच फोटोही छान आलेत. अप्सरा व पुष्करणी यांचे फटू जास्त आवडले. पुष्करणीच्या या डिझाईनबद्दल अल बेरूनीच्या पुस्तकातही प्रशंसोद्गार काढण्यात आलेत- खूप लोक असले तरी अशा डिझाईनमुळे गर्दी होत नाही वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 10:34 नवीन
अल बेरूनीचे पुस्तक वाचले नाही, पण खाली चित्रगुप्त ह्यांनी सुचवल्याप्रमाणे एखादा लेख त्या संदर्भात टाकालत तर छान होईल. बाकी माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Sat, 04/25/2015 - 12:28 नवीन
नविन माहिती आणि छान फोटो.बंगलोरला जाऊनही न पाहिलेले स्थळ गवसले.धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/25/2015 - 18:19 नवीन
वा सुंदर. अवांतरः 'भोगानंदिश्वरा' हे स्त्रीलिंगी नाव झाले. शंकराबद्दल असेल, तर 'भोगनंदीश्वर' असावे. तसेच 'चोला', 'होयसाला' वगैरे आंग्लाळलेले उच्चार जरा खटकतात. @बॅटमन : पतंजली योगसूत्रांचे प्रथम अन्य भाषेत भाषांतर म्हणजे अल बेरूणीने केलेले अरबी भाषांतर होय, असे अलिकडेच वाचनात आले. हे वाचून अल बेरूणीबद्दल अतीव आदर मनात दाटून आला. अल बेरूणी बद्दल एखादा लेख टाकता आला तर बघा.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 10:36 नवीन
इथे बेंगलोरमध्ये त्याला भोगानंदिश्वरा असंच म्हणातात. बर्याच नावांच्या शेवटी "आ" जोडायची पद्धत आहे इथ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
प
पैसा Sun, 04/26/2015 - 05:42 नवीन
अप्रतिम फोटो. हे देऊळ बहुतेक पाहिले होते असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 04/26/2015 - 08:03 नवीन
वा वा, सगळे अँगल्स सुपर आवडलेत, मस्त, पोस्ट प्रोसेसिंग पण बरच कंट्रोल मध्ये आहे आधिपेक्षा, खरतर इतक्या सुंदर फोटोंना प्रोसेसिंगची गरज नाही, उदा. तो झाडाचा फटु,इतका भडक करण्याची गरजच नव्ती :)
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 10:38 नवीन
वेळोवेळी प्रामाणिक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सुहास झेले Sun, 04/26/2015 - 08:16 नवीन
मस्तच.... स्पा शी सहमत :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/26/2015 - 08:45 नवीन
फोटो आवडले. साला दक्षिण भारताची सहल कधी होणार आहे कुणास ठाउक.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 10:39 नवीन
साला दक्षिण भारताची सहल कधी होणार आहे कुणास ठाउक.
हे असच माझं उत्तर भारतच्या बाबतीत झालं आहे. :( बघु जमेल कधी तरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ए
एस Sun, 04/26/2015 - 11:11 नवीन
अगदी सुंदर धागा व छायाचित्रे. नंदीहिल्स पाहिले, पण तिथल्या गर्दीमुळे अजिबात आवडले नव्हते. तेव्हा या जागेची माहिती असती तर नक्कीच गेलो असतो.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 10:41 नवीन
नंदीहिल्स पाहिले, पण तिथल्या गर्दीमुळे अजिबात आवडले नव्हते.
हा त्रास बेंगलोरमधल्या जवळपास सर्व ठिकानी चालू झाला आहे. पूर्वी ज्या ज्या जागा शांत म्हणून प्रिय होत्या ता सर्व ठिकाणी आजकाल भरमसाठ गर्दी असते :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
किसन शिंदे Sun, 04/26/2015 - 18:42 नवीन
मस्त आहेत सगळे फोटो.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 04/26/2015 - 18:52 नवीन
सुंदर जागा. छान परिचय करून दिलात. प्रतिसादांमधुन पण छान माहिती कळते आहे. तुमची भटकंती मस्त चालू आहे.
  • Log in or register to post comments
V
Vimodak Mon, 04/27/2015 - 04:14 नवीन
खुप सुंदर फोटो आणि माहिती..आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ग
गणेशा Mon, 04/27/2015 - 13:02 नवीन
अप्रतिम लेख पुन्हा एकदा ... एकदम आवडली माहीती आणि फोटो. अवांतर : आजच epic चॅनल वर कित्तुर ची माहीती सांगत होते तेंव्हा तुमच्या एल्खांची आठवण झाली होती
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 04/28/2015 - 02:11 नवीन
फोटो तर फारच छान!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 04/28/2015 - 02:33 नवीन
अच्छा? तो सुर्यास्ताचा फोटो प्रोसेस्ड आहे म्हणुन असा दिसतोय तर! मी विचारात पडले! असो. किती सुरेख मुर्ती आहेत. अन पुष्करणी सुद्धा मस्तच!! अतिशय आवडल हे ठिकाण.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 04/28/2015 - 08:59 नवीन
छान माहितीपूर्ण लेख. फोटो ही खूप सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Tue, 04/28/2015 - 12:11 नवीन
तसा देवाचा आणि आमचा संबंध कमीच. पण शिवा विषयी काही पाहिले कि कुतूहल आपसूकच जागे होते. डोळ्यांची पारणे फेडल्याबद्दल, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/28/2015 - 12:43 नवीन
सर्वच फोटू सुंदर हायेत... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sat, 05/02/2015 - 20:11 नवीन
कालच जाउन आलो, पण तिथे एक लग्नाचा कार्यक्रम सुरु असल्यामुळे बर्यापैकी गर्दी होती… तरीही सनईचे सूर कानावर पडत असल्यामुळे अजूनच छान वाटलं! :)
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Tue, 05/05/2015 - 13:31 नवीन
लई भारी. तुम्ही जावून आलात हे वाचून फार आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
त
तिमा Sun, 05/03/2015 - 14:55 नवीन
सुंदर आणि वेधक फोटो. मंदिराचा परिचयही आवडला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/03/2015 - 17:54 नवीन
फार सुरेख फोटो व माहिती.. भटकंती मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments
उ
उमा @ मिपा Sat, 05/09/2015 - 14:45 नवीन
मंगळवारी जाऊन आले या देवळात. खूप सुंदर! तुमच्या या धाग्यामुळे माहितीपण मिळाली. फोटो छान आलेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा