Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राख

V — Vimodak, Sat, 04/25/2015 - 17:57
तुझ पावलांची आस, दारास नित्य आणि, आरास अश्रुनयनी, वदते जुनी कहानी. तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी, अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ? दिमतिस काळ माझ्या, स्मरणे तुला अखंड, जाळून दिनरात, उरणे तुझे अनंत श्वासात घोळलेला, शरिरात रुजवलेला... सुगंध तुझ फिरस्ता, हृदयात सजवलेला. तुझ्यात मी जरी ना, माझ्यात तू अजुनी... राखेत मी जिवंत, गेले जरी विझूनी..

प्रतिक्रिया द्या
1214 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पॉइंट ब्लँक Sat, 04/25/2015 - 18:50 नवीन
वाह, क्या बात है.
  • Log in or register to post comments
V
Vimodak Sun, 04/26/2015 - 12:47 नवीन
धन्यवाद.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
क
कानडाऊ योगेशु Sun, 04/26/2015 - 14:13 नवीन
संपूर्ण कविताच सुरेख. पण खालील द्विपंक्ती जास्त आवडल्या.
तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी, अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ?
कवितेतील प्रत्येक कडवे गझलेतील शेराच्या जातकुळीतील वाटत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/29/2015 - 13:45 नवीन
तुझ पावलांची आस, दारास नित्य आणि, आरास अश्रुनयनी, वदते जुनी कहानी. अतिशय सुंदर कविता .. अप्रतिम निव्वळ अप्रतिम .. सवडीने इतर कविता वाचेन
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 04/29/2015 - 13:50 नवीन
सुंदर कविता ! फक्त, तुझ पावलांची आस' ऐवजी 'तुझ्या पावलांची आस' 'तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी,' ऐवजी 'तुज विसरु कशी मी, तुज आठवू किती मी, आणि 'सुगंध तुझ फिरस्ता' ऐवजी 'सुगंध तुज / तुझा फिरस्ता' जास्त योग्य होईल.
  • Log in or register to post comments
V
Vimodak Wed, 04/29/2015 - 21:40 नवीन
लिखाणात योग्य सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद : ) भविष्यात लक्ष्यात ठेविन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा