तू ये...
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन
तू ये, तुला फुकट देईन...
वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती
तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती
तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन
तू ये, तुला फुकट देईन...
अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी
परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी
तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन
तू ये, तुला फुकट देईन...
अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी
नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी
तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन
तू ये, तुला फुकट देईन...
तू ये, तुला फुकट देईन...हे सारखं सारखं लिहून कवी "निवडणूका जवळ आल्या आहेत आणि मी उभा राहणार आहे" असा छुपा संकेत देत आहे. २. "मठधिपतींच्या कवीशिष्यांत अता अजून एक अॅडीशन झाली आहे" असा महत्वाचा गुप्त संदेशही कवीने मोठ्या खुबीने कवितेत पेरला आहे. ;) :)