Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डि. एस. एल. आर कॅमेरा कसा निवडावा ?

र
राजेंद्र मेहेंदळे
Sun, 04/26/2015 - 08:25
🗣 63 प्रतिसाद
मंडळी मागे मिपावर ह्यावर एक धागा आला होता. पण तो मिळत नाहिये. शिवाय त्यात बरेच उलट सुलट सल्ले होते, त्यामुळे माझा गोंधळ अजुनच वाढला.म्हणुन परत हा धागा प्रकार- हौशी छायाचित्रकार/ बिगिनर फोटो-इन्डोअर्/आउटडोअर बजेट-३०-४० हजार एक उदाहरण म्हणजे, समजा मी आय.टी. वाला असल्याने मला कोणी विचारले की चांगला लॅपटॉप कोणता घेउ? तर मी सांगेन की कमीतकमी ४ ते ८ जी.बी. रॅम, ५०० जी.बी./१टि.बी. हार्ड डिस्क,इंटेल आय ५ प्रोसेसर (ए. एम.डी नको), १५.७ इंच स्क्रीन असे कॉन्फिगरेशन घे. शक्यतोलेनोवो ,डेल किंवा लेनोवोचा लॅपटॉप घे.एसर नको. तर असा काहीतरी सल्ला हवाय. आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
23195 वाचन

💬 प्रतिसाद (63)
स
सह्यमित्र Wed, 04/29/2015 - 13:13 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
काळा पहाड Wed, 04/29/2015 - 13:57 नवीन
पटलं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुबोध खरे Wed, 04/29/2015 - 15:50 नवीन
पहाड साहेब डीएसएलआर छायाचित्रण हा अभिव्यक्तीचा एक कधीही न थांबणारा प्रवास आहे +१०० याबद्दल दुमत नाहीच. ( मी कोण गोमाजी लागून गेलो ?) D ३३०० ला WU १ A हा ADAPTAR लावून आपल्या प्रतिमा WI FI मार्फत आपण पाठवू शकता. याची किंमत ३८०० रुपये आहे. जर आपल्याला नंतर गरज पडली तर हा आपण लावू शकता. http://shopping.rediff.com/product/nikon-wu-1a-wireless-mobile-adapter/12223148 राहिली गोष्ट वाकवता येणारा एल सी डी स्क्रीन. आपल्याला डोक्यावर धरून आडवे झोपून छायाचित्र काढण्याची किती हौस आहे यावर आपण ५३०० घ्यावा कि नाही हे ठरवा. मला तितकी हौस नसल्यामुळे मी आपला D ३३०० घेऊन मोकळा झालो. बाकी http://www.dpreview.com/reviews/nikon-d3300 येथे किंवा दुसर्या कोणत्याही दुव्या वर पाहिलेत तर एक लक्षात येईल कि या दोन्ही कॅमेर्यांचा २४.२ मेगा पिक्सेल चा APS- C CMOS हाच सेन्सर आहे दोन्हीचा प्रोसेसर EXPEED ४ हाच (नवीन) आहे. म्हणजे दोन्ही कॅमेर्यांची ग्रहणशक्ती आणी प्रतिमा प्रक्रिया करण्याची शक्ती एकच आहे राहला एक फरक तो म्हणजे ऑटो फोकस मधील फरक. मी काही छायाचित्रकार नाही तेंव्हा कुठला फोटो उत्तम आहे आणी कुठला बरा आहे याचे मला काही विश्लेषण करता येत नाही ( तेवढ्या खोलात जायची इच्छाही आत्ता तरी नाही). जसे मला राग अहिरभैरव आहे कि किरवाणी आहे हे समजत नाही कि त्यातील फरक काय हेही समजत नाही. गाणे ऐकायला श्रवणीय आहे कि नाही एवढे पाहणारा माणूस मी. या दृष्टीने २०, ०००/- रुपये जास्त वाटले म्हणून मी D ३३०० घेऊन मोकळा झालो. जर मला तेवढी दृष्टी आली तर मी एकदम वरच्या श्रेणीचा कॅमेरा घेईन. नाही तर आयुष्य सुखात चालले आहेच. नव्याची नवलाई म्हणून D ५३०० ४५,०००/- ला आहे एक वर्षाने तो पण ३०,०००/- ला येईल. टच स्क्रीन वाला D ५५०० आलाच आहे. येथे मोबाईल सारखे आहे. सहा महिने थांबलात तर त्याच किमतीत तुम्हाला याहून चांगला कॅमेरा मिळेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/29/2015 - 16:22 नवीन
सुबोध खरे यांचे प्रतिसाद आवडले.
सहा महिने थांबलात
कॅमेरा, चतुरभ्रमणध्वनी किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जी आपल्याला आवडतात अन महाग वाटतात ती सहा महिन्यांनी तुलनेत नक्कीच स्वस्त झालेली असतात. परंतु तेव्हा त्याच उपकरणांची काही नवे वैशिष्ट्य असणारी आवृत्ती बाजारात उपलब्ध झालेली असते. मी माझा नेक्स ५एन साडेसातशे डॉलर्सला खरेदी केला अन काही महिन्यांतच त्याचे भाव सहाशे डॉलर्सपर्यंत खाली आले. अन त्याच वेळी सोनी ने नेक्स ६ बाजारात आणला ज्याची किंमत अंदाजे ६०० डॉलर्स होती. त्यामुळे एका मर्यादेपलिकडे विचार करत बसू नये. आपल्याला परवडेल त्या किमतीत वर्ष दिड वर्षापूर्वी बाजारात आलेले उपकरण बिनधास्त खरेदी करून कामाला लागावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
काळा पहाड Wed, 04/29/2015 - 20:00 नवीन
डॉक्टरसाहेब, धन्यवाद. ३३०० चांगला ऑप्शन दिसतोय. पाहू आणखी कमी होतो का. पण अनुभव असा आहे की काही वर्षांनंतर कंपन्या स्वस्त मॉडेल डिस्कन्टिन्यू करून नवीन मॉडेल आणतात. तसेही घरातला "कशाला इतका महाग कॅमेरा घ्यायचा एक असताना" टाईप विरोध मोडताना एखादं वर्ष जाणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोहनराव Wed, 04/29/2015 - 15:36 नवीन
चांगली चर्चा चालु आहे. निवांत वाचतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 04/29/2015 - 20:38 नवीन
णिकॉन एस ९९०० बघा
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 04/29/2015 - 21:05 नवीन
तो डिजीटल कॅमेरा हाय. एस. एल. आर. नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पाटील हो Sat, 05/02/2015 - 08:09 नवीन
मी पण हाच विचार करत होतो. खूप हुडका हुडकी केल्यावर माज्या बजेट माडले ३ मोडेल्स मिलले. Canon 1200D Nikon D3300 Sony SLT A58K त्यातला मी…. डी ३३०० चा विचार कातातोय . Mike Browne video आणि डी पी रेविएव सारक्या खूप उचापती करून ठरवलोय .
  • Log in or register to post comments
क
कौन्तेय Mon, 05/04/2015 - 03:23 नवीन
निकोन डी ५३०० वा त्याखालील डी ३३०० डोळे मिटून घ्या. हे दोन्ही प्राथमिक दर्जाचे क्यामेरे आहेत. पण नुसते म्हणायला. जर व्यावसायिक कारणासाठी उपयोग करायचा नसेल तर ही आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. निकोन व क्यानन यांत डावं उजवं करायचं असेल तर बरंच काही लिहिता येईल. पण एक हिमालय एक आल्प्स. काय बोलणार. प्राथमिक दर्जाच्या क्यामेर्‍यांमधे निकोन थो....डा अग्रेसर म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 05/04/2015 - 04:00 नवीन
आताच्या ओनलाइन खरेदीच्या युगात विकणारा म्हणतो माझ्या वस्तुचे चांगले चित्र दिसायला हवे अशावेळी फोटोग्राफर नव्हे तर चांगला कैम्राच हवा. कित्येक मॉडेलात जवळचे फोटो नीट येत नाहीत ,हॉटेलची रूम कशी दिसते हे दाखवायचे असेल तर DSLR ला चांगले २४ अथवा २८ एम एम चे लेन्सच हवे . परंतू असे काही काम आपणास करायचे नसेल तर महागडा कैम्रा घेण्याची जरूर नाही . सिनेमा कलावंतांचे फोटो घेण्यासाठी जायचे असेल तर गोष्ट आणखी वेगळी हातात चांगला कैम्रा(एनट्री लेवल नाही)दिसला नाही तर स्टुडिओत सोडणार पण नाही.
  • Log in or register to post comments
क
कौन्तेय Mon, 05/04/2015 - 06:06 नवीन
आगस्ट २००८ला मी माझा पहिलावहिला डीएसेलार निकॉन डी-३००० घेतला. त्याआधी जो काही गृहपाठ केला तो खालील प्रमाणे. डीएसेलारसाठी सामान्यतः ऑलिम्पस, सामसंग, सोनी, कॅनन, निकॉन, फ़ुजी असे विकल्प समोर असतात. महाजालावरची विविध तौलनिक मूल्यांकने वाचली. सगळ्या बेरजा वजाबाक्या स्वतः वस्तुनिष्ठ पद्धतीने समोर तक्ते मांडून केल्यावर सगळ्यात शेवटी रहाता राहिले निकॉन व कॅनन. निकॉन व कॅनन हे प्रकाशचित्रणातले दोन समांतर रूळ आहेत. गंतव्य एकच असले तरी दोन्हींच्या अनुयायांचे एकमेकांशी कधीच पटत नाही. त्यामुळे निकॉन की कॅनन हा प्रकाशचित्रणातला चिरंतन वैश्विक वाद आहे! मी निकॉन पार्टीत उडी मारली आहे. मला कॅनन बद्दल काहीही रोष नसला तरी मला त्यांच्या बारकाव्यांबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकणार नाही. शेवटी चित्राची गुणवत्ता तपासून अंतिम निर्णय घ्यायचा होता. मला स्वतःला कॅननचे रंग ‘अधिक साजरे केलेले’ वाटतात, तर निकॉनचे अधिकाधिक नैसर्गिक व वास्तव. घेतलेल्या चित्राला आपण आजकाल पीसीवर घेऊन हवे तसे भडकवू शकतोच, त्यामुळे मी ठरवले की ती मुभा कॅमेऱ्याला द्यायची नाही व निकॉनकडे ओढला गेलो. आणखी एका कारणासाठी निकॉन निवडला. प्राथमिक पायरीच्या डीएसेलार्समधे निकॉन कॅनन पेक्षा थोऽऽडा पुढे आहे हे मी म्हणालो त्याचं कारणही हेच आहे. कुठलाही डीएसेलार कॅमेरा दहा पंधरा फ़ुटांपर्यंतच्या अंतरासाठी एक प्रकाशशलाका समोर फ़ेकून तत्संबद्ध सेन्सरद्वारे अंतर नक्की करून बरोब्बर स्वयं-फ़ोकस करतो. ही सुविधा कमी क्षमतेच्या एका विशेष दिव्यासकट निकॉनच्या सगळ्या कॅमेऱ्यांमधे आहे, तर कॅननच्या फ़क्त वरिष्ठ श्रेणींच्या कॅमेऱ्यांमधे आहे (तेव्हा होती). कॅननचे कनिष्ठ श्रेणीचे कॅमेरे हे काम फ़्लॅशलाईट फ़्लिकर करून करत. पण त्यामुळे एखाद्या शांत ठिकाणी (उदा: म्युझियम, एखादी मैफ़ल, वर्गकक्षा) उगीचच थोडा व्यत्यय निर्माण होऊ शकतो. तर चित्राचे रंग व ही स्वयंफ़ोकस यंत्रणा या दोन आघाड्यांवर मी निकॉनला विजयी घोषित करून त्यांच्या पार्टीत सामील झालो.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 05/18/2015 - 10:35 नवीन
हा प्रतिसाद आवडला ...म्हणण्यापेक्षा पटला. आपण कॅमेरा घेताना बराच चांगला अभ्यास केला आहे असे जाणवते आहे. मी निकॉन ३३०० घेतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा