Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हेल्मेट

स — संजुदा, Sun, 04/26/2015 - 19:04
मध्यंतरी हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती त्यावेळी लिहिलेली ही कविता 'हेल्मेट 'वर कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांनी जर कविता लिहिली असती तर कदाचित ती अशीच लिहिली असती . विडंबनाचा एक प्रयत्न 'हेल्मेट' पाडगांवकरांच्या शैलीत हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून त्याला कवच म्हणता येतं हिंदीतून त्याला शिरस्त्राण म्हणता येतं हेल्मेट हेच त्याचं दुसरं नेम असतं हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं हेल्मेटच्या सक्तीचा सरकारी कायदा आहे खरं तर हेल्मेटचा आपल्यालाच फायदा आहे एकदा डोक्यात घातलं की हेल्मेट झपाट्याने काम करू लागतं नको असण्यार्‍यांच्या समोरून कसं बिनधास्त जाता येतं घेणेकर्‍यांचा तर त्रासच मिटला त्यांना उत्तम टाळता येतं अगदीच मस्त सोय महाराज सुंदरींकडे टक लावून पाहता येतं दारू पिऊन पडलात तरी डोकं फुटणार नसतं कारण हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं

प्रतिक्रिया द्या
1261 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ख
खटपट्या Mon, 04/27/2015 - 02:51 नवीन
जबराट !! तुम्ही पुणेकर नाही हे पक्के...
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 04/27/2015 - 02:53 नवीन
अरेरे !!
शाळा/महाविद्यालय/विद्यापीठ Pune University
हे वाचले नव्हते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/27/2015 - 03:59 नवीन
छानंच जमलंय विडंबन. यावरून आठवले - खालील चर्चा अजून वाचणे बाकी आहे. हेल्मेटसक्ती.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Mon, 04/27/2015 - 08:13 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 08:14 नवीन
झकास :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/28/2015 - 08:07 नवीन
झकास ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा