Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंथरुण (कामात बिझी असणाऱ्या मित्रांना)

V — Vimodak, Mon, 04/27/2015 - 03:53
तू गेलीस दूर कधी, मला कळले नाही, आणि, आज तुझे कान, माझ्या हाकेबाहेर. मी यायचो घरी, घामेज़ून दिवस भरून, कोमेजून... आणि, सगळा शिण टाकुन पदरात तुझ्या, शांतपणे झोपायचो. ऑफ़ीसमध्ये, तूझं नाव पुसल्या फळ्यावर, कोरडे ग्राफ चढत जात, आणि, ओले लागत उतरणीला. दिवस कमवायचो, गमवून दिवस. दोन दिवस तुझे माझे, हक्काचे, काढायचे होते... तारे-तारे निवडून सारे, ढग दूर सारायचे होते. पण त्याआधीच, स्पर्शाच्या परिघातच दूर झालो आपण, नजरेच्या टप्प्यातच, दृष्टीआड़ झालो आपण. तुझं पत्र मिळालं, 'काळजी घे' या दोन शब्दांत, दोन वर्षांचा सारा शिण, व्याजासकट परत केलास. आता येतो घरी घामेजून, दिवस भरुन कोमेजून, आणि, कड़ी न लावता दाराची, जूना शिण अंथरतो, नविन शिण पांघरतो....

प्रतिक्रिया द्या
2201 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पैसा Mon, 04/27/2015 - 10:49 नवीन
शीर्षक मात्र तेवढंसं आवडलं नाही.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 04/27/2015 - 11:51 नवीन
हेच म्हणायचंय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
V
Vimodak Mon, 04/27/2015 - 14:30 नवीन
शीण.. शिर्षकही डोक्यात होतं.. पण 'अंथरुणात' शीण नाहिसा करायचं बळ असतं म्हणून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्राची अश्विनी Fri, 05/01/2015 - 14:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 11:43 नवीन
वाह, मस्त आहे :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 04/27/2015 - 16:37 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/27/2015 - 16:42 नवीन
चांगली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/27/2015 - 19:12 नवीन
काम ( अंथरुणात बिझी असणाऱ्या मित्रांना) असे विडंबन होवु शकते =))
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 04/30/2015 - 13:07 नवीन
किती सुंदर कविता!! अतिशय आवडली!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा