रात्रप्रवासी
तारे वेचू तूझियासाठी,
म्हणून निघालो रात्रप्रवासि...
सूर्याला माघारी ठेवून,
मंद वाहत्या चंद्रपाशी...
गळ टाकुनी, अगाध-आकाशी,
याचक बनूनी,
अनंत-अधाशि...
तुटले तारे वेचत फिरलो,
ध्रुव ताऱ्यासाठी मी झुरलो.
'ध्रुव' बांधण्या वेशी तुझिया,
क्षण क्षण माझे, विकत राहिलो.
माथी चढवून अखंड देणे,
'तारा' बनूनी देत राहिलो...
तुटत राहिलो..
मिटत राहिलो...
💬 प्रतिसाद
(5)
V
Vimodak
Wed, 04/29/2015 - 10:41
नवीन
तूटत राहिलो..
मिटत राहिलो...
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 04/29/2015 - 12:27
नवीन
कल्पना आवडल्या.
लिखाणात काही बदल हवे असतील तेव्हा कोणा संपादकांना व्यनि करा.
- Log in or register to post comments
V
Vimodak
Wed, 04/29/2015 - 21:45
नवीन
सुचनेबद्दल धन्यवाद.. : )
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 04/29/2015 - 13:18
नवीन
अप्रतिम कविता .. आवडली
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 04/30/2015 - 07:23
नवीन
गुड वन !
- Log in or register to post comments