Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंदूर - भाग ३ - सराफा

म
मोदक
Wed, 04/29/2015 - 17:28
💬 88
इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी इंदूर - भाग २ - रावेरखेडी >>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला.... या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो. भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले. रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता.. . . सराफा बाजार हा दिवसा (सोनेचांदीवाल्या) सराफ्यांचा बाजार आहे आणि संध्याकाळी त्यांची दुकाने बंद झाल्यानंतर दुकानांच्या पायर्‍यांवरती खाऊपिवूचे ठेले लागतात . आम्ही सुरूवात गराडू पासून केली . हे एक वाफवलेले कंदमुळ आहे आणि खाण्याच्या आधी तेलात तळून व त्यावर गराडू मसाला घालून देतात. गराडू मसाला चाट मसाल्यापेक्षा फार वेगळ्या चवीचा परंतु एकदम चटकदार प्रकार होता. भुट्टे का कीस.. . गुलाबजाम . "मालपुये" . मूंग दाल हलवा.. . "लच्छेवाली रबडी" . हा एक स्पेशल जिलबीवाला होता... आपण किती लोक आहोत ते पाहून आणि "कितना खाओगे" असे विचारून सर्वांना पुरेशी होईल या आकाराची एकच जिलबी गरमागरम आपल्या समोर करून देत होता. . इंदूरात जावून पानीपतासे कसे चुकवणार... . थोडे थोडे हे सगळे (आणि फोटोत न आलेले समोसे, कचोरी आणि "जोशीजी का दहीबडा") हादडून पोट तुडुंब भरले होते. शेवटी आग्रहाची एक कुल्फी आणि फालूदा झाला.. . या सर्व इंदूरी खासीयत सोबत बाकीही खाद्यपदार्थांचे स्टॉल होतेच.. . . चायनीज, मंचुरीयन, वगैरे वगैरे.. तुडुंब खादाडी करून आणि एक भन्नाट पान खावून रात्री उशीरा घरी परतलो. उद्याचा दिवस संपूर्ण रिकामा होता आणि "आपल्याला दिवसभर कुठे ना कुठे खादाडी करायची आहे!" असे भुषणने बजावून ठेवले होते. सकाळी उठून आवरले व सर्वांसाठी "पोहा जलेबी" आणण्यासाठी चेतन सोबत पुन्हा मार्केटमध्ये आलो.. . "भिया आप कुछ खाते नही हो.. चलो आपको और चीजे खिलवाता हूं" असे म्हणून चेतन दोन तीन ठिकाणी घेवून गेला. त्यामुळे उपवासाची कचोरी आणि साबुदाणा खिचडी ही हादडून झाली. घरी येवून थोडी विश्रांती / गप्पा / कॅरम आणि असे बरेच काही करून एक मस्त झोप काढली. संध्याकाळी पुन्हा सराफ्याला भेट देवून काल आवडलेले प्रकार आणखी एकदा हादडून झाले व एका प्रसिद्ध ठिकाणाहून भरपूर नमकीन्स खरेदी केले.. चॉकलेट शेव, पाईनॅपल शेव, पुदीना बुंदी असे अनेक अनवट प्रकार मिळाले.. नमकीन्सच्या दुकानात गिर्‍हाईकाच्या बाजुने उघडणारे मोठाले ट्रे होते. हवे ते नमकीन चाखा आणि ऑर्डर द्या.. असा प्रकार. . . आजही चेतनने आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी नेवून एक मस्त पान खाऊ घातले. (कोल्हापूरला "राजाबाळ" कडे एक वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान मिळते. त्याच्यासारखी चव होती!) इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले. एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता. (क्रमशः)

Book traversal links for इंदूर - भाग ३ - सराफा

  • ‹ इंदूर - भाग २ - रावेरखेडी
  • Up
  • इंदूर - भाग ४ - इंदूर ते पुणे (समाप्त) ›

प्रतिक्रिया द्या
35330 वाचन

💬 प्रतिसाद (88)
ह
होबासराव Wed, 04/29/2015 - 17:35 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/29/2015 - 17:37 नवीन
अप्रकाशित करु का धागा. ;) मानसिक छळ करणारे छायाचित्र देवा, मोदकाला क्षमा कर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 04/29/2015 - 17:40 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/29/2015 - 17:54 नवीन
झक्कास!!!!
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Wed, 04/29/2015 - 18:03 नवीन
सराफा बिराफा असे काही नसते, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. संपादक मंडळाला विनंती की असे धागे अप्रकाशित करावे आणि अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल सदस्यावर कारवाई करण्यात यावी. २ दिवस सराफा :( मजा आहे तुमची
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 04/30/2015 - 07:54 नवीन
खरय... फक्त भास आहे.. आत्ता माझ्या पोटात खवळलेली भुक सुद्धा मोहमायाच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके
अ
अनुप ढेरे Wed, 04/29/2015 - 18:36 नवीन
कहर!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 04/29/2015 - 19:04 नवीन
बाइकचे फतु कुठाय
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/29/2015 - 19:46 नवीन
तु मुलगी बघायला गेल्यावर तिच्या काकाकडे बघत बसतोस का रे? ;) नै म्हणजे एवढे भक्कम खादाडी फोटो आहेत आणि ह्याला बैकचं पडलयं. ;)... पहिले दोन भाग बघ :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 04/29/2015 - 20:15 नवीन
मी पक्षीवाला आहे...हे गोग्गोड नै जमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सूड गुरुवार, 04/30/2015 - 10:12 नवीन
ओके, थंडरबर्ड खाता का आपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/30/2015 - 13:37 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/30/2015 - 14:51 नवीन
+D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/01/2015 - 06:18 नवीन
सुडुक पेटला... ;)!!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
र
रवीराज Wed, 04/29/2015 - 19:42 नवीन
भुट्टे का कीस च्या ऐवजी चुकुन असे वाटले.. मस्तच आहे सराफा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/29/2015 - 19:45 नवीन
गुलाबजामचं तळं & रबडीबासुंदी तलाव पाहुनImage removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 04/29/2015 - 19:47 नवीन
लै भारी खादाडीयात्रा !
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 04/29/2015 - 20:04 नवीन
जळजळ, मत्सर, भूक आणि अशाच अनेक भावना/ संवेदना एकाच वेळी जाग्या झाल्या आहेत! :(
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/29/2015 - 20:14 नवीन
मोदक यान्चा त्रिवार निषेध.रात्री परत भूक लागली.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 04/29/2015 - 21:21 नवीन
करून टाका अप्रकाशित च्यामारी टोपी... पानाची बोळवण तीन वाक्यांत केल्याबद्दल निषेध. अजून डीटेल हवेत. चटणी कोणती, जर्दा कुठला वगैरे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 05/04/2015 - 09:40 नवीन
नाय ब्वा, मला निकोटीनची जबरदस्त अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे जर्दा वगैरे लै मोठे प्रकार झाले.. साधा किमाम पण झेपत नाही. त्यामुळे त्या बाबतीत पास. सध्या मसाला पानमध्ये अनेक प्रयोग करून "रामप्यारी" वर सेटल झालो आहे. (रामप्यारीचे डिटेल्स कोणाला माहिती असतील तर जरूर सांगा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ज
जुइ Wed, 04/29/2015 - 21:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 04/29/2015 - 22:15 नवीन
अप्रतिम. गुलाबजाम चा फोटो तर कातिल. कधी येणार योग इन्दूराला जायचा? तो पर्यंत दुधाची तहान ताकाच्या फोटोवर भागवून घ्यावी लागणार :(
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 04/30/2015 - 00:34 नवीन
फोटो छान आहेत. एकदम. माझे इंदूरातले दिवस आठवले. रूम पार्टनरचे नातेवाईक सुदामा नगरला असल्याने तेथे जाणे झाले की सराफा बाजारात वरचेवर चक्कर व्ह्यायची. ऑफीस छोट्या ग्वालटोलीत होते. तो भाग मध्यवर्ती अन भरपूर वर्दळीचा आहे. तेथूनच राजवाडा परीसरात भरपूर पायी चक्कर व्ह्यायचे. म्हणजे मी करायचो. ऑफीसातला बॉय समवयस्क असल्याने आम्ही एकत्रच फिरायचो. दिवसा आम्ही दोघे वेगवेगळी हॉटेले धुंडाळून नाश्टा करायचो. त्या काळी दुपारचे भरपेट जेवण क्वचितच केलेले आठवते. सारा दिवस फुटकळ खाणे पोटात ढकलून पुर्ण व्ह्यायचा. ऑफीसात कामे नसल्याने (!) दिवसभर परीसरात भटकंती व्ह्यायची. रेल्वे स्टेशन, तेली गल्ली, जेल रोड, छत्री, सरवटे बस स्टँड, राजवाडा, बडा गणपती, स्टेडीयम, मधू मिलन टोकीज, लायब्ररी, स्टेडीयम, दवा बाजार, ५६ दुकान आदी परीसर तर मी कोळून प्यायलो आहे. माझ्या आधीचे बाहेरून आलेले मेडीकल रिप्रेंझ्टेटिव्ह नोकरीत असलेल्या मुलांनी जेवढे इंदूर पाहीले नाही तेवढे इंदूर मी त्या कमी कालावधीत पाहीले. तेथे राहत असतांना मी जाणीवपुर्वक पायी फिरत असे. कारण सीटी बस उशीरा निघत अन तेवढ्या वेळात आपण इच्छीत स्थळी पोहचत असू. बाकी नोकरीत जेव्हा फिल्ड व्हिजीट असायची ती पिथमपूरला असायची अन तेव्हा मात्र जेवणाचे फार हाल व्हायचे. हाल असे की सकाळच्या नाश्ट्याचा डबा करून सोबत न्यावा लागत असे अन दिवसभर तेवढ्यावरच समाधान मानावे लागे. अर्थात त्याची भरपाई इतर दिवशी इंदूर ऑफीसात राहून करावी लागे अन आम्ही ती करत असू.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/30/2015 - 01:26 नवीन
काय ते फटू, अहाहा... पुभाप्र.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/30/2015 - 06:00 नवीन
हलकट मोदक! मी हा धागा वाचला नै आणि फटु त्याहून बघितले नैत!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 04/30/2015 - 09:15 नवीन
कुठे फेडशील रे हि पापं?? हे देवा मोदकला माफ करं. त्याला माहित नाहि त्यानी हे फोटो दाखवून किती जणांचा रोष पत्करला आहे. प्रचंड चलबीचल झालेय मनाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कंजूस गुरुवार, 04/30/2015 - 06:50 नवीन
छान. कोल्हापुरात दुधदुभते,कडधान्ये तेल याची रेलचेल असून अशी प्रसिद्धि का नाही? लाल पांढरा रस्सा आणि मिसळ?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 04/30/2015 - 07:07 नवीन
शाकाहारी फोटो बघुन इतकी जळजळ पहिल्यांदा झाली.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/30/2015 - 07:39 नवीन
+११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
न
नूतन सावंत गुरुवार, 04/30/2015 - 07:37 नवीन
मोदक, तिन्ही धागे एकाच बैठकीत वाचून काढले.ऐकीव माहिती खूप होती साराफ्याबद्दल.पण प्रेक्षणीय महिती तुझ्यामुळे मिळाली.माहितीपूर्ण लेख.त्यातथोरल्या बाजीराव पेशव्यांची समाधी अनपेक्षितपाने समोर आली.त्याबद्दल तर तुला दंडवतच.समाधीचे दर्धन घेण्याची ओढ जीवाला लागावी इतके कातर वर्णन.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 04/30/2015 - 08:04 नवीन
२०१५ च्या ऊत्तरार्धात इंदुरास जाण्याचा योग असल्याने आपली काई जळजळ झाली नाही. पोहा जलेबी या विचित्र कॉम्बोबद्दल जोरूके भाईकी तोंडसे सुना है .
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/30/2015 - 10:09 नवीन
चौरा साहेब, इंदुरात खादाडी करा, पण रोज सकाळी एक ग्लास ज्यूस जरूर प्या, म्हणजे खादाडी बाधणार नाही. रात्रीचे खाणे टाळायचे असेल, तर दिवसा 'छप्पन दुकान' मधे सराफावाले सर्व तेच पदार्थ मिळतील. साठीत जरा जपावे लागते हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ट
टीपीके गुरुवार, 04/30/2015 - 10:46 नवीन
नर्मदेचे पाणी प्यायल्यावर कुठे काय बाधते काका? जगातील सर्वोत्तम पाणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
अ
अस्मी गुरुवार, 04/30/2015 - 08:04 नवीन
भयंकर टेम्टिंग फोटो...!!! ते गराडू फार इंटरेस्टिंग वाटतंय मला.. मस्त वर्णन & लेखनशैली!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 04/30/2015 - 09:01 नवीन
तिन्ही धागे आजच पाहिले व वाचले.. फोटो पाहून आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन खादाडी कराविशी वाटते आहे.. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/30/2015 - 09:33 नवीन
व्वा. मस्त. अजून इंदुरात असाल, तर 'छप्पन दुकान' मधे जाऊन 'एग बेंजो' किंवा 'मटन बेंजो' हा प्रकार पण चाखा. मात्र तिथला व्हेज बेंजो काही खास नसतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/30/2015 - 10:19 नवीन
@ 'छप्पन दुकान' >> नोंद घेणेत आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/30/2015 - 10:22 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मोदक Sat, 10/03/2015 - 04:22 नवीन
'छप्पन दुकान' मधे काल 'एग बेंजो' खाल्ला - ठीक वाटला. मसाला ऑम्लेट आणि ब्रेड + चटपटा मसाला असा प्रकार वाटला. इंद्राणी नामक एक मिठाई आणि "रसमलाई+पेठा" असाही एक प्रकार खाल्ला. Image removed. नेहमीप्रमाणे सराफा भेटही झाली. आणखी काही नवीन प्रकार असल्यास जरूर कळवावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/03/2015 - 07:05 नवीन
इंद्राणी =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 09:55 नवीन
वा .. वा .... काय खाण्याची मजा आहे भाऊ ...
  • Log in or register to post comments
म
मी_आहे_ना गुरुवार, 04/30/2015 - 10:13 नवीन
मोदकशेठ, धाग्याचं नाव बघूनच 'भरपेट जेवण झाल्याशिवाय हा धागा उघडायचा नाय' असं ठरवल्यामुळं फार जळजळ / छळ होण्यापासून वाचलो :) धागा नेहमीप्रमाणेच झकास..
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 04/30/2015 - 10:52 नवीन
एक नंबर जमले हो मोदक भाऊ!!!, सराफा म्हणा किंवा ५६ दुकान इथली खासियत म्हणजे पांढरेशुभ्र कुर्ता पायजामा घातलेले दुकानदार अन स्वच्छ्ता , गराडू म्हणजे आपण इंग्लिश मधे जे "यॅम" म्हणतो ते कंदमुळ आहे, मस्त प्रकार असतो, इंदौरी खास मसाला म्हणला तर तो म्हणजे "जिरावन" असतो! वाह परत एकदा सराफा सफ़र घडविले बद्दल आभारी आहोत! *सराफा किंवा छप्पन दुकान भागाला जियोटॅगिंग केले आहे काय? नसल्यास ह्या मुद्द्याचा पाठपुरावा केला पाहिजे!!
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 05/01/2015 - 05:22 नवीन
नाय वो, "जिरावन" नाय त्यो. मी मसाले विकत घेताना गराडू मसाला हवा असेही विचारले, पण गराडू मसाला तो दुकादार स्वत: तयार करतो असे कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
र
रॉजरमूर Fri, 05/01/2015 - 18:55 नवीन
याची रेसिपी You tube वर सापडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
र
रॉजरमूर Fri, 05/01/2015 - 21:20 नवीन
आणि अगदीच आठवण आली त्या गराडू ची तर सोप्पय सरळ घरी करून बघा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
र
रॉजरमूर Fri, 05/01/2015 - 18:15 नवीन
yam म्हणजे मराठीत ले "सुरण " काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बहुगुणी Fri, 05/01/2015 - 18:50 नवीन
यॅम हे तुकतुकीत त्वचेचं रताळ्यासारखं कंदमूळ आहे. याला मध्य भारतात गराडू म्हणून ओळखतात, Image removed. सुरणही कंदमूळच, पण ते वेगळं, त्याची त्वचा खडबडीत असते: त्याला अरबी (टॅरो रूट) म्हणतात. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
प
पैसा Fri, 05/01/2015 - 19:03 नवीन
अरबी म्हणजे अळकुडी, अळूचे मूळ. फोटोत अळकुडीच आहे. सुरण बराच मोठा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा