Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती हवी: चौसोपी वाडा व इतर मराठी वास्तु प्रकार

स
संदीप डांगे
गुरुवार, 04/30/2015 - 14:58
🗣 68 प्रतिसाद
चौसोपी वाड्यांबद्दल कुणी काही लेख, पुस्तके लिहिली आहेत का? जालावर कुठे फोटो मिळतील का? जालावर काही मिळालेत पण अर्धवट आहेत. पुर्ण कल्पना येत नाही. जिथे भेट देऊन अभ्यास करता येईल असे काही जुने चौसोपी वाडे सुस्थितीत व वापरात असलेले कुठे आहेत याची काही माहिती असल्यास जरूर सांगा. त्यांचे आर्कीटेक्चर, उपयोगिता, वैशिष्ट्ये, बांधकाम साहित्य, बांधकामावर असणारा पर्यावरणाचा प्रभाव यावर माहिती संकलित करायची आहे. त्याचे एक चांगले, जास्तीत जास्त बारकावे असलेले मॉडेल बनवायचे आहे. काही मराठी संकल्पनांवर जालावर निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. किल्ले, दुर्ग यांचे फोटोज मिळतात पण निरनिराळे वाडे, गढी, वैगेरेंची माहिती मिळत नाही. आपल्याला काहीही माहिती असल्यास इथे टाकावी जेणेकरून सर्वांना उपलब्ध होईल.

प्रतिक्रिया द्या
43323 वाचन

💬 प्रतिसाद (68)
स
सुनिल पाटकर Mon, 05/04/2015 - 12:08 नवीन
दापोली-जालगाव येय़े डाँ.वागळे यांचा असा वाडा आहे.येथे काही मालिकांचे चित्रीकरणही झाले आहे
  • Log in or register to post comments
न
नमकिन Mon, 06/15/2015 - 13:32 नवीन
माझे आजोळ (आईचं गाव) व वडिलांचे गांव दोन्ही १० कि.मी परिघात असून तेथे असे चिरेबंदी वाडे लहानपणी दर ऊन्हाळी सुट्टीत अनुभवले, भाग्यंच. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात असे कैक वाडे बालपणी लग्न समारंभ निमित्ताने पाहता आले. आज हा धागा सापडला त्याचे कारण वाडा दुरुस्तीसाठी शोध करत होतो. आज गावी गेलो होतो तेव्हा आत फक्त ३ जणी उरल्यात वाड्यात, त्यातली १ माझी आजी (आईची आई) बाक़ी सारे गाव सोडुन शेतावर खोल्या बनवुन राहतात. जेथे ५०-६० माणसे रहात होती पण पडझड, डागडुजीचा अभाव व वाढती गरीबी, आतबट्टयाची शेती, जुण्या बांधकाम जाणत्या कारागिरांचा तुटवडा, नवीन तंत्र जुन्याच्या मुळावर या सर्वांचा एकत्रित परिणाम वाडे नामशेष होताना दिसत आहे, मनात हळहळ ऊरते.
  • Log in or register to post comments
र
रोहित गोसावी Fri, 02/26/2016 - 11:35 नवीन
कृपया मला पेशवेकाळातील विश्रामबागवाड्याचे महत्व द्या ना ? प्लिज मला खूप गरज आहे.. कृपया मला whtsapp करा ..8421060808
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 02/26/2016 - 16:31 नवीन
महत्व या शब्दामुळे घोळ होत आहे. पेशवेकालिन विश्रामबागवाड्याची माहिती मिळणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित गोसावी
स
सिरुसेरि Fri, 02/26/2016 - 13:25 नवीन
यासाठी अब मधली दुकाने , दुकानदार तुम्हाला मदत करु शकतील .
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 02/26/2016 - 18:46 नवीन
छान माहिती. माझ्या मावशीचा आध्रप्रदेश मध्ये चाैसाेपी वाडा आहे. लहानपणी आम्ही उन्हाळ्यात नेहमी जात. तेथे आेसरीवर बंगई आहे. दुपारी मागील परसात आम्ही मावसभाऊ खेळत असू. आंब्याच्या रसाची पाेळी तयार करीत. खूप मजा यायची.
  • Log in or register to post comments
र
रोहित गोसावी Sat, 02/27/2016 - 10:05 नवीन
विश्रामबागवाड्याचे त्या पेशवेकाळात काय महत्व होते ते हवे आहे... मला कॉलेजला प्रोजेक्ट आहे ...वाड्यांविषयी माहीती भेटली आहे पण महत्व काय होते याविषयी माहीती हवी आहे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/27/2016 - 10:10 नवीन
प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर दादूस वाड्याला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल. अशी कशी माहिती भेटेल डायरेक्ट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित गोसावी
प
प्रचेतस Sat, 02/27/2016 - 10:14 नवीन
बाकी विश्रामबाग़वाडा उत्तरपेशवाईत दुसऱ्या बाजीरावाच्या निवासासाठी बांधला गेला. शनिवारवाडा आपणास लाभत नाही म्हणून दुसऱ्या बाजीरावाने तिथून जवळच स्वत:स राहण्यासाठी वाडा बांधवून घेतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
तनमयी Fri, 08/24/2018 - 08:53 नवीन
http://www.narendradengle.in/images/Publications/essays/pdf/The-Introvert-&-Exprovert-Aspects-of-the-Marathi-House.pdf
  • Log in or register to post comments
क
किरण नाथ Tue, 08/28/2018 - 17:30 नवीन
भोरचा राजवाडा पहा. उत्त्म स्थितित असलेला आहे. बर्याच चित्रपटामालिकांमधे असतो.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Tue, 08/28/2018 - 18:05 नवीन
काही फोटो असतील कोणाकडे तर डकवता येतील का? जसं की बळद, खोलीतली विहीर, भुयारी मार्ग इ इ
  • Log in or register to post comments
क
किरण नाथ Wed, 08/29/2018 - 17:31 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. सर्व फोटो आंतरजालावरुन घेतले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
I
II श्रीमंत पेशवे II Wed, 08/29/2018 - 06:39 नवीन
कोकणात अशा प्रकारचे वाडे पहायला मिळतात. माझ्या माहितीत एक वाडा मालगुंड , जिल्हा रत्नागिरी येथे आहे. हा पूर्वी श्री लिमये यांचे घर होते ,शिक्षणा साठी आणि मग पुढे नोकरीनिमित्त घरातील मुलं तालुक्याबाहेर पडली त्यामुळे नंतर हा वाडा बंदच होता. काही वर्षांपूर्वी श्री रमानंद लिमये यांनी पुन्हा गावी जाऊन त्याची योग्य डागडुजी करून त्याला जतन केले आणि हा वाडा एक ऐतिहासिक वारसा सांगणारा असल्यामुळे त्यांनी तो सर्वाना दाखवावा या हेतूने खुला केला मालगुंड येथे कवी केशवसुत यांच्या स्मारकाजवळ हा वाडा आहे. त्याचे नाव लिमये चौसोपी वाडा असेच आहे सम्पर्का साठी . श्री लिमये यांचा दूरध्वनी क्रमांक डेट आहे - श्री रमानंद लिमये - ९८६०७८०९७३ फोन - ०२३५७-२३५१९२ , +९१ ८२७५९००९८१ ऐतिहासिक वातावरण आणि घरंदाज पाहुणचार अवश्य अनुभवा
  • Log in or register to post comments
R
Ram ram Mon, 09/03/2018 - 18:28 नवीन
सव्यसाचीजी पुर्वी कमी पावसाच्या प्रदेशात धाब्याची घरं बांधत. मातीच्या किंवा दगडी जाड भिंती.लाकडी खांबावर आडवी सागाची खांडं. मध्ये वासे असायचे. त्याच्यावर किरळी ही काटेरी वनस्पती अंथरुण त्यावर पांढरीची खारी माती ओली करुन छत तयार करायचे. श्रीमंत लोक चुना व वाळू घाण्यात मळून त्याचा कोबा करत. आजही गावोगाव पडके वाडे खिंडाररूपाने उभे आहेत.करंट्या लोकांना हा वारसा वाचवता येत नाही. पर्यावरणपुरक अशी ही वास्तू जाऊन सिमेंटकाँक्रीटची जंगलं यांनी माणसाला माणसापासून दूर नेले आहे.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Mon, 09/03/2018 - 18:37 नवीन
संदिप भाऊ नाशिक चा सरकारवाडा वाचवण्यासाठी नाशिककरांनी काहीच केले नाही. अजूनही काही वाडे अशोकस्तंभ ते रविवार कारंजाच्या उत्तर बाजूस नदीकाठी असे वाडे आहेत. चांदवडला रंगमहाल हा होळकरांचा राजवाडा जवळ पडेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Mon, 09/03/2018 - 18:45 नवीन
पेशव्यांचे एक सरदार बहुतेक खासगीवाले यांचाही वाडा असावा. शंभर जिलब्या खाऊन जाड चांदीचं ताट हाताने चोळामोळा करत. एकदा सतरंजी अंथरण्यासाठी वाड्याचा खांबच त्यांनी वर उचलला होता.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Mon, 09/03/2018 - 18:53 नवीन
तनमयी खुप छान माहिती.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा