Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

...देव आहे अंतरी

अ — अजय जोशी, गुरुवार, 04/30/2015 - 15:47
गझल... तू मला टाळून कळले, लपविले जे अंतरी.. आणखी आणू नको तू आव कुठले अंतरी..! दूर तू असतेस आता, काळजी कुठली नसे... भेट की भेटू नको विश्वास आहे अंतरी..! मन तुझे कळले मला शब्दांविना स्पर्शातुनी.. फारही सांगू नको तू ठेव थोडे अंतरी..! मी तुला भेटायला इतके मुखवटे चढविले.. आणि ओळखलेस तेंव्हा भाव फुलले अंतरी..! ती गुलाबाची कळी पाहून मी स्मरले तुला.. फुलत गेले आठवांचे रोम हर्षे अंतरी..! आज तू पुसलेस अश्रू, पायही दमले तुझे.. केवढे छळलेस पूर्वी, काय पिकते अंतरी..? घोषणा केलीस तू भेटायचे आहे पुन्हा.. पण मिठीच्या आत कळले फोलपण जे अंतरी..! या मनाच्या वावराला दु:ख जळण्याचे नसे.. पण कुणी समजून घ्या हो, काय जळते अंतरी..! शोधतो आहेस का रे 'अजय' फिरुनी विश्व हे.. मान की मानू नको पण देव आहे अंतरी..!!

प्रतिक्रिया द्या
1916 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
सूड गुरुवार, 04/30/2015 - 16:59 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 05/01/2015 - 08:40 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/01/2015 - 09:10 नवीन
छान कविता! गेल्या काही दिवसांत मिपावर बर्‍याच चांगल्या कविता येत आहेत! नशीब आमचं! :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 05/01/2015 - 14:20 नवीन
वाह! गझल आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 10/24/2024 - 14:18 नवीन
ही गझल सुटली होती वाचनातून! सुंदर कल्पना आणि ओळी! फार आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा