Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मालगाड़ी

V — Vimodak, Fri, 05/01/2015 - 11:44
मला आय नाय, बाप हाय. आगीवाले डोळे त्याचे, अन जबान चाबुक हाय. निघतो रोज सकाळपारी धूर सोडत इंजनवाणी, जणू पटरी पायाखाली. ठरली ठेसनं ठरलं काम, येगळी माणसं येगळा दाम. येतो झिजून रातपारी धूर सोडत इंजनवाणी, वेडीवाकडी पटरी घेउन पायाखाली. पाठ लाऊन भिताडाला घाम पाजीत बसतो अन, 'काय केलस दिसभर?' जणू इचारतो सोताला.. 'काय नाय' जवाब मातूर माझा हाय. आगिवाले डोळे ओकतो, चाबुकवाली जबान ठोकतो, हातालाभी लई जोर, हाणतो मात्र आंगचोर. विडी-चूल पेटवून आत, रोजच्यावाणी डाळ-भात, खाऊन पडतो गपगार.. पाहत राहतो उदयापार. 'काय करणार?'इचारल्यावर, बापावाणी अडाणपण, चढलं मुखडयावरती अन, 'मालुम नाय' गेलो बोलून.. रातभर कुशीत तेच्या, कान लावून छाताड़ाला.. मालगाड़ीची सारी धड-धड ऐकत राहिलो.. बिगर सपनांची खाली गाड़ी, बघत राहिलो. सकाळच्याला... बाप माझा, निघाला जवा, धूर सोडत इंजनवाणी... बोट धरून जूडलो मीबि, जणू तेच्या डब्यावाणी...

प्रतिक्रिया द्या
2884 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्राची अश्विनी Fri, 05/01/2015 - 14:14 नवीन
काही कळले नाही. :(
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 05/03/2015 - 13:17 नवीन
त्याचा कष्टकरी बाप कदाचित मालगाडीवर हमाल म्हणून काम करत असेल आणि या पोराचं आयुष्यही रेल्वे यार्डात बापाच्या मागोमाग हिंडण्यात जात असेल. घरात आय नाही. बाप कसातरी पोराला वाढवतो आहे आणि पोरगं रात्री बापाला चिकटून काढतं आहे कारण बिनघोर झोपायला आईची कूस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
V
Vimodak Sun, 05/03/2015 - 22:40 नवीन
लिहिताना हीच कथा विचारात होती..थैंक्स पैसा.. : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्राची अश्विनी Tue, 05/05/2015 - 07:14 नवीन
ओह! चुकून "आय नाय, बाप नाय" असे वाचले आणि अर्थ डोक्यावरून गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vimodak
V
Vimodak Tue, 05/05/2015 - 07:29 नवीन
अतिरिक्त माहिती: माझे 'आयबाप' डोंबिवलीला सुखरूप आहेत ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
आ
आदूबाळ Fri, 05/01/2015 - 14:19 नवीन
आवडली.
विडी-चूल पेटवून आत, रोजच्यावाणी डाळ-भात, खाऊन पडतो गपगार.. पाहत राहतो उदयापार.
हे विशेष आवडलं.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 05/01/2015 - 16:08 नवीन
"बोट धरून जूडलो मीबि, जणू तेच्या डब्यावाणी..." - निव्वळ अप्रतिम. एका कष्ट्कर्याचे आणि त्याच्या लेकराचे जीवन चांगले मांडले आहे कवितेत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/01/2015 - 16:29 नवीन
आशयगर्भ अभिव्यक्ती!
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Sat, 05/02/2015 - 10:37 नवीन
पाहत राहतो उदयापार.
ओळ छान असली तरी पहात नाही उद्यापार ही जास्त आशयाला जास्त समर्पक वाटली असती. (उद्यापार याच अर्थ मी उद्यापलीकडे म्हणजे भविष्याकडे असा घेतला) कारण अश्या कष्टकरी लोकांची "आजचा दिवस भागला उद्याचं उद्या बघू " अशी मनोवृत्ती असते.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/05/2015 - 11:13 नवीन
पाहत राहतो उदयापार.
मला पण हीच ओळ (कडवे) आवडले जास्त. फक्त पाहत राहतो उद्यापार म्हणजे काळजीने माझा बाप कदाचीत माझीच काळजी करत झुरतो रोज आणि माझ काय होईल उद्याला ह्या गर्तेत पडुन असतो ह्या अर्थाने ही ओळ आली असावी असे वाटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
ए
एस Sat, 05/02/2015 - 18:42 नवीन
फार सुंदर, आशयघन कविता आहे. दारिद्र्य हे एक दुष्टचक्र असते या शाश्वत विधानाची आठवण करून देणारी!!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 05/03/2015 - 13:15 नवीन
सहमत आहे. कविता आवडली. अशाच अर्थपूर्ण कविता येऊ द्या आणखी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पैसा Sun, 05/03/2015 - 13:12 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 05/05/2015 - 07:21 नवीन
कविता आवडली मोडक साहेब. अशाच आशयपूर्ण कविता येऊद्यात अजून..
  • Log in or register to post comments
V
Vimodak Tue, 05/05/2015 - 07:33 नवीन
वेळ काढून कविता वाचल्याबद्दल सर्व मित्रांचे आभार..लोभ असावा: विमो ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
प्रमोद देर्देकर Tue, 05/05/2015 - 07:46 नवीन
मनाला चटका लावणारी कविता.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 05/05/2015 - 09:44 नवीन
आवडली! धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 05/05/2015 - 09:54 नवीन
फारच संवेदनशील कविता..
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 05/05/2015 - 11:57 नवीन
अप्रतिम काव्य ! अप्रतिम चित्रण ! क्या बात है
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 05/16/2015 - 06:24 नवीन
वा! सुरेख.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा