विश्वास वासावरचा
आमची पेरणा
अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन....
रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो
समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो
हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो
आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो
खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते
पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते
पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो
पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो
प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो
श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो
काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात
वासहिन श्वासाची कामना करतात
तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो
सेंटच्या वासालाही तो ठोकरुन जातो...
वासानुज,
💬 प्रतिसाद
(9)
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 05/06/2015 - 06:40
नवीन
काय यात दडलेला एक गहन अर्थ सापडतोय का?
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
श
शब्दानुज
Wed, 05/06/2015 - 07:15
नवीन
बिघडलेले रहाणीमान आणि त्यातुन मिळणारा प्रदुषित आहार आणि पर्यायाने जागतिक समाजकारण याचा सहसंबंध यात आहे....
- Log in or register to post comments
श
शब्दानुज
Wed, 05/06/2015 - 07:18
नवीन
आणि 'यांची' काय म्हणताय? अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 05/06/2015 - 07:21
नवीन
मी पण,
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही.
नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
श
शब्दानुज
Wed, 05/06/2015 - 08:25
नवीन
अरेच्या..
जन्मतारीख ११-६-१९९५
जन्मस्थान पंढरपुर
वाटल्यास दाखलाही जोडेन
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 05/06/2015 - 09:23
नवीन
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की..
असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 05/06/2015 - 15:20
नवीन
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 05/06/2015 - 07:51
नवीन
पायोरिया मैंने
दाँतोंमें मेरे क्यूँ पायो
बदबू अनोखी
मसूडोंकी हालत
सबजन मुँहफेर करायो
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Tue, 06/30/2015 - 12:36
नवीन
- Log in or register to post comments