कोकणी भुते
कोकणी माणसांच्या मनातील भूते.
भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात.
आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ.
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या
१२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा.
१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.
२ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.
३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.
४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.
५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.
६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.
७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.
८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.
१० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.
11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .
12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते
13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....
संग्राहित / संपादित *
💬 प्रतिसाद
(163)
ट
टवाळ कार्टा
Wed, 05/06/2015 - 14:14
नवीन
फक्त १०००० हजारात?...होलसेल मध्ये आर्डर देउया का मिपाकरांसाठी ;)
बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;)
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Wed, 05/06/2015 - 14:16
नवीन
;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 15:27
नवीन
@बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;) 
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/06/2015 - 14:17
नवीन
तुमचा भुतांचा अभ्यास भारी आहे ! :)
भुतांतही इतके वर्गीकरण आणि जातपात असेल असे वाटले नव्हते ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 05/06/2015 - 14:22
नवीन
जखिन, हडळ, भानामति? त्यांचं काय?
बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का?
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 05/07/2015 - 05:08
नवीन
बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का?
का हो? रातच्याला वाड्यावर बोलावून डाव टाकायचा विचार हाय काय? (पत्त्याचा डाव हो..)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/07/2015 - 07:28
नवीन
रातच्याला वाड्यावर बोलावून पत्ते खेळणार??? =))
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/07/2015 - 10:44
नवीन
हो!! येतोस का तू पण? पाच-तीन-दोन खेळू या. आणखी कोणी आलं तर मेंढीकोट, चाराहून जास्ती असल्यास रम्मी खेळूया.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 05/07/2015 - 10:54
नवीन
मी येतो ... पण जेवायचे पण बघ हा.. नाहीतर डावा मध्ये उगा जेवन विसरायला नको..
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/07/2015 - 10:57
नवीन
तू नको येऊस बाबा, खेळायला बोलवतोय जेवायला नाही. =))))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/07/2015 - 18:00
नवीन
बदलापुर बुदुक ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 05/06/2015 - 14:23
नवीन
एक नंबर धागा!
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 05/06/2015 - 14:24
नवीन
त्रास = ञास हे आता ऑफिशियल आहे का?
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 05/06/2015 - 14:28
नवीन
१५. १६. १७. उडले का काञीत सापडून?
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Wed, 05/06/2015 - 14:30
नवीन
भुतांचा आभ्यास चांगलाय
ह्या सगळ्या भुतांमध्ये एक महत्त्वाचे भुत राहिलं
संशयाच भुत = हे फार लबाड भुत असते. ज्याच्या मानगुटीवर बसते त्याचे होत्याचे नव्हते करून टाकते.
आणि सगळ करून सवरुन पछडलेल्याला देशोधडीला लावल्या शिवाय त्याला सोडत नाही
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 05/06/2015 - 14:57
नवीन
आयला भारीच!!!! देशावरचीही अशी लिष्ट करून पाहिली पाहिजे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 05/06/2015 - 15:07
नवीन
मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा?
त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता?
म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का?
लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु?
(घाबरट)योगेशु.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 05/06/2015 - 15:13
नवीन
आपल्याकडं भूत म्हणजे टिपिकली मनुष्ययोनीतल्याच जीवाचे मरणोत्तर रूप. जिन म्हणजे अगोदरपासूनच अमानवी असलेले दुसरे जीव. यांना आपल्या भुतांप्रमाणेच सुपर पॉवर्स असतात.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 05/06/2015 - 15:26
नवीन
बलबन का मकबरा वाचा ;)
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Wed, 05/06/2015 - 15:08
नवीन
१) भुतांच्या प्रतीप्रमाणे वर्गवारी करायची झाली तर ते काम कोण करू शकेल ?
२) ही सगळी माहिती कोणी संकलित केली असेल ?
३) बायांग्या ह्या भुताचे दुकान नक्की कुठे आहे? त्याचे पैसे कुणाला द्यायचे? ते परत करायचे म्हणजे काय करायचे? त्याला साखळी घालून देतात का?
४) भूतयोनीतसुद्धा जाती असतील तर त्यांच्यात आणि आपल्यात वेगळेपणा काय आहे? तिथेही कुठली संस्था आहे का?
५) कोकणात भूतांना "टाईमपास" काय असतो? (टाईमपास २ नव्हे !!)
६) आशा राहिलेला माणूस भूत होतो तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे?
बाकी चालू द्या…. !!!!
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 05/07/2015 - 05:13
नवीन
जबरी प्रश्न...!!
तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे?
ह्या प्रश्नातच उत्तर आहे. त्यांना आशाळभूत असे म्हणतात.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 05/06/2015 - 15:08
नवीन
एकवेळ कोकणी भुतं परवडली, पण गोव्याची भुतं खूपच डेन्जरस असतात. सारखीसारखी चहा मागतात.
(सर्व भुताखेतांनी क्रुपया ह. घे.) :-D
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 05/06/2015 - 15:23
नवीन
सारखंसारखं मिसळपाव मागणारी भुतं कुठची बरं मग !
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 05/06/2015 - 16:14
नवीन
चहा मागतात ती रत्नांग्री-तळकोकणातली, हिते वर रायगडात आलात की दुदु दुदु मागणारी भुतं असतात. ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/07/2015 - 05:22
नवीन
पुणेकर मांत्रिकांपुढे कोकणी भुतांनी सुद्धा हात टेकले!!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 05/06/2015 - 15:13
नवीन
आपल्याकडे याचा का ही विदा आहे का?
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 05/06/2015 - 15:30
नवीन
इतक्यात चेपु वर किंवा आणखी कुठेतरी वाचलय. शिर्षक बहुधा कोकणातील भुते कि काहिस होत. तिथे भुताचा पहिलाच प्रकार mention केला आहे तो cheda आहे. ति लिंक शोधायाला आताच आमच्या जिनि ला पाठवलेय :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 15:24
नवीन
कोन त्यो आमच्याव धागा काढितो??? 
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 05/06/2015 - 15:27
नवीन
१३वाले भूत किती जणांना पायजे ते पैसाताईला सांगा.तिच्या घराजवळ विकत मिळतंय बहुतेक.ती पयसे गोळा करायला जाणार आहे.घेऊन टाकेल सगळ्यांसाठी=))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/06/2015 - 15:34
नवीन
मला पाहिजेत चार. फायदा झाला तर पैसाताईंना पैसे देउ.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/06/2015 - 15:33
नवीन
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 05/06/2015 - 16:03
नवीन
ते फिल्ममधे हिरो हिरोईन रोमांस करत असतात किंवा हिरोईन आंघोळ करताना मधेच येते त्या भूताला काय म्हणतात ? मेलं नीट एखादा चांगला सीन पुरे करु देईल तर शप्पथ.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 05/06/2015 - 16:12
नवीन
सेन्सॉर बोर्ड
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
गुरुवार, 05/07/2015 - 05:28
नवीन
=))
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 05/06/2015 - 16:12
नवीन
रामसे ब्रदर्स च्या मुव्हीज चे फॅन दिसताय
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 05/06/2015 - 16:20
नवीन
मोदिंनी सांगीतलेला 'मेक इन इंडिया' हा मंत्र अंमलात आणणारे ते एक आद्य उद्योजक होते.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 05/06/2015 - 16:14
नवीन
रामसे बंधु कडे याच्यापेक्षा जास्त व्हरायटी मिळते..
आठवा zee horror show
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Wed, 05/06/2015 - 18:36
नवीन
मस्त आठवणींना उजळणी दिलीत.
मी शाळेत होतो तेव्हा.
साला त्यातला "दस्तक" चा एपिसोड सॉल्लिडच होता.
जाम फ़ाफ़ललेली.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 05/07/2015 - 11:39
नवीन
'झी कॉमेडी शो'... म्हणायचं का तुम्हाला ?
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 05/07/2015 - 17:57
नवीन
बरोबर बोललात
नंतर कॉमेडी शो झाला तो
पण सुरुवातीचे काही एपिसोड चांगले दाखवलेले.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 05/06/2015 - 16:45
नवीन
अर्रे! हा नुसता भूतजातीवाचक सर्व्हे हाय काय! मला वाटलं मस्तपैकी कोकणातल्या श्टोरी असतील भुतांच्या! मज्जा येते ऐकायला. सांगा कोणाला माहिती असतील तर.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 05/07/2015 - 08:54
नवीन
अगदी अगदी..
मलाही तेच वाटले. निराशा झाली..
स्पावड्या कुठे ग्येला रे??
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/07/2015 - 08:58
नवीन
हा काय आलाय! पां डुब्बा!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/06/2015 - 16:51
नवीन
अरे काय भुतांची चेष्टा चालवलीय ?! जरातरी भूतदया दाखवा की ! :)
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Wed, 05/06/2015 - 16:56
नवीन
पुण्यात डाव हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरतात मग!! ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 05/06/2015 - 18:08
नवीन
एक उत्सुकता: बायंगीसाठी ग्राहकाने दिलेले दहा हजार रुपये त्या भुताला कसे मिळतात?
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
गुरुवार, 05/07/2015 - 10:27
नवीन
त्याच खाण-पिणं वेगळच असतं..... हे १०,००० त्या बायंगी च्या मूळ मालकाला दिले जातात. एक ठराविक कालावधि झाला की बायंगी मूळ मालकाकडे परत....
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Wed, 05/06/2015 - 19:17
नवीन
तुम्ही वर्णिलेली भुते त्रास देणारी का न देणारी ? त्रास देणारी कोणती आणि न देणारी कोणती हे कसे ओळखायचे ? बाटलीतून (मुख्यत्वे समुद्रकिनारी बुच लावलेल्या बाटलीतून) निघते ते भूत कोणते ? परदेशी असावे बहुतेक. स्त्री भूतांची माहिती कुठे सापडेल ? जनावरांची भुते असतात का ?
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 05/06/2015 - 19:46
नवीन
एक लेडिज भुत पाहिजे . कोणतही रूप धारण करता येणारे . ;-) (कोटेशन व्यनि ने पाठवून द्या )
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 20:10
नवीन
आता राडा होणार! 
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »